आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n #मराठी#Aadhar#आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.
प्रक्रिया
१. सर्वप्रथम आधार कार्ड (UIDAI) च्या वेबसाईट किंवा अँप वर जा.
२. लॉगिन वर क्लीक करून , आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा टाकून SEND OTP वर क्लीक करा.
३. तुमच्या रजिस्टर मोबाईल वर एक सहा अंकी OTP मिळेल तो टाकून लॉगिन करा.👇
४. पुढच्या पेज वर सर्वात शेवटी डॉक्युमेंट अपडेट चा पर्याय तुम्हाला दिसेल.
५. पुढे दोन पेज वर कोणते डॉक्युमेंट्स हवे हे येईल ते वाचून त्यांना नेक्स्ट करा.
६. पुढे तुम्हाला तुमचं नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल तो तपासून टिक करून नेक्स्ट करा.👇
७. पुढे तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायला येईल तिथे JPG, PNG आणि PDF फॉरमॅट मध्ये ५ MB पर्यंत फाईल तुम्ही अपलोड करू शकता.
८. आयडी प्रूफ आणि पत्ता यासाठी कोणते डॉक्युमेंट लागतील याची पूर्ण लिस्ट इथे दिसेल त्यातील कोणताही डॉक्युमेंट तुम्ही देऊ शकता.
९. जस के तुम्ही पॅनकार्ड सिलेक्ट केलं तर ते अपलोड वर क्लिक करून अगोदर काढलेला फोटो तुम्ही टाकू शकता किंवा कॅमेरा पर्याय घेऊन फोटो काढू शकता.
१०. अश्या प्रकारे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड करा.
नंतर ओके वर क्लिक करून सबमिट करा.
त्यानंतर एक एक्नॉलेजमेन्ट रिसिप्ट मिळेल ती
डाउनलोड करून ठेवा, त्याखाली तुम्हाला तुमचा अर्ज कोणत्या स्टेज ला आहे हे दिसेल. ७ दिवसांत तुमचे डॉक्युमेंट'स व्हेरिफाय केले जातात.
लींक साठी बायो चेक करा / गुगल करा.🧐
टिप : सेवा मोफत आहे तोपर्यंत करून घ्या नंतर सेवा शुल्क आणि लेट फी लागली तर ओरडू नका.
🧵८/८ #AdhaarCard#Update
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
प्रत्येकाने शिकायलाच हवेत असे Google चे टॉप AI Tools 🧵
आजच्या काळात AI शिकणे हा पर्याय नाही… तो कौशल्य बनत आहे.
विद्यार्थी असो, नोकरदार, फ्रीलांसर किंवा कंटेंट क्रिएटर Google चे AI Tools आता प्रचंड उपयुक्त ठरत आहेत. तुम्ही देखील शिकले पाहिजेत असे 6 Google AI Tools. 1/9
Gemini 🤖 (Google AI Assistant) Gemini म्हणजे Google चे सर्वात स्मार्ट AI Tool.
हे विशेषतः
ब्रेनस्टॉर्मिंग
ब्लॉग, ईमेल, स्क्रिप्ट व लेखन
अभ्यास आणि रिसर्च
प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि आयडिया जनरेशन यासाठी अतिशय उपयुक्त आहे याशिवाय ते..
Gemini Advanced थेट Gmail, Docs, Sheets, Maps व इतर Workspace apps मध्ये जोडलेले आहे.
कुठे बाहेर फिरायला जायचे असेल तर तिथले लोकेशन, हॉटेल्स च्या बुकिंग लिंक किंमती आणि ट्रेन / फ्लाईट ची उपलब्धता देखील इथे तुम्हाला लगेच बघता येते.
ट्रम्प तात्या वारंवार एकाच गोष्टीचं रडगाणं गातोय की "भारताचे टेरीफ खूप जास्त आहेत!"
आता त्यांनी थेट 25% टेरिफ भारतावर लावून, ह्या वादात तेल ओतलंय.
🧵 पण खरी गोष्ट काय आहे?भारत किती टेरिफ लावतो? अमेरिका किती लावते? यात फरक काय आहे?
चला, सविस्तर समजून घेऊया
भारताचं सरासरी टेरीफ दर सध्या जवळपास 12% आहे जो जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक मानलं जातं.
