#पुस्तकआणिबरचकाही
वसंत नरहर फेणे ( २८ एप्रिल १९२८ - ६ मार्च २०१८ ) माणसाच्या मनाचा व मानवी संबंधांचा खोलवर जाऊन वेध घेणार्या त्यांच्या कथा ‘दीपावली’, ‘सत्यकथा’, ‘किस्त्रीम’, ‘केसरी’, ‘प्रतिष्ठान’, ‘मराठवाडा’ इत्यादी अंकांतून प्रसिद्ध झाल्या. ‘निर्वासित नाती’मध्ये ‘नाती’ हे 👇
एकच सूत्र खेळवले असले, तरी इतर कथांमधूनही रक्ताची नाती, प्रीती-मैत्री, नीती, मूल्य, जन्मभू आणि ‘स्व’शी असलेली नाती ते प्रकाशझोतात आणतात. कधी त्या नात्यांमधली समृद्धी दिसते तर कधी त्यातले वैफल्य. ‘मी पुरुष-पूर्ण पुरुष’ हे नाटक, ‘वैताग वानोळा’ विनोदी लेख, ‘साम्यवाद ः एक अभ्यास’👇
हा अनुवाद असे प्रकार त्यांनी हाताळले असले, तरी कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ते ओळखले जातात.
‘काना आणि मात्रा’ , ‘पाण्यातली लेणी’, ‘सावल्यांची लिपी’ , ‘निर्वासित नाती’, ‘पिता-पुत्र’ , ‘नरजन्म’ , ‘ज्याचा-त्याचा कु्रस’, ‘मुळे आणि पाळे’ , ‘शतकान्तिका’ , ‘मावळतीचे मृद्गंध’ 👇
असे त्यांचे कथा-संग्रह आहेत.
‘हे झाड जगावेगळे’ , ‘पहिला अध्याय’ , ‘सेंट्रल बस स्टेशन ’ , ‘अजोड’, ‘संदर्भ’ , ‘र्हासपर्व’, ‘विश्वंभरे बोलविले’ इत्यादी कादंबर्या असे त्यांचे लेखन आहे. त्यांच्या काना आणि मात्रा या पुस्तकाला १९७२ चा राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. 👇
' विश्वंभर बोलविले' या कादंबरीला २००४ चा ना. सि. फडके पुरस्कार तसेच शब्द द बुक गॅलरीच्या वतीने लेखकीय कारकिर्दीसाठीचा भाऊ पाध्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार २०१७ ला देण्यात आला. @Marathi_Mee@ShubhangiUmaria@threadreaderapp unroll @pustakaayan
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकाही
हरि नारायण आपटे (८ मार्च १८६४ — ३ मार्च १९१९). मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार. मधली स्थिति (१८८८) ही त्यांची पहिली कादंबरी सामाजिक आहे. रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन ह्या कादंबरीच्या धर्तीवर ती रचिलेली आहे. ह्या कादंबरीखेरीजही त्यांनी सामाजिक कादंबऱ्या 👇
लिहिल्या आहेत. त्यांतील काही पुस्तकरूपाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाल्या. स्वत्वशून्य होऊन पराभूत मनोवृत्तीने जगणाऱ्या तत्कालीन समाजाचे चित्र त्यांच्या काही कादंबर्यांतून दिसते.पण लक्ष्यांत कोण घेतो ?, मी, यशवंतराव खरे आणि गणपतराव ह्या त्यांच्या विशेष महत्त्वाच्या सामाजिक👇
कादंबऱ्या होत. पण लक्ष्यांत कोण घेतो ? ही आत्मकथनपद्धतीने लिहिलेली मराठीतील पहिली कादंबरी. म्हैसूरचा वाघ ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी.त्यानंतर गड आला पण सिंह गेला, चंद्रगुप्त, रूपनगरची राजकन्या , वज्राघात , सूर्योदय, केवळ स्वराज्यासाठी , सूर्यग्रहण (अपूर्ण), 👇
#पुस्तकआणिबरचकाही
चिंतामण त्र्यंबक खानोलकर: (८ मार्च १९३०–२७ एप्रिल १९७६). प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने कवितालेखन.खानोलकर मूलतः कवी आहेत. त्यांचे कविव्यक्तिमत्त्वच त्यांच्या लेखनात आढळणाऱ्या एकसंघतेच्या मुळाशी आहे. शब्दांचे अर्थ व 👇
ध्वनी यांच्या समग्र भावाशयांचा समर्थ उपयोग कवितेप्रमाणेच ते इतर लेखनातही करून घेतात. कोकणातील जीवसृष्टी व निसर्ग यांच्या परस्परानुप्रवेशी एकसंध दर्शनातून ते प्रादेशिक जीवनाचा उभा छेद सादर करतात. त्यांचे कवितासंग्रह : जोगवा, दिवेलागण , नक्षत्रांचे देणे 👇
कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी , अजगर , कोंडुरा, त्रिशंकू शिवाय नाटके : एक शून्य बाजीराव , सगेसोयरे , अवध्य , कालाय तस्मै नमः असून कथासंग्रह : सनई , गणुराया आणि चानी , राखी पाखरू प्रसिद्ध आहेत.ह्यांशिवाय बालगीते (गोपाळ गाणी,), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा,) व व्यक्तिचित्रे👇
स्पेनमध्ये १९३७ झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. फॅसिस्ट सैन्याशी गटागटाने गनिमी काव्याने लढणारी जनता. शत्रू असला तरीही तो माणुस च ना....त्याला मारतांना हळवे होणारे गट तुकडीचे नेते, ... 👇
शिवाय या युद्धग्रस्त परिस्थितीत उद्या जिवंत असण्याची हमी नसतांनाही एक हळुवार उमलणारी प्रेमकथा ...
उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचे वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिले आणि अनुभवले ते यामध्ये आले आहे. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
स्नेहलता दसनुरकर ( ७ मार्च १९१८ - ३ जुलै २००३ ) स्नेहलता यांचे पहिले पुस्तक ‘राणी दुर्गावती’ (चरित्र) १९४५ साली प्रकाशित झाले. त्यांचे ५३ कथासंग्रह, ३ कादंबर्या, १ लघुचरित्र, ३ ललित लेख अशी एकूण ६० पुस्तके प्रकाशित असून त्यात ग्रामीण जीवन व सामाजिक प्रश्न 👇
यांवरील ४९० कथा व ८१ लेखांचा समावेश आहे. त्यांचे लेखन ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘वसंत’, ‘वाङ्मयशोभा’, ‘लोकसत्ता’ इत्यादी मासिक-साप्ताहिकांच्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले आहे.स्नेहलता यांच्या काही कथांचे हिंदी, गुजराती, तेलगू भाषांत अनुवाद झाले आहेत. १९५२ साली 👇
प्रसाद कथा स्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या ‘व्रजदीप’ या कथेवर ‘शापित’ हा मराठी चित्रपट तयार झाला. त्या चित्रपटाच्या कथेस महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘अवंतिका’ या कथेवर आधारित दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली, 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभाकर ताम्हणे ( २९ ऑक्टोबर १९३१ - ७ मार्च २००० ) हे कथा,पटकथा लेखक,नाटककार होते.गरवारे काॅलेज मध्ये मराठीचे प्राध्यापक होते. आपली प्राध्यापकी सांभाळून त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्या विनोदी शैलीतील कथालेखनाने.👇
अशीच एक रात्र येते हे त्यांचं फ्लॅशबॅक तंत्रातील नाटक चांगलेच गाजले. याचे हिंदी, गुजराती, पंजाबी आणि कोकणी भाषेत भाषांतरही झाले. त्यांनी चित्रपटासाठी कथा पटकथा लेखन केले. एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळी काळोखाची हे मराठी चित्रपट गाजले. तसेच त्यांच्या कथेवर राज कपूर ने 👇
काढलेला "बिवी ओ बिवी" हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. अनामिक नाते, छक्के पंजे, एक कळी उमलताना, घडीभर ची वस्ती, हुंडा पाहिजे, जीवन चक्र, लाइफ मेंबर, हिम फुलाच्या देशात, हा स्वर्ग सात पावलांचा, माझ्या बायकोचा नवरा, मध्यरात्री चांदण्यात, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
गोविंद शंकर बापट ( ८ फेब्रुवारी १८४४ - ६ मार्च १९०५ ) भाषांतरकार, संस्कृतचे व्यासंगी पंडीत. शिक्षक म्हणून कार्यरत असताना विविध विषयांवर बरेच लेखन केले.' नौका नयनाचा इतिहास' हा त्यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ. त्यानंतर 'नेपोलियन बोनापार्ट चे चरित्र', 👇
'पाल आणि वर्जिनिया', ' हरी आणि त्रंबक', 'एलिझाबेथ अथवा सायबेरिया देशातील हद्दपार झालेले कुटुंब', 'दशरथी रामचरित्रामृत' हे ग्रंथ त्यांच्या नावावर आहेतच. या व्यतिरिक्त संस्कृत ग्रंथार्थ संग्रह या नावाखाली अनेक कथापुराणांचे पुस्तक त्यांनी लिहिले. 👇
विद्यार्थ्यांसाठी संस्कृत भाषेतील काही पुस्तके त्यांनी लिहिली. व्युत्पत्तीप्रदीप हा त्यांचा ग्रंथ अतिशय लोकप्रिय झाला. त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. हा ग्रंथ त्यांनी सिद्धांतकौमुदी, अमरकोश, वरुरची प्रकाश इत्यादीच्या मदतीने तयार केला होता. यात काही ठिकाणी व्युत्पत्ती 👇