( 3 पॅंथरनामा, नामांतर आंदोलन आंबेडकरोत्तर दलित चळवळ )
गावकुसाबाहेरील निश्चल वस्तीत
तू येऊन गरजलास
सारी वस्ती खडबडली
धूळ झटकीत सावध झाली
तुझ्या हाती होता धगधगता हिलाल
हादरून गेले होते सगळे काळोखाचे दलाल..
--साहित्यकार अर्जुन डांगळे. (1)
"दलित" तसेच "अस्पृश्य" म्हणून ज्यांना संबोधित केले गेले, व बाकी सर्व मानवांना मिळणारे समान अधिकार देखील ज्यांना नाकारले गेले.
अशा वर्गसमूहाला माणसात आणण्याचा पहिला प्रयत्न केला ते व्यक्ती म्हणजे महात्मा फुले. त्याच बरोबर छत्रपती शाहू महाराज, सयाजीराजे गायकवाड, गोपाळबाबा (2)
वलंगकर, शिवराम कांबळे यांनी देखील अमानुष व्यवस्था बदलण्याचा आटोकाठ प्रयत्न केला. तसेच या चळवळीला व्यापक रूप देऊन ज्यांनी मानवमुक्तीच्या लढ्याला गतिमान केले ते व्यक्तिमत्त्व म्हणजे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांनी आपल्या गुरूंच्या सत्कार्याची माहिती, (3)
व प्रेरणा घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली. जर तुम्ही महात्मा फुलेंचे अस्पृश्यद्धारासाठी केलेले कार्य पाहिले तर तुम्हांला बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्यामध्ये खूप साम्य आढळून येईल.
एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, (4)
"मी एकटाच आता महात्मा फुलेंचा अनुयायी म्हणून उरलो आहे"
या आधीच्या post मध्ये "महात्मा फुले" व "बाबासाहेब" यांच्या कार्याविषयी व दलित पॅंथर, नामांतर लढा. याविषयी मला जमेल त्या पद्धतीने मी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
यामध्ये आज आपण दलित पॅंथरचे असणारे ज्येष्ठ नेते (5)
अर्जुन डांगळे यांच्या कार्याविषयी पाहूया.
साहित्यकार तसेच दलित चळवळीमध्ये मोलाची भर टाकणारे व्यक्ति म्हणजे ज्येष्ठ दलित नेते, साहित्यकार, कवी अर्जुन डांगळे होय.
लेखक व कवी असणाऱ्या अर्जुन डांगळे यांचा जन्म दिनांक 15 जून 1945 रोजी मुंबई येथे झाला. भारतीय प्रमुख लेखकांपैकी (6)
एक असणारे डांगळे हे "दलित पॅंथर" या संघटनेचे संस्थापक सदस्य होते. ज्या चळवळीने 1970 च्या दशकात समाजातील सामाजिक अन्याय आणि असमानतेविरुद्ध दलित तरुणांना जागृत केले होते.
पुढे आक्रमक अशा दलित पॅंथरची निर्मिती होण्यामागे असणारी कारणे स्पष्ट करताना डांगळे म्हणतात, (7)
"महाराष्ट्रात सत्तरच्या दशकात दलितांवरील अन्याय वाढले होते. त्यावेळी दलित साहित्याची चळवळ सुरू झाली होती. आम्ही ही सर्व लिहिते होतो. कोणी कविता लिहित होता, तर कोणी लेख. अमेरिकेतील black panther ची स्थापना करणारी मंडळी पाहिली तर तेही सर्व लेखक होते. त्यावेळी आम्हाला सर्वांना (8)
वाटले नुसते कथा कविता आणि लेख लिहून भागणार नाही तेव्हा आम्ही देखील दलित साहित्य पासून दलित शब्द आणि पॅंथर पासून "दलित पॅंथर" संघटना सुरू केली.
तसेच डांगळे यांनी आपल्या दलित विद्रोह या ग्रंथ संग्रहाद्वारे समाजाला दिशा व प्रेरणा देण्याचे प्रभावी काम केले. व या ग्रंथाद्वारे (9)
त्यांनी मुख्य प्रवाहातील साहित्यात तत्कालीन प्रचलित जुन्या मिथकांचे निर्णायकपणे खंडन केले.
तसेच त्यांच्या "कवी" या पैलूकडे जर पाहिले, तर त्यