#पुस्तकआणिबरचकाही
हरि नारायण आपटे (८ मार्च १८६४ — ३ मार्च १९१९). मराठीतील एक श्रेष्ठ कादंबरीकार. मधली स्थिति (१८८८) ही त्यांची पहिली कादंबरी सामाजिक आहे. रेनल्ड्झच्या मिस्टरीज ऑफ ओल्ड लंडन ह्या कादंबरीच्या धर्तीवर ती रचिलेली आहे. ह्या कादंबरीखेरीजही त्यांनी सामाजिक कादंबऱ्या 👇
लिहिल्या आहेत. त्यांतील काही पुस्तकरूपाने त्यांच्या मरणोत्तर प्रसिद्ध झाल्या. स्वत्वशून्य होऊन पराभूत मनोवृत्तीने जगणाऱ्या तत्कालीन समाजाचे चित्र त्यांच्या काही कादंबर्यांतून दिसते.पण लक्ष्यांत कोण घेतो ?, मी, यशवंतराव खरे आणि गणपतराव ह्या त्यांच्या विशेष महत्त्वाच्या सामाजिक👇
कादंबऱ्या होत. पण लक्ष्यांत कोण घेतो ? ही आत्मकथनपद्धतीने लिहिलेली मराठीतील पहिली कादंबरी. म्हैसूरचा वाघ ही त्यांनी लिहिलेली पहिली ऐतिहासिक कादंबरी.त्यानंतर गड आला पण सिंह गेला, चंद्रगुप्त, रूपनगरची राजकन्या , वज्राघात , सूर्योदय, केवळ स्वराज्यासाठी , सूर्यग्रहण (अपूर्ण), 👇
आणि उषःकाल अशा आणखी दहा ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. ऐतिहासिक कादंबर्यांच्या लेखनासाठी त्या त्या विषयासंबंधी उपलब्ध असलेल्या इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास हरिभाऊ करीतच परंतु दंतकथा, लोककथा , पोवाडे इत्यादींचा उपयोगही तारतम्याने करून घेत. काही काल्पनिक व्यक्तिरेखाही 👇
त्यांनी निर्माण केल्या असल्या, तरी ऐतिहासिक वाटाव्या इतक्या जिवंतपणे त्या रेखाटलेल्या आहेत.त्यांची कादंबरी अवतरताच मराठी कादंबरीने प्रगतीचा एक फार महत्त्वाचा टप्पा गाठला. अनेक अनिष्ट वाङ्मयीन संकेतांतून मराठी कादंबरीस त्यांनी मुक्त केले. तिला अद्भुत आणि असंभाव्य घटनांंच्या 👇
पकडीतून सोडवून वास्तवाच्या दिशेने विकसित केले.हरिभाऊंनी लिहिलेल्या स्फुट गोष्टींनी (चार भाग, १९१५) मराठी लघूकथेचा पाया घातला. त्यांनी काही नाटके व प्रहसने लिहिली आहेत. संत सखूबाई , सती पिंगला ही त्यांची स्वतंत्र नाटके. याशिवाय व्हिक्टर हयूगो, काँग्रीव्ह, शेक्सपिअर, मोल्येर 👇
ह्यांच्या नाट्यकुतींची त्यांनी रुपांतरे केली. रवींद्रनाथांच्या गीतांजली चा त्यांनी गद्याअनुवाद केला. १९१२ च्या अकोले येथील भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. @Marathi_Mee@ShubhangiUmaria@threadreaderapp unroll
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#पुस्तकआणिबरचकही
सावित्रीबाई फुले ( ३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७ ) बालवयातच ज्योतिबांशी विवाह झाल्यावर पतीकडून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी आपल्या पतीच्या सामाजिक कार्यातच सहभाग घेतला नाही तर अनेक वेळा मार्गदर्शन केले. अवहेलना व प्रतिकुल परिस्थितीला धैर्याने तोंड देऊन👇
समाजसुधारणेच्या क्षेत्रात आगेकूच सुरूच राहिली. सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या महिला शिक्षिका आणि महिला मुक्ति चळवळीच्या पहिल्या नेत्या होत्या, ज्यांनी पती ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने देशातील महिलांच्या शिक्षणाचा पाया रचला. सावित्रीबाई फुले या दलित कुटुंबात जन्मल्या👇
होत्या, परंतु एकोणिसाव्या शतकातील स्त्री शिक्षणाची सुरुवात म्हणून त्यांनी थेट ब्राम्हणवादाच्या वर्चस्वाला आव्हान दिले होते.त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील वंचित घटकांच्या, विशेषत: महिला आणि दलित यांच्या हक्कांच्या संघर्षात व्यतीत झाले. त्या लेखिका आणि कवयित्रीसुद्धा होत्या. 👇
#पुस्तकआणिबरचकही
वि.वा.शिरवाडकर(२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९)मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व👇
ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. १९३० साली हं. प्रा. ठाकरसी विद्यालयात ते होते तेव्हा 'रत्नाकर' मासिकातुन त्यांच्या कविता प्रसिध्द होत. अस्पृश्य समजल्या जाणार्या लोकांना काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून १९३२ साली जो सत्याग्रह झाला त्यात त्यांनी सहभाग घेतल्यामुळे 👇
