डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.
▪️चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
▪️अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
▪️
शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
▪️ घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.
यांमध्ये होणाऱ्या श्वेत व रक्त प्रदरावर डाळिंबाची साल गुणकारी ठरते. ही साल तांदळाच्या धुवणात वाटून द्यावी
▪️ मूळव्याधीमध्ये जर रक्त पडत असेल तर डाळिंबाच्या सालीचे चूर्ण नागकेशरमध्ये घालून द्यावे यामुळे रक्त पडण्याचे बंद होते तसेच अशक्तपणा आला असेल तर डाळिंबाचा रस प्राशन करावा
▪️ताप आला असेल तर डाळिंब खावे, तापामुळे शरीरामध्ये वाढलेली उष्णता त्यामुळे कमी होते.
▪️ डाळिंब हे रक्तवर्धक आणि शक्तिवर्धक आहे, ज्यांना रक्ताची कमतरता म्हणजे अॅनिमिया आहे. त्यांनी रोज एक डाळिंब खावे.
▪️अपचन, पोटात गॅस होणे, शौचास साफ न होणे या तक्रारींवर डाळिंब फायदेशीर ठरते.
▪️ जुलाब होत असतील तर डाळिंबाच्या सेवनाने ते लगेच थांबतात.
▪️डाळिंबाचा रस प्यायल्यानं रक्ताभिसरण क्रिया सुधारते.
▪️ बाराही महिने डाळिंबाचे औषधी गुणधर्म उपयोगात आणण्यासाठी दाडीमावलेह, दाडीमादीघृत इ. डाळिंबापासून बनवलेल्या औषधांचा वापर करावा.
रक्त शुध्दिकरणः
त्वचेवर होणारे अनेक कष्टसाध्य आजार मनुष्याला शरिरातील दुषित रक्तामूळे होतात. खरुज, कंड, व्रण, त्वचा रोग, रंग बदलणे, गजकर्ण, इसब, नायटा, सोरायसिस, कमि झोप, हातापायाचि आग, डोके दुखणे, हत्तिपाय, इ. विकार होतात,
तसेच अनेक कातडी खालिल गाठि, ट्यूमर, तसेच शरिराच्या आत अनेक आजार दुषित रक्ताने होतात, म्हणून रक्तशुद्धिकरण ते हि नैसर्गिक पद्धत्तिने करणेचे गरजेचे आहे, रक्तात अनेक घातक पदार्थ साचत गेल्याने रक्त दूषित होते, तसेच अनेक बँक्टेरिया, जंतू, यांचे संक्रमण दुषित रक्तामूळे होऊन
एक वेळ अशि येते की, हि फील्ट्रेशन करणारी यंत्रणाच बिघडते, मग डायलेसिस चा आधार घ्यावा लागतो. ही वेळ पुढे जाउन येउनच द्यायचि नसेल तर प्रत्येकाने शरिरातिल रक्त दूषित होण्यापूर्वि, काळजि घेणे गरजेचे आहे.
🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.
🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे
रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.
🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.
🍎भूक लागल्याशिवाय जेवू
नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.
🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.
🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.
जेष्ठमध आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे.
यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच यात कॅल्शियम देखील असते. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास घरातील वडीलधारी माणसं जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात. 1) ज्येष्ठमध सर्दी आणि खोकला, विशेषतः कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.
त्याच्या नैसर्गिक ब्रोन्कोडायलेटर गुणधर्मांमुळे, हिवाळ्यात दम्याशी संबंधित लक्षणांवर उपचार करण्यासाठी हा एक प्रभावी घटक आहे. 2) मासिक पाळीच्या समस्यांपासून बचाव करते. ज्येष्ठमधामध्ये अँटिस्पास्मोडिक प्रभाव असतो, जे स्नायू शिथिल करणारे म्हणून काम करतात. हे अस्वस्थता देखील कमीकरते