#पुस्तकआणिबरचकाही
स्नेहलता दसनुरकर ( ७ मार्च १९१८ - ३ जुलै २००३ ) स्नेहलता यांचे पहिले पुस्तक ‘राणी दुर्गावती’ (चरित्र) १९४५ साली प्रकाशित झाले. त्यांचे ५३ कथासंग्रह, ३ कादंबर्या, १ लघुचरित्र, ३ ललित लेख अशी एकूण ६० पुस्तके प्रकाशित असून त्यात ग्रामीण जीवन व सामाजिक प्रश्न 👇
यांवरील ४९० कथा व ८१ लेखांचा समावेश आहे. त्यांचे लेखन ‘स्त्री’, ‘मनोहर’, ‘माहेर’, ‘मेनका’, ‘वसंत’, ‘वाङ्मयशोभा’, ‘लोकसत्ता’ इत्यादी मासिक-साप्ताहिकांच्या दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाले आहे.स्नेहलता यांच्या काही कथांचे हिंदी, गुजराती, तेलगू भाषांत अनुवाद झाले आहेत. १९५२ साली 👇
प्रसाद कथा स्पर्धेत त्यांना पारितोषिक प्राप्त झाले. त्यांच्या ‘व्रजदीप’ या कथेवर ‘शापित’ हा मराठी चित्रपट तयार झाला. त्या चित्रपटाच्या कथेस महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट कथेचा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यांच्या ‘अवंतिका’ या कथेवर आधारित दूरदर्शन मालिका प्रचंड गाजली, 👇
ती त्या कथेतील सशक्त कथाबिजामुळेच.साहित्य लेखनाबरोबरच स्नेहलता यांनी इयत्ता १० वीच्या उच्च मराठी पाठ्यपुस्तकाच्या संपादनाचे काम केले. १९९३ साली ‘मानिनी’ मासिकाने ‘स्नेहलता दसनूरकर विशेषांक’ प्रकाशित करून त्यांचा गौरव केला. ( संदर्भ - महाराष्ट्र नायक)
#पुस्तकआणिबरचकही
वि. भा. देशपांडे : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. विभा यांनी नाट्यविषयक विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने विभा यांनी १२०० पानी मराठी नाट्यकोश 👇
हा नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा मराठीतील पहिला नाट्यकोश संपादित केला. यामध्ये भारतातील विविध रंगभूमींच्या संक्षिप्त परिचयासोबत मराठी रंगभूमीच्या सुरुवातीपासूनचा कालखंड शब्दबद्ध करताना जुनी नाटके, मराठी व अमराठी नाटककार, कलाकार, निवडक संगीत नाटके, दिग्दर्शक, तंत्रज्ञ,👇
समीक्षक, पडद्यामागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्यग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. या कोशाचा हिंदी अनुवादही मराठी नाट्यकोश खंड १ व २ या नावाने प्रकाशित झालेला आहे.मराठी नाट्यसमीक्षा करताना नाटक, साहित्य संगीत या👇
#पुस्तकआणिबरचकही
कवी यशवंत : (९ मार्च १८९९–२६ नोव्हेंबर १९८५). विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती. पुढे रविकिरणमंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. 👇
यशोधन हा त्यांचा पहिला मोठा लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध , यशोनिधि, यशोगिरी, ओजस्विनी इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखांशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरणमंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता 👇
त्यांना मिळाली. स्फुट कवितेबरोबर जयमङ्गला (एक प्रेमकथा) , बन्दीशाळा , काव्यकिरीट अशी दीर्घ काव्यरचनाही त्यांनी केली. बन्दीशाळेत बालगुन्हेगाराची जीवनकथा सांगितलेली आहे, तर जयमङ्गला म्हणजे कवी बिल्हणाची प्रेमकथा होय. २२ भावगीतांचे मिळून हे एक काव्य झालेले असून रचनादृष्ट्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
हरि नारायण आपटे (८ मार्च १८६४ — ३ मार्च १९१९). मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार. मधली स्थिति (१८८८) ही त्यांची पहिली कादंबरी सामाजिक आहे. रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन ह्या कादंबरीच्या धर्तीवर ती रचिलेली आहे. ह्या कादंबरीखेरीजही त्यांनी सामाजिक कादंबऱ्या 👇
