🍎अन्न नेहमी ताजे व गरम जेवावे.असे अन्न स्वादिष्ट तर असतेच शिवाय लवकर व चांगले पचते.फारच थंड वा फारच गरम अन्न मात्र कधीच खाऊ नये.
🍎अगदी कोरडे अन्न वा तेलातुपाने नुसते माखलेले अन्न खाऊ नये.अगदी कोरडे अन्न म्हणजे
रुक्ष अन्न खावयास तर त्रास होतोच पण पचावयास देखील त्रास होतो.
🍎अन्नाचे प्रमाण भूक व पचनशक्ती यांच्या अनुमानाने योग्य तेवढे जर ठेवले तर त्रिदोषांना कोठेही न बिघडवता तीनही दोषांचे योग्य असे पोषण करण्यास ते सक्षम ठरते.
🍎भूक लागल्याशिवाय जेवू
नये.भूक लागणे हे आधीचे जेवण पचले आहे असे समजण्याचे साधन आहे.
🍎आधी खाल्लेले अन्न नीट पचल्याखेरीज जेवू नये.अन्यथा अन्नपाचक रसांना,आतड्यांना ताण येतो व पचनसंस्था बिघडते.
🍎दोन परस्परविरोधी अशा प्रकारचे अन्न एकाच वेळी व एकामागून एक असे खाऊ नये.अशाने रोगाला आमंत्रण मिळते.
🍎अस्वच्छ जागी बसून जेवू नये.याने जंतुसंसर्ग वाढतो.
🍎खूप भराभर असे जेवू नये.अशाने ठसका लागण्याचा संभव निर्माण होतो व अन्नाचा तिटकारा वाटण्याची शक्यता निर्माण होते.
🍎अति सावकाश रेंगाळत देखील जेवू नये.असे केल्यास जेवण तर गार होतेच शिवाय पचन मंदावते
,भूक नीट भागत नाही व जेवणाचे समाधान होत नाही.
🍎जेवताना टीव्ही, मोबाईल,लॅपटॉप,व्हिडीओ गेम्स हे काटेकोरपणे टाळावे.यामुळे जेवणात लक्ष राहत नाही.
🍎यासाठी जेवणासारखी अत्यंत महत्वाची गोष्ट पूर्णपणे लक्ष देऊन स्वतःसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करून प्रसन्न मनाने करावी.
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
रक्त शुध्दिकरणः
त्वचेवर होणारे अनेक कष्टसाध्य आजार मनुष्याला शरिरातील दुषित रक्तामूळे होतात. खरुज, कंड, व्रण, त्वचा रोग, रंग बदलणे, गजकर्ण, इसब, नायटा, सोरायसिस, कमि झोप, हातापायाचि आग, डोके दुखणे, हत्तिपाय, इ. विकार होतात,
तसेच अनेक कातडी खालिल गाठि, ट्यूमर, तसेच शरिराच्या आत अनेक आजार दुषित रक्ताने होतात, म्हणून रक्तशुद्धिकरण ते हि नैसर्गिक पद्धत्तिने करणेचे गरजेचे आहे, रक्तात अनेक घातक पदार्थ साचत गेल्याने रक्त दूषित होते, तसेच अनेक बँक्टेरिया, जंतू, यांचे संक्रमण दुषित रक्तामूळे होऊन
एक वेळ अशि येते की, हि फील्ट्रेशन करणारी यंत्रणाच बिघडते, मग डायलेसिस चा आधार घ्यावा लागतो. ही वेळ पुढे जाउन येउनच द्यायचि नसेल तर प्रत्येकाने शरिरातिल रक्त दूषित होण्यापूर्वि, काळजि घेणे गरजेचे आहे.
जेष्ठमध आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. आयुर्वेदात याचा उपयोग औषध म्हणून केला जातो. ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध गुणकारी आहे.
यात प्रोटीन्स, अँटीपायोटिक्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. तसेच यात कॅल्शियम देखील असते. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकल्याचा त्रास होत असल्यास घरातील वडीलधारी माणसं जेष्ठमध खाण्याचा सल्ला देतात. 1) ज्येष्ठमध सर्दी आणि खोकला, विशेषतः कोरड्या खोकल्यावर उपचार करण्यासाठी प्रभावी आहे.
त्याच्या नैसर्गिक ब्रोन्कोडायलेटर गुणधर्मांमुळे, हिवाळ्यात दम्याशी संबंधित लक्षणांवर उपचार करण्यासाठी हा एक प्रभावी घटक आहे. 2) मासिक पाळीच्या समस्यांपासून बचाव करते. ज्येष्ठमधामध्ये अँटिस्पास्मोडिक प्रभाव असतो, जे स्नायू शिथिल करणारे म्हणून काम करतात. हे अस्वस्थता देखील कमीकरते
डाळिंबांमध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह मोठ्या प्रमाणात असतात. डाळिंबाच्या दाण्यांचाच नव्हे, तर साल, पाने, फुले, बिया, मुळं या सर्वच भागांचा औषधामध्ये वापर करतात, चला तर मग या बहूगुणकारी डाळिंबाचे फायदे जाणून घेऊ.
▪️चिरतारुण्य टिकवण्यासाठी रोज एक डाळिंबाचे सेवन करावे.
▪️अपचन, आम्लपित्त, ताप या कारणांनी जर तोंडास दुर्गंधी येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून चावून खाल्ल्यास दुर्गंधी निघून जाते.
▪️
शरीर मजबूत, काटक व सुंदर बनविण्यासाठी डाळिंब रस व आवळा रस एकत्र करून त्यामध्ये खडीसाखर घालावी व आठ दिवस उन्हात ठेवावे, तयार झालेले सरबत रोज १ कपभर प्यावे.
▪️ घसा दुखणे, तोंड येणे हे आजार झाले असतील तर डाळिंबाच्या सालीच्या काढय़ाने गुळण्या कराव्या.