Sharad Pawar Profile picture
Mar 6 17 tweets 3 min read
कसबा पोटनिवडणुकीचे विजयी उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांनी आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला.
#pressconference
bit.ly/41PxHIU
कसबा पोटनिवडणुकीत यश मिळेल असे आम्हाला सामान्यांमधून ऐकण्यात मिळत होते. पण मला याची खात्री नव्हती, त्याचे मुख्य कारण नारायण, सदाशीव, शनिवार हे होते. हा सर्व भाग भाजपचा गड आहे असे अनेक वर्षे बोलले जाते. तसेच याठिकाणी बापट यांनी अनेक वर्ष प्रतिनीधित्व केले होते.
बापट यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे भाजपची विचारधारा न मानणारा जो पुण्यातील वर्ग आहे त्या सर्वांशी मैत्रीचे संबंध त्यांनी ठेवले आहेत. त्यामुळे बापट यांचे लक्ष ज्याठिकाणी अधिक केंद्रीत आहे तो मतदारसंघ आपल्याला जड जाईल असा अंदाज आमचा होता.
परंतु शेवटी साधारण एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सल्ल्यांनी निर्णय का नाही घेतले याबद्दलची कुजबूज ऐकायला मिळाली. याचा अर्थ बापट आणि टिळकांना डावलून काही निर्णय घेतल्यास त्याचे काय परिणाम होतील अशी चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल अशी शंका होतीच.
रंतु निवडणूक झाल्यावर मी घेतलेल्या माहितीनुसार ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिले ती व्यक्ती वर्षानुवर्षे सामान्य लोकांमध्ये कशाचीही अपेक्षा न करता काम करणारी होती. तसेच हा उमेदवार कधीच चार चाकीत बसत नाही तर दोनचाकीवाला आहे.
@dhangekarravi1
त्यामुळे दोन पाय असलेल्या मतदारांचे लक्ष यांच्याकडे आहे. त्याचा लाभ नक्की होईल हे ऐकायला मिळाले. तसेच पक्षाचा पाठींबा, महाविकास आघाडीतील सर्व घटक याठिकाणी मनापासून राबले याचा हा परिणाम आहे असे आमचे निरीक्षण आहे.
महाराष्ट्रात पाहिले तर लोकांना बदल हवाय. त्यामुळे उद्याची विधानसभा आणि लोकसभेसंदर्भात महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील लोकांना एकत्रित ठेवून एकत्रित निर्णय घेणे हा माझा एक प्रयत्न राहणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कसबा निवडणुकीत ज्यांचा विजय झाला ते उमेदवार महाविकास आघाडीचे होते हे तरी मान्य केले. निवडणुकीपूर्वी त्यांची वक्तव्य काय होती ते वाचनात आले होते त्यामध्ये आता थोडा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेल्या व्यक्तीबद्दल ते चांगले बोलतात ही चांगली गोष्ट आहे.
या निवडणुकीत झालेल्या पैशांचा गैरवापर प्रकरणात मी खोलात गेलो नसलो तरी त्यासंबंधी मला दाखवण्यात आलेले फोटो हे राजकारणापलीकडील लोकांनी दाखवले. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार हा वर्ग एका वेगळ्या विचारसरणीला मतदान करणारा आहे.
पण ज्यावेळी पैशाचे वाटप करणारी गोष्ट त्यांनी स्वत: पाहिली त्यावेळी या वर्गाने यांच्यापासून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. हा प्रकार पारंपारिक मतदाराला अजिबात आवडलेला नाही ते या निवडणुकीत दिसले.
केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरासंदर्भात प्रधानमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात पहिली सही माझी आहे. त्याअर्थी या प्रश्नसंबंधी प्रधानमंत्र्यानी गांभीर्याने पाहावे ही आमची इच्छा आहे.
अलीकडच्या काळात केजरीवाल सरकारने दिल्लीमध्ये शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जे काम केले आहे ते पाहण्यासाठी देशातील अन्य राज्यातून लोक येतात. त्या कामात पुढाकार घेणारी जी व्यक्ती होती त्यांनाच अटक झाली. अशी अनेक उदाहरणे दाखवता येतील.
तसेच ज्या लोकांवर आरोप होते ते जेव्हा त्यांच्या पक्षात गेले त्यानंतर अशा व्यक्तींसदर्भात कोणतेही निकाल आलेले नाहीत. काही प्रश्नासंबंधी एमआयएम पक्षाची काही मत आहेत त्यासंबंधी त्यांनी आग्रह धरला आहे. लोकशाहीत त्यांना असा आग्रह धरण्याचा अधिकार आहे.
राहुल गांधी एका राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत त्यांना विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी मत व्यक्त केले आहे. विरोधकांनी एकत्र राहण्याचा विचार जेव्हा आम्ही करतो त्यामध्ये काँग्रेस असणे गरजेचे आहे. काँग्रेस हा देशातील महत्त्वाच पक्ष आहे.
महाराष्ट्रात आणि देशाच्या प्रत्येक गावागावात काँग्रेस कार्यकर्ता आहे. या सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. जसा काँग्रेस महत्त्वाचा आहे तसा ममता बॅनर्जी तसेच इतर लोकही महत्त्वाचे आहेत. या सर्वांशी बोलावे लागेल ती प्रक्रिया आम्ही सुरु करू.
नाशिकच्या मनमाडच्या शेतकऱ्यांनी माझ्याशी बोलणे केले त्यामध्ये कांदा खरेदी योग्य पद्धतीने सुरू नाही. कांद्याचे पडलेले भाव सावरण्याच्या दृष्टीने काळजी घेतली जात नाही.
राज्य आणि केंद्र सरकारने जे निर्णय घेतले ते योग्य नाहीत अशी तक्रार शेतकऱ्यांची आहे. ज्याअर्थी अजूनही भावात सुधारणा होत नाही, याचे दुख शेतकऱ्यांमध्ये आहे. त्याची किंमत शेतकरी योग्य वेळी वसूल करतील.

