PPF -पब्लिक प्रॉव्हिडेंट फंड हा एक दीर्घ कालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे जो आकर्षक व्याजदर सोबतच गुंतवणुकीवर उत्तम परतावा देते. पीपीएफ मध्ये गुंतवलेला पैसा हा सरकारच्या पाठिंब्यामुळे एकदम सुरक्षित आहे. या शिवाय यात मिळणारा व्याज आणि परतावा हे आयकर
🧵1/n
कायद्या कलम 80C (Income Tax Act under Section 80C) च्या अंतर्गत खाते धारकाला टॅक्स पासून सूट मिळते.
तुम्ही पीपीएफ खाते एकतर पोस्ट ऑफिस मध्ये किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत उघडू शकता. तसेच आजकाल काही खाजगी बँका देखील ही सुविधा देत आहेत.
भारतातील कोणताही नागरिक #मराठी#म
पीपीएफ खाते उघडू शकतो. तसेच अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने सुद्धा खाते उघडता येते. Joint पीपीएफ खाते उघडता येत नाही. पण त्याऐवजी तुम्ही नॉमिनी लावू शकता. कोणतीही व्यक्ती त्याच्या नावावर एका पेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडू शकत नाही.
पीपीएफ अकाउंट चा व्याज दर हा वित्त मंत्रालय तर्फे दरवर्षी निश्चित केला जातो. आणि पीपीएफ अकाउंट चा सध्याचा व्याज दर हा ७. १ टक्के आहे. (सध्याच्या FD आणि RD) पेक्ष्या उत्तम)
पीपीएफ खाते हे फक्त १०० रुपये देऊन देखील उघडता येते. तसेच पीपीएफ खाते दर वर्षी कमीत कमी ५०० रुपये आणि
जास्तीत जात १.५ लाख रुपये गुंतवणूक करण्यास परवानगी देते.
कालावधी :
पीपीएफ खात्याचा कालावधी हा किमान १५ वर्षाचा असतो. जो तुमच्या इच्छेनुसार मॅच्युरिटी नंतर ५ वर्षांच्या कालावधी मध्ये वाढवला जाऊ शकतो. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्याआधी खाते बंद केले जाऊ शकत नाही. फक्त काही
विशिष्ट परिस्थिती मध्ये बंद केले जाऊ शकते. २०१६ ला पीपीएफ नियम मध्ये काही बदल करण्यात आले ज्यात गंभीर आजार, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी पीपीएफ खाते वेळे आधी बंद केले जाऊ शकते.
या शिवाय जर खाते धारकाच्या निवासी स्थितीत बदल झाला असल्यास पीपीएफ खाते मॅच्युरिटी आधी बंद केले जाऊ शकते
पीपीएफ खाते धारकाचा खाते मॅच्युरिटी होण्याआधीच जर मृत्यू झाला, आणि खाते ५ वर्षांपासून उघडले नसले तरी ही नॉमिनी असलेली व्यक्ती खात्यातील पूर्ण रक्कम काढू शकतो. तसेच खाते धारकाच्या मृत्यू नंतर पीपीएफ खाते बंद केले जाईल.
गुंतवणुकीचे फायदे:
१. खाते उघडल्यापासून तिसऱ्या ते सहाव्या वर्षापर्यंत जमा रकमेवर कर्ज घेता येते.
२. निवृत्ती नंतर च्या काळात करमुक्त उत्पन्न मिळण्यास मदत होते.
३. पीपीएफ खात्यातील रक्कम बुडण्याची भीती नसते.
४. पीपीएफ खाते पोस्ट ऑफिस, राष्ट्रीय बँक, खाजगी बँका कुठेही उघडता येते.
५. पीपीएफ खात्यामध्ये ऑनलाईन हि पैसे भरता येतात, त्यामुळे पैसे भरण्यासाठी बँकेत जायची गरज नाही.
लागणारी कागदपत्रे
१. पॅन कार्ड
२. पासपोर्ट
३. आधार कार्ड
४. मतदार कार्ड
५. ड्राइविंग लायसन्स
६. रेशन कार्ड
७. सही केलेला चेक
८. पासपोर्ट च्या आकाराचा तुमचा फोटो
९. खाते उघडण्यासाठी पूर्ण पणे भरलेला अर्ज
१०. जर अल्पवयीन मुलाच्या नावे खाते उघडायचे असेल तर त्याच्या वयाचा दाखला
पूर्ण माहिती सविस्तर वाचण्यासाठी प्रोफाइल बायो मध्ये दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्या.
10/10 #PPF#Blog
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
सरकार देशातील महिलांच्या उन्नतीसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवते. अशीच एक बचत योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ च्या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान जाहीर केली होती, ती म्हणजे महिला सन्मान बचत पत्र योजना
🧵१/n
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे?
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी एक बचत योजना आहे. या योजनेद्वारे २ वर्षांसाठी महिलेने जमा केलेल्या रकमेवर ७.५ टक्के दराने व्याज दिले जाईल. यामुळे महिला त्यांच्या ठेवींची बचत करण्यास मदत होईल.
🔖पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही अधिकृत बँकेत हे खाते उघडले जाऊ शकते आणि किमान रु.१,००० आणि रु.१०० च्या पटीत कोणतीही रक्कम जमा करता येते.
कमाल मर्यादा रु. २ लाख आहे.
घरबसल्या मिळवा तुमचं मतदान / वोटर कार्ड !
१८ वर्षांवरील प्रत्येक भारतीयाला मतदानाचा अधिकार आहे आणि मतदान करण्यासाठी मतदार ओळखपत्र आवश्यक आहे.