काही ठराविक क्षेत्रात हे अजूनच जास्त आहेत:
मोटरसायकल्स – 50%
दारू, वाईन – 100% ते 150%
सुकामेवे-फळं – 100% पेक्षा अधिक
याशिवाय भारतात नॉन-टेरीफ अडथळे देखील प्रचंड आहेत, म्हणजेच किचकट परवाने, कसून मानके, आणि वेळखाऊ कस्टम्स प्रक्रिया. त्यामुळे अमेरिका आपला माल सहज भारतात विकू शकत नाही.
हेच अमेरिकेचं मोठ दुखणं आहे, टेरीफ मुळे माल पाठवता येत नाही, आणि पाठवला तर अडकतो.
जगात अशी एक जागा आहे, जिथे दरवर्षी मासे पावसासारखे पडतात.
हो, हे खरंच घडतं – होंडुरास देशातल्या योरो नावाच्या एका छोट्याशा शहरात.
गेल्या 100 वर्षांपासून, दरवर्षी मे किंवा जून महिन्यात इथे प्रचंड वादळं होतात… आणि त्या वादळानंतर काही वेळात शहरातल्या रस्त्यावर शेकडो मासे आढळतात!
ह्या घटनेला म्हणतात – lluvia de peces म्हणजेच माशांचा पाऊस.
जगात अजूनही काही ठिकाणी अशा घटना नोंदवल्या गेल्या आहेत – कधी बेडूक, कधी मासे, पण अजूनही विज्ञानाला याचं ठोस उत्तर सापडलेलं नाही.
एक थिअरी म्हणते की हे मासे पाण्यावरून जाणाऱ्या waterspout नावाच्या टोर्नाडोंमुळे हवेत उचलले जातात आणि मग इतरत्र पडतात. पण ही थिअरी योरोसाठी फिट बसत नाही
का? कारण योरोमधले मासे स्थानिक नदीतले नसतात ते जवळच्या अटलांटिक महासागरातले असतात – आणि महासागर इथून तब्बल 200 किमी लांब आहे!
"गटारी अमावस्या" म्हणजे नेमकं काय?
नॉनव्हेज, दारू, धिंगाणा, आणि रात्री गटारात पडणं? का आपण नकळत आपल्याच मूर्खपणात पारंपरिक सणाचं रूपांतर एका विकृत सेलिब्रेशनमध्ये केलंय?
हा सण खरंच असा होता का?
आपण आपल्या पुढील पिढीसाठी काय आदर्श ठेवतोय?🧵
गटारी नाही, गतहारी अमावस्या!
“गत” म्हणजे गेलेला, “हारी” म्हणजे आहार.
म्हणजेच आहाराचा त्याग करण्याची अमावस्या.
ही संकल्पना म्हणजे श्रावण सुरू होण्यापूर्वी शेवटचं जड जेवण, मग पुढे संयम, सात्त्विकता आणि शुद्धतेचं पालन.
या शब्दाचा पुढे झाला गटारी ज्याचा काहीही संबंध नाही.
का साजरी केली जाते ही अमावस्या?
ही अमावस्या येते आषाढ महिन्याच्या अखेरीस, श्रावण सुरू होण्याच्या एक दिवस आधी.
पावसाळा जोमात असतो, निसर्ग बदलतो आणि श्रावण भक्ती, शुद्धता, आणि संयम याचा महिना सुरू होतो.
म्हणून या दिवशी मांसाहार, मद्यपान इत्यादीचा शेवटचा आस्वाद घेऊन,
महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय?
शिक्षण क्षेत्रात हजारो कोटींचा शालार्थ स्कॅम उघड - बनावट शिक्षक, बनावट आयडी, लाखोंच्या लाचांचा खेळ!
हे प्रकरण उघड झालंय खरं, पण प्रश्न एकच.
हे प्रकरण दाबलं जाईल का, की खरंच कारवाई होईल?
नक्की प्रकरण काय?🧵
#ShalarthScam #MaharashtraEducation
शिक्षकांसाठीच्या शासकीय 'शालार्थ' पोर्टलचा गैरवापर करून हजारो कोटींचा घोटाळा उघड झालाय. 2012 पासून सुरू असलेल्या या पोर्टलवर बनावट आयडी तयार करून, गैरकायदेशीर पद्धतीने पगार काढण्यात आलेत. अंदाजे 2,000–3,000 कोटी रुपयांचा चुना लागला आहे सरकारला!
शालार्थ पोर्टल म्हणजे काय?
शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी हे वेतन व सेवा नोंदीचं पोर्टल आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला युनिक शालार्थ आयडी दिला जातो, ज्यावरून पगार व इतर लाभ मिळतात.