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Sharad Pawar

Sharad Pawar Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @PawarSpeaks

Mar 8
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आयोजित जागर स्त्रीत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा या कार्यक्रमात विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा होत असलेला हा सन्मान आनंददायी आहे. Image
जीवनाच्या विविध क्षेत्रात प्रतिकूल परिस्थिती असतानाही ज्या महिलांनी आपले कर्तृत्व दाखवले, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला आणि त्या रस्त्याने जाऊ पाहणाऱ्या इतर भगिनींना प्रोत्साहित करण्याचे काम या माध्यमातून केल्याबद्द्ल @ChakankarSpeaks व त्यांच्या सहकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो. Image
लोकांचा महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा सुधारेल याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. कर्तृत्व हे फक्त पुरूषांमध्ये असते यावर माझा विश्वास नाही. संधी दिली, प्रोत्साहन दिलं तर समाजातील ५० टक्के वर्गदेखील कर्तृत्व दाखवण्यात कधी मागे राहत नाही.
#InternationalWomensDay Image
Read 26 tweets
Sep 10, 2022
आज नई दिल्ली में हुई राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की विस्तारित राष्ट्रीय कार्य समिति बैठक में उपस्थित पार्टी के सहकारी मित्रों से संवाद साधा।
#NCP
साथियों, पुरे विश्व में कोरोना की समस्या होने के कारण आज जैसे हम इकठ्ठा हुए ऐसी स्थिति दो सालों में नही थी। भारत सरकारने कुछ गाइडलाइन्स दी थी।
बैठक लेने के लिए कुछ रुकावटे आई थी, इसिलिए उस कठिन समय में हम लोग मिल नहीं सके। मुझे खुशी है की आज बड़े पैमाने पर हम सब वर्किंग कमिटी की बैठक के लिए इकठ्ठा हुए है। और पिछले दो सालों में राष्ट्रीय अधिवेशन हम नहीं ले सके वही अधिवेशन लेने का मौका हमें मिल रहा हैं।
Read 18 tweets
Jun 30, 2022
आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्या अनुषंगाने घडत असलेल्या विविध राजकीय घडामोडींविषयी आपले विचार व्यक्त केले.

