Gaju_G. Profile picture
Feb 21 18 tweets 3 min read
#ShivSenaCrisis

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष बाबत सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर आज मुख्य प्रकरणात पहिल्या दिवसाची सुनावणी झाली.

ठाकरे गटाच्या वतीने ऍड.कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद सुरू करताना सर्वप्रथम न्यायालयासमोर... Image
2019 च्या निवडणूकिपासून ते गेल्या आठवड्यातील निवडणूक आयोगाच्या निर्णयापर्यंतचा सर्व घटनाक्रम सविस्तर मांडला.
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील काही ठळक मुद्दे :-

- सभागृतील पक्षात फूट पडली याचा अर्थ पक्षात फूट पडली असा होतो का ?
यासाठी दहावी अनुसूचि आणि सभागृहातील पक्षाची..
भूमिका यांचे इंटरप्रिटेशन करावे लागेल. आमदार हे पक्षाच्या चिन्हावर निवडून येतात. ते पक्षामुळे सभागृहात जातात. पक्ष आणि त्यांच्यात एक अतूट दुवा असतो.
- सभागृहाबाहेर पूर्ण पक्षात फूट झाल्याशिवाय पक्षात फूट पडली असे म्हणता येणार नाही. व्हीप सभागृहाबाहेरील पक्षाद्वारे काढली जाते आणि
ती सभागृहातील पक्षाला लागू होते.
- सभागृहातील सदस्य मिळून व्हीप कोण असावा, पक्षाचा नेता कोण असावा असे मुद्दे ठरवू शकत नाहीत.
- दहाव्या शेड्युलचे असे इंटरप्रिटेशन केले जाऊ नये ज्याद्वारे पक्षांतरास चालना अथवा मान्यता मिळेल. याचा मूळ उद्देश अनैतिक पक्षांतर रोखणे हा आहे.
- दहाव्या शेड्युलचे असे इंटरप्रिटेशन केले जाऊ शकत नाही ज्यामुळे कि निवडणूक आलेले सरकार पाडले जाईल. न्यायालयाच्या निर्णयांचा हा परिणाम आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे पक्षांतर करणाऱ्यास मान्यता मिळते आहे आणि यामुळे ते दुसऱ्या पक्षासोबत मिळून सत्तापालट करत आहेत.
- शिंदे यांनी पक्षाची कोणतीही बैठक घेतली नाही. सगळे झाल्यावर 18 जुलै ला एक बैठक घेतली आणि 19ला चिन्हाचा दावा केला गेला.
- प्रश्न हा आहे की कोर्टाने त्याना वेळ दिला पाहिजे होता का ? त्याचा परिणाम काय झाला ? निवडून आलेले सरकार पाडले गेले. दहाव्या शेड्यूल उपयोग सरकार पाडण्यासाठी..
केला गेला. जर न्यायालय ठाकरे गटाच्या विरुद्ध निर्णय देत असेल तर अश्याप्रकारे सत्तापालट करण्याला मान्यता दिल्यासारखे होईल.
- सभागृहात नेत्यांची निवड पक्ष करत असतो. उदा. सोनिया गांधी यांनी खर्गे यांची राज्यसभेत पक्षाचा नेता म्हणून निवड केली व तसे पत्र दिले चेअरमनला.
इथे स्पिकर यांनी कशाच्या आधारे शिंदे यांची सभागृह नेतेपदी निवड केली ?
- 18 जुलैपर्यंत पक्षाची एकही बैठक झाली नाही. ह्या सगळ्या घडामोडी पक्षाच्या बाहेर होत होत्या. सभागृहात बहूमतात असलेले सदस्य स्वतःला मूळ पक्ष म्हणवून घेत होते आणि स्वतःच्या फायद्याचे निर्णय घेत होते.
-सिम्बॉल ऑर्डर नुसार पक्षात फूट असेल तर चिन्हाचा प्रश्न येतो. पक्षात फूट हा दावा कुणाचाच नाही. सभागृहात बहुमतात असलेला गट मूळ पक्ष कसा होऊ शकतो? याचे देशाच्या राजकारणावर गंभीर परिणाम होतील. यामुळे सभागृहातील पक्ष मूळ पक्ष म्हणून दावा करतील व संघटनेतील लोकांची हकालपट्टी करतील.
- दोन सभागृहात त्यांच्याकडे बहुमत आहे, दोन सभागृहात आमच्याकडे. दोघांनी 2018 च्या पक्षघटनेचा आधार घेतला मात्र आयोगाने ते रेकॉर्डवर नाही म्हणून विचारात घेतले नाही. संघटनेतील संख्यबळ बघितले नाही. आयोगाने त्यांना ज्या बहुमतच्या आधारे चिन्ह दिले आमच्यामते त्यातील सदस्य अपात्र आहेत.
- पक्षांतरासाठी अपात्र झालेल्या सदस्याला मंत्री होता येत नाही. इथे पक्षांतराचा विषय स्पिकरसमोर, कोर्टासमोर प्रलंबित असताना मंत्रिपद कसे दिले जाऊ शकते ?
- 2003 ला पक्षांतर बंदी कायद्यात जे बदल केले गेले तर बल्क मधे पक्षांतर होऊन सरकार अस्थिर करण्याला आळा बसावा यासाठी केले गेले.
- इथे जे झाले आहे ते बल्क मधे झालेले पक्षांतर आहे. जर हे वैध ठरवण्यात आले तर अश्याप्रकारे कोणतेही सरकार पाडले जाऊ शकते. यासाठी पक्षांतर करणाऱ्यांना पाच वर्षे कुठलेच पद मिळणार नाही अशी तरतूद केली पाहिजे..
- या 40 लोकांना दहाव्या अनुसूचित कोणतेही संरक्षण मिळू शकत नाही. त्यांच्या मते ते सभागृहात बहुमतात आहेत, ते व्हीप, नेता बदलू शकतात. कारण ते 40 आहेत ? मूळ पक्षाचे काय ? त्यांना अश्याप्रकारे दहाव्या शेड्युलनुसार संरक्षण मिळू शकत नाही.
- राज्यपाल ज्याच्या विरुद्ध पक्षांतर याचिका प्रलंबित आहेत अश्या सदस्याला शपथ देऊ शकतात का ? याबाबत राज्यपालांचे अधिकार काय आहेत याचा देखील विचार करावा लागेल.
बेंच कडून दोन म्हटवाच्या मुद्द्यांवर सिब्बल यांना प्रतिप्रश्न करण्यात आले...
पहिला मुद्दा म्हणजे पक्षांतरावर निर्णय कुणी करावा ? दहाव्या अनुसूचिनुसार स्पिकर यावर निर्णय करत असतात...
यावर सिब्बल यांनी या प्रकरणातील फॅक्टस् वर कोणतेही मतमतांतरे नाहीत. त्यामुळे सरळ कोर्ट यावर...
निर्णय करु शकते. यापूर्वी राजेंद्र सिंग राणा प्रकरणात घटनपीठाने अश्याप्रकारे निर्णय केल्याचे सांगितले.