आणि आता मतदान कार्ड साठी रांगा लावणं किंवा फॉर्म भारत बसावे लागणार नाहीत हि प्रक्रिया ऑनलाईन अतिशय सोप्पी झाली आहे.
🧵1/n #मराठी#म
मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
नवीन मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन नावनोंदणी प्रक्रिया अगदी सोपी आहे. नोंदणीसाठी, तुम्हाला फक्त भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या संकेतस्थळावर भारतातील निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती, मतदार यादीपासून ते
देशभरातील आगामी निवडणुकांसाठी निवडणूक वेळापत्रकापर्यंत सर्व माहिती आहे. यामध्ये मतदारांसाठी मार्गदर्शक तत्त्वांची यादी आणि नोंदणीसाठी आवश्यक असलेल्या अर्जाचाही समावेश आहे.
नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला फॉर्म ६ निवडावा लागेल. फॉर्म शोधण्यासाठी, तुम्हाला
वाहन चालविण्याचा परवाना काढायचा म्हटलं कि RTO ला चकरा आणि एजेंट ला भरमसाट पैसे !!
सोबत डोक्याला नाहक त्रास !!
आता हि सुविधा एकदम सरळ सोप्पी झाली आहे, आपण ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसेन्स बस काही दिवसांत मिळवू शकता. #मराठी#म
🧵1/n
लर्निंग लायसन्स ची प्रोसेस:
१. सर्वप्रथम तुम्हाला सारथी परिवहन या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. (लिंक साठी प्रोफाइल Bio चेक करा)
२. इथे आल्यावर सर्वप्रथम तुम्हाला आपलं राज्य निवडावं लागेल.
३. राज्य निवडताच तुम्ही खालील पेज वर याल.
४. इथे तुम्हाला Apply Learning Licence
वर क्लिक करायचे आहे.
५. मग तुम्हाला पुढची पूर्ण प्रक्रिया दिसेल त्याला OK करून पुढे जायचं आहे.
६. पुढच्यापर्यायामध्ये General निवडून सबमिट वर क्लिक करा.
७. पुढे तुम्हाला आधार व्हेरिफिकेशन साठी येईल तिथे आधार नंबर टाकून OTP व्हेरिफाय करा.
८. हि प्रक्रिया होताच तुमच्या आधार
गावच्या जमिनीचा ७/१२ उतारा आणि ८-अ उतारा सोबत नकाशा मिळवायचाय ?
मग भू-नकाशा महाराष्ट्र ला भेट द्या.
आता घरबसल्या / शहरात बसून तुम्ही ऑनलाइन गावच्या जमिनीचा नकाशा पाहू शकता ते सुद्धा मोबाईल वर.
गावच शेत आणि जमीन हा मोठा संवेदनशील विषय आहे नाही का ?
शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करता कि म्युच्युअल फंड मध्ये ?
गुंतवणूक कोणतीही असो सर्वात महत्वाचं असत ते म्हणजे डिमॅट अकाउंट.
आणि आपल डिमॅट अकाउंट / म्युच्युअल फंड अकाउंट वाचवायचं असेल तर वेळीच नॉमिनी अपडेट करा !!
शेवटची तारिख ३१ मार्च २०२३.
🧵१/६
नॉमिनी ऍड कारण का महत्वाचे आहे?
२०२१ च्या एका रिपोर्ट नुसार ८२,००० करोड चे बँक अकाउंट, लाईफ इन्शुरन्स आणि PF बँकेत कोणी क्लेम न केल्यामुळे तसेच पडून आहेत असं का झालं ?
कारण त्यांनी नॉमिनीची माहिती भरलीच नाही आणि त्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या परिवाराला हे पैसे मिळालेच नाहीत.
त्यामुळेच आता SEBI या बद्दल ठोस पावले उचलली आहेत जर तुम्ही ३१ मार्च २०२३ पर्यंत हि माहिती भरली नाही तर तुमचं डिमॅट अकाउंट फ्रीझ केलं जाईल.
नॉमिनी तुमच्या परिवारातील कोणतीही व्यक्ती असू शकते जस कि आई, बाबा, बायको , मूल, भाऊ - बहीण.
आधार कार्ड १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक जुने आहे?
तर वेळीच आधार कार्ड अपडेट करा, विनाकारण च्या चार्जेस / लेट फी पासून वाचा !!
पत्ता आणि नाव यात काहीही बदल नसेल तरीसुद्धा अपडेट करणे आहे बंधनकारक !!
प्रोसेस साठी पूर्ण थ्रेड नीट वाचा 👇
🧵 १/n #मराठी#Aadhar#आधार
आधार कार्ड अपडेट करण्यासंबंधी फेब्रुवारी २०२३ मध्ये युआडीएआयने महत्वाची घोषणा ट्विटरच्या माध्यमातून एजन्सीने केली, यामध्ये त्यांनी म्हटलंय कि तुमचं कार्ड (Issue Date) जर १० वर्ष किंवा त्यापेक्षा जुने असेल तर तुम्हाला तुमचा पत्ता आणि ओळख अपडेट करावी लागेल म्हणजेच त्यासंबंधीचे
डॉक्यूमेंट्स वापरकर्त्यांना ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने पुन्हा सबमिट करावे लागतील.
जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने डॉक्युमेंट्स अपडेट करता तर तुम्हाला ₹.५० आणि ऑनलाईन करता तर ₹.२५ सेवा शुल्क भरावे लागते, पण आनंदाची गोष्ट हि कि ऑनलाईन सेवा १४ जून २०२३ पर्यंत पूर्ण मोफत राहील.