bit.ly/3uh3kvM

#Pressconference
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे, कदाचित त्यांनाही याची कल्पना नसावी. भाजप कार्यपद्धतीमध्ये आदेश दिल्यानंतर तो तंतोतंत पाळावा लागतो. मागच्या काळात जे मुख्यमंत्री होते, त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. हा आश्चर्याचा धक्का होता.
पण एकदा आदेश आला आणि सत्तेची कोणतीही संधी मिळाली तर ती स्वीकारायची असते, याचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी आज घालून दिले. या दोन्ही गोष्टी आम्हाला कुणालाच माहीत नव्हत्या.
Read 28 tweets
Jun 23, 2022
राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबत आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांशी बोलल्यानंतर राज्यातील वर्तमान परिस्थितीवर भूमिका मांडली.

#Pressconference Image
महाविकास आघाडीने अडीच वर्षे उत्तम कारभार केला. अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोरोनासारखे राष्ट्रीय संकट असताना आरोग्य खात्याने अतिशय चांगले काम केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला नाही असे कोणी म्हणत असेल तर ते राजकीय अज्ञान आहे. Image
प्रसिद्धी माध्यमांमधून ज्या गोष्टी पुढे येत आहेत, त्या नाकारता येणार नाहीत. पण विधानसभेचे जे सभासद महाराष्ट्राबाहेर गेले, ते पुन्हा राज्यात आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांना नेले ही वस्तुस्थिती लोकांना सांगतील व ते पुन्हा शिवसेनेसोबत राहतील. त्यानंतर बहुमत कुणाचे आहे, ते सिद्ध होईल. Image
Read 14 tweets
Jun 21, 2022
In the meeting of representatives of various opposition parties held in New Delhi today to deliberate on the candidate for the Presidential Election. We have unanimously chosen Shri Yashwant Sinha as the common candidate of the opposition parties for the Presidential Election. Image
In his long and distinguished career in public life, Shri Sinha has served the nation in various capacities and he is eminently qualified to uphold the secular and democratic character of the Indian Republic and its constitutional values. Image
We have given a candidate who can truly serve as the custodian of the constitution & stop the current government from doing further damage to Indian Democracy & India’s social fabric. A committee has been formed to steer Shri Sinha’s campaign which will start working from today. Image
Read 4 tweets
Jun 21, 2022
पिछले दो-ढ़ाई साल में यह तिसरी बार हुआ है। पिछली दो बार विधायक उठाने का काम हुआ। पिछली बार हमारे विधायकों को हरियाणा, गुड़गांव मे रखा गया था। वहाँ से वो निकलकर आये, उसके बाद उद्धव ठाकरे जी का सरकार बना।

#NewDelhi #PressConference
पिछले ढ़ाई साल से महाराष्ट्र की सरकार ठिक तरह से चल रही है। कल महाराष्ट्र विधान परिषद का इलेक्शन हुआ। एनसीपी के दो उम्मीदवारों के लिए वोटों का जो कोटा तय किया गया था, वो उन्हें मिला। हमारी पार्टी के विधायकों ने डिसिप्लिन से वोटिंग किया।
हमारी फ्रंट का एक उम्मीदवार जीत नही सका, ये बात सच है। मुंबई वापस जाने के बाद इस पर चर्चा करेंगे। इस में कुछ ना कुछ रास्ता निकलेगा ऐसा मुझे भरोसा है। महाराष्ट्र सरकार की तीन सहयोगी पार्टीयों मे सही तालमेल है।
Read 6 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us on Twitter!

:(