लिहिल्या आहेत. त्यांतील काही पुस्तकरूपाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाल्या. स्वत्वशून्य होऊन पराभूत मनोवृत्तीने जगणाऱ्या तत्कालीन समाजाचे चित्र त्यांच्या काही कादंबर्यांतून दिसते.पण लक्ष्यांत कोण घेतो ?, मी, यशवंतराव खरे आणि गणपतराव ह्या त्यांच्या विशेष महत्त्वाच्या सामाजिक👇
कादंबऱ्या होत. पण लक्ष्यांत कोण घेतो ? ही आत्मकथनपद्धतीने लिहिलेली मराठीतील पहिली कादंबरी. म्हैसूरचा वाघ ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी.त्यानंतर गड आला पण सिंह गेला, चंद्रगुप्त, रूपनगरची राजकन्या , वज्राघात , सूर्योदय, केवळ स्वराज्यासाठी , सूर्यग्रहण (अपूर्ण), 👇
#पुस्तकआणिबरचकाही
चिंतामण त्र्यंबक खानोलकर: (८ मार्च १९३०–२७ एप्रिल १९७६). प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने कवितालेखन.खानोलकर मूलतः कवी आहेत. त्यांचे कविव्यक्तिमत्त्वच त्यांच्या लेखनात आढळणाऱ्या एकसंघतेच्या मुळाशी आहे. शब्दांचे अर्थ व 👇
ध्वनी यांच्या समग्र भावाशयांचा समर्थ उपयोग कवितेप्रमाणेच ते इतर लेखनातही करून घेतात. कोकणातील जीवसृष्टी व निसर्ग यांच्या परस्परानुप्रवेशी एकसंध दर्शनातून ते प्रादेशिक जीवनाचा उभा छेद सादर करतात. त्यांचे कवितासंग्रह : जोगवा, दिवेलागण , नक्षत्रांचे देणे 👇
कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी , अजगर , कोंडुरा, त्रिशंकू शिवाय नाटके : एक शून्य बाजीराव , सगेसोयरे , अवध्य , कालाय तस्मै नमः असून कथासंग्रह : सनई , गणुराया आणि चानी , राखी पाखरू प्रसिद्ध आहेत.ह्यांशिवाय बालगीते (गोपाळ गाणी,), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा,) व व्यक्तिचित्रे👇
स्पेनमध्ये १९३७ झालेल्या नागरी युद्धाच्या काळात लोकांना जो क्रौर्याचा सामना करावा लागला त्याचे वर्णन या कादंबरीत आहे. फॅसिस्ट सैन्याशी गटागटाने गनिमी काव्याने लढणारी जनता. शत्रू असला तरीही तो माणुस च ना....त्याला मारतांना हळवे होणारे गट तुकडीचे नेते, ... 👇
शिवाय या युद्धग्रस्त परिस्थितीत उद्या जिवंत असण्याची हमी नसतांनाही एक हळुवार उमलणारी प्रेमकथा ...
उत्तर अमेरिकेतील वृत्तपत्रांसाठी स्पॅनिश नागरी युद्धाचे वार्तांकन करताना हेमिंग्वे यांनी जे पाहिले आणि अनुभवले ते यामध्ये आले आहे. 👇
#पुस्तकआणिबरचकाही
प्रभाकर ताम्हणे ( २९ ऑक्टोबर १९३१ - ७ मार्च २००० ) हे कथा,पटकथा लेखक,नाटककार होते.गरवारे काॅलेज मध्ये मराठीचे प्राध्यापक होते. आपली प्राध्यापकी सांभाळून त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना लोकप्रियता मिळवून दिली त्यांच्या विनोदी शैलीतील कथालेखनाने.👇
अशीच एक रात्र येते हे त्यांचं फ्लॅशबॅक तंत्रातील नाटक चांगलेच गाजले. याचे हिंदी, गुजराती, पंजाबी आणि कोकणी भाषेत भाषांतरही झाले. त्यांनी चित्रपटासाठी कथा पटकथा लेखन केले. एक धागा सुखाचा, मधुचंद्र, रात्र वादळी काळोखाची हे मराठी चित्रपट गाजले. तसेच त्यांच्या कथेवर राज कपूर ने 👇
काढलेला "बिवी ओ बिवी" हा चित्रपट अतिशय लोकप्रिय झाला. अनामिक नाते, छक्के पंजे, एक कळी उमलताना, घडीभर ची वस्ती, हुंडा पाहिजे, जीवन चक्र, लाइफ मेंबर, हिम फुलाच्या देशात, हा स्वर्ग सात पावलांचा, माझ्या बायकोचा नवरा, मध्यरात्री चांदण्यात, असे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. 👇