बाल्यावस्थेतील त्यांच्या लिखाणाला प्रौढत्वाची लकाकी चढून त्यांच्या साहित्याने आकाशाला गवसणीच घातली. ज्यात त्यांनी फक्त कविताच नाही तर कथा, कादंबर्या, नाटके, ललित साहित्य याबरोबर प्रभा साप्ताहिक, प्रभात वृत्तपत्र, सारथी, धनुर्धारी व नवयुग यामध्ये पत्रकारिता पण केली. १९४२ साली 👇
#पुस्तकआणिबरचकही
मंगेश पाडगावकर ( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ ) पाडगावकरांचा ‘धारानृत्य’ हा पहिला संग्रह १९५० साली प्रसिद्ध झाला. त्यानंतर आजतागायत पाडगावकरांची एकूण ४२ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. नाट्यकविता, बालकविता, उपहासपर कविता (वात्रटिका), गझल या स्वरूपाची काव्यरचना 👇
केली. आधी भावकवी आणि नंतर गीतकार असे स्थित्यंतर झाल्यामुळे कवीचे हळुवार, तरल, संवेदनशील मन रस-रंग-नाद-गंध-स्पर्शयुक्त शब्दांच्या आधारे संगीतानुकूल झाले. ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’, ‘श्रावणात घन निळा बरसला’ ह्या गीतांनी रसिकांच्या कायमचे👇
स्थान निर्माण करून ठेवले आहे. ‘तुझे गीत गाण्यासाठी’ या गीतसंग्रहाप्रमाणेच पाडगावकरांचा ‘गझल’ हा संग्रहही उल्लेखनीय आहे. बालकविता हा काव्यप्रकारही पाडगावकरांनी आत्मसात करून मुलांसाठी प्रामुख्याने गेय बालगीते लिहिली आहेत- ‘भोलानाथ’ , ‘बबलगम’, ‘चांदोमामा’, ‘सुट्टी एके सुट्टी’ 👇
#पुस्तकआणिबरचकही
वि. भा. देशपांडे : (३१ मे १९३८ – ९ मार्च २०१७). महाराष्ट्रातील प्रसिद्ध नाट्यसमीक्षक. नाट्यक्षेत्रात ते ‘विभा’ म्हणून ओळखले जात असत. विभा यांनी नाट्यविषयक विपुल ग्रंथसंपदेची निर्मिती केली. वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणेने विभा यांनी १२०० पानी मराठी नाट्यकोश 👇
हा नाट्यसृष्टीची साद्यंत माहिती देणारा मराठीतील पहिला नाट्यकोश संपादित केला. यामध्ये भारतातील विविध रंगभूमींच्या संक्षिप्त परिचयासोबत मराठी रंगभूमीच्या सुरुवातीपासूनचा कालखंड शब्दबद्ध करताना जुनी नाटके, मराठी व अमराठी नाटककार, कलाकार, निवडक संगीत नाटके, दिग्दर्शक, तंत्रज्ञ,👇
समीक्षक, पडद्यामागील मदतनीस, प्रेक्षक, नाट्यसंस्था, नाट्यगृह, नाट्यनिर्माते, नाट्यग्रंथ, नियतकालिके, संमेलनाध्यक्ष इत्यादींविषयी माहिती दिलेली आहे. या कोशाचा हिंदी अनुवादही मराठी नाट्यकोश खंड १ व २ या नावाने प्रकाशित झालेला आहे.मराठी नाट्यसमीक्षा करताना नाटक, साहित्य संगीत या👇
#पुस्तकआणिबरचकही
कवी यशवंत : (९ मार्च १८९९–२६ नोव्हेंबर १९८५). विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढरकर. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहिण्याकडे होती. पुढे रविकिरणमंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. 👇
यशोधन हा त्यांचा पहिला मोठा लोकप्रिय कवितासंग्रह. त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध , यशोनिधि, यशोगिरी, ओजस्विनी इ. काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखांशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरणमंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता 👇
त्यांना मिळाली. स्फुट कवितेबरोबर जयमङ्गला (एक प्रेमकथा) , बन्दीशाळा , काव्यकिरीट अशी दीर्घ काव्यरचनाही त्यांनी केली. बन्दीशाळेत बालगुन्हेगाराची जीवनकथा सांगितलेली आहे, तर जयमङ्गला म्हणजे कवी बिल्हणाची प्रेमकथा होय. २२ भावगीतांचे मिळून हे एक काव्य झालेले असून रचनादृष्ट्या 👇
#पुस्तकआणिबरचकाही
चिंतामण त्र्यंबक खानोलकर: (८ मार्च १९३०–२७ एप्रिल १९७६). प्रसिद्ध मराठी कवी, कथा-कादंबरीकार आणि नाटककार. ‘आरती प्रभु’ ह्या नावाने कवितालेखन.खानोलकर मूलतः कवी आहेत. त्यांचे कविव्यक्तिमत्त्वच त्यांच्या लेखनात आढळणाऱ्या एकसंघतेच्या मुळाशी आहे. शब्दांचे अर्थ व 👇
ध्वनी यांच्या समग्र भावाशयांचा समर्थ उपयोग कवितेप्रमाणेच ते इतर लेखनातही करून घेतात. कोकणातील जीवसृष्टी व निसर्ग यांच्या परस्परानुप्रवेशी एकसंध दर्शनातून ते प्रादेशिक जीवनाचा उभा छेद सादर करतात. त्यांचे कवितासंग्रह : जोगवा, दिवेलागण , नक्षत्रांचे देणे 👇
कादंबऱ्या : रात्र काळी घागर काळी , अजगर , कोंडुरा, त्रिशंकू शिवाय नाटके : एक शून्य बाजीराव , सगेसोयरे , अवध्य , कालाय तस्मै नमः असून कथासंग्रह : सनई , गणुराया आणि चानी , राखी पाखरू प्रसिद्ध आहेत.ह्यांशिवाय बालगीते (गोपाळ गाणी,), ललितनिबंध (वारा वाहे रुणझुणा,) व व्यक्तिचित्रे👇