दुसरा मुद्दा म्हणजे सरन्यायाधीश यांनी सिब्बल यांना विचारले कि तुम्ही मांडत आहात ते बरोबर असे गृहीत धरले तरी याचे उत्तर काय असू शकते...
यावर सिब्बल यांनी कोर्ट स्पिकरला पक्षांतरावर 7 दिवसात निर्णय घेण्यास सांगू शकतात, त्यांच्या विरोधात निर्णय गेला तर ते अपील करतील असे सुचवले.
घटनात्मक न्यायालय या युक्तिवादाला तार्किक निष्कर्ष देण्यासाठी काय रिलीफ देऊ शकते याचा विचार करावा लागेल असे देखील चीफ जस्टीस यांनी म्हंटले
उद्या ठाकरे गटाच्या वतीने सिब्बल, डॉ.अभिषेक सिँघवी व ऍड.देवदत्त कामत यांचा युक्तिवाद पूर्ण होण्याची शक्यता आहे व शिंदे गटाच्या वतीने ऍड.नीरज कौल युक्तिवाद सुरू करू शकतात.

दुपारी 3:30 वाजता आयोगाच्या निर्णयावर सुनावणी होईल.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Gaju_G.

Gaju_G. Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @Gaju3112

Feb 23
#थ्रेड
#ShivSenaCrisis
#Day3

सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली.

आज ठाकरे गटाच्या वतीने ऍड.कपिल सिब्बल यांनी त्यांचा युक्तिवाद पूर्ण केला. नंतर ऍड.अभिषेक सिंघवी यांनीही युक्तिवाद केला... Image
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील ठळक मुद्दे -

- दहाव्या शेड्युलनुसार एखाद्या पक्षाच्या बंडखोर आमदारांना मान्यता मिळू शकत नाही. घटनेत यास मनाई आहे. राज्यपालांच्या शपथविधीच्या कृत्याने घटनेत जे अमान्य केले आहे त्यास मान्यता दिली आहे.
- खरी शिवसेना कोण हे ठरवण्याचे अधिकार राज्यपालांना नाहीत. ते निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र आहे. राज्यपालांनी कुठल्या अधिकारात शिंदे यांना शपथ दिली ? दहाव्या शेड्युल मधून स्प्लिट ची तरतुद रद्द करण्यात आली आहे. राज्यपालांनी इथे ती तरतुद पुन्हा लागू केली आहे.
Read 28 tweets
Feb 22
#ShivSenaCrisis

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत प्रलंबित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य प्रकारणाबाबत दुसऱ्या दिवसाची सुनावणी झाली.

काल ठाकरे गटातर्फे ऍड. कपिल सिब्बल यांनी सुरू केलेला युक्तिवाद आज पुढे नेला... Image
कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील ठळक मुद्दे :-

- 25 नोव्हें.2019 ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत शिवसेना नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. त्यात एकनाथ शिंदे यांची गटनेता व सुनिल प्रभू यांची व्हीप म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- या 40 आमदारांनी त्यांचा गटनेता व व्हीप नियुक्त केला आहे. असे करणे बेकायदेशीर आहे. या निर्णयाला पक्षाचा पाठिंबा नाही. सभागृहाचे सदस्य असे प्रस्ताव पारित करू शकत नाहीत.
Read 24 tweets
Feb 20
#ShivSenaCrisis

निवडणूक आयोगाच्या निर्णयावर माजी लोकसभा सेक्रेटरी जनरल PDT आचारी यांचे मत -

- शिंदे गटाच्या याचिकेच्या मेंटेनेब्लिटीचा मुद्दा न्यायालयाने सोडवायला पाहिजे होता. त्यांनी तो आयोगाकडे सोपवला. आयोगाच्या निर्णयाचा इतर बाबींवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
- दहावी अनुसूची म्हणजेच पक्षांतर बंदी कायदा हा संविधानिक कायदा आहे. सिम्बॉल ऑर्डर 1968 हा दुय्यम कायदा आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायद्याला प्राधान्य दिले पाहिजे. तो मुद्दा आधी निकाली काढला पाहिजे कारण सरकारच्या वैधतेचा प्रश्न आहे.
- 2003च्या घटनादुरुस्ती नंतर पक्षापासून वेगळे होणाऱ्या गटाला संरक्षण मिळू शकत नाही. स्पिकर जेव्हा पक्षांतराचा विचार करतील तेव्हा आयोगाचा निर्णय न बघता तेव्हाची स्थिती लक्षात घ्यावी जेव्हा तिकीट दिले होते. तेव्हा मुळ पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष होता.
Read 13 tweets
Feb 20
#थ्रेड

निवडणूक आयोग पक्षाची मान्यता रद्द करू शकतो का ?

निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षचिन्हा वर निर्णय देताना पक्षाच्या घटनेत 2018 साली केलेलं बदल हे लोकशाही तत्वांच्या विरुद्ध असल्याचे मत नोंदवले आहे. यावर अनेकांची अशी प्रतिक्रिया आली कि मग आयोगाने पक्षाची मान्यता रद्द..
का केली नाही ?

लोकप्रतिनिधी कायदा 1951, सेक्शन 29A नुसार निवडणूक आयोग राजकीय पक्षांची नोंदणी करत असते. हे पक्ष Registered Unrecognised political parties(RUPP) म्हणून ओळखले जातात.
राज्यस्तरीय पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पक्षांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. उदा. राज्यस्तरीय पक्ष मान्यतेसाठी विधानसभेच्या निवडणूकित 6% मते मिळालेली असावीत.
राष्ट्रीय पक्ष मान्यतेसाठी 4 किंवा त्यापेक्षा जास्त राज्यात मान्यता मिळालेली असावी.
Read 13 tweets
Feb 19
#थ्रेड

शिवसेना पक्षचिन्हा संदर्भात निवडणूक आयोगाचा निर्णय !

शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षातील उध्दव ठाकरे गट व एकनाथ शिंदे गट यांच्यात पक्ष-चिन्ह दावेदारी बाबत जो वाद होता त्यावर निर्णय दिला. हा निर्णय आयोगाने कशाच्या आधारे दिला आहे ते त्याबाबत सविस्तर 👇
शिंदे गटाला अधिकृत शिवसेना व धनुष्यबाण चिन्ह बहाल करताना आयोगाने 78 पानांचा निकाल दिलेला आहे. यात सुरुवातीला पूर्ण घटनाक्रम, दोन्ही गटांचे दावे, चिन्ह फ्रीज करण्याचा अंतरिम आदेश व दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ई. माहिती दिलेली आहे.
ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या युक्तिवादाचा सारांश म्हणजे शिंदे गटाकडून पक्षात फूट पडल्याचे सिद्ध करण्यात आलेले नाही. सभागृह पक्षात फूट म्हणजे संघटनेत फूट असे होत नाही. मेजोरीटी टेस्ट हि एकमेव कसोटी नाही, पक्षाची घटना हि देखील महत्त्वाची कसोटी. पक्षांतरचा मुद्द्यावर निर्णय..
Read 31 tweets
Feb 18
पहिला प्रश्न हा कि उद्धव ठाकरे गटाला स्वतंत्र अस्तित्व आहे का ? शिवसेना(UBT) हे नाव व मशाल तात्पुरती सोय होती. आता एकच पक्ष अस्तित्वात आहे शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष.
उद्धव ठाकरेंना स्वतःचा वेगळा पक्ष करण्यासाठी आयोगाकडे नवीन पक्ष मान्यतेसाठी अर्ज करावा लागेल +
नवीन पक्षाला मान्यता देण्याच्या अटी व तरतूदी या वेगळ्या आहेत. शिवाय नवीन पक्ष म्हणून नोंद करणे म्हणजे शिवसेना पक्षाकडून मिळालेल्या आमदारकी वर पाणी सोडणे. सभागृहात स्पिकर महोदयांनी शिंदे गटाच्या गटनेता व व्हीप ला मान्यता दिलेली आहे.
आणि स्पीकर च्या निवडणूकित व शिंदे सरकारच्या विश्वासदर्शक ठरावात विरोधात मत दिले म्हणून आदित्य ठाकरे वगळता ठाकरे गटाच्या इतर आमदारांविरोधात पक्षांतर याचिका स्पिकर पुढे प्रलंबित आहेत.
Read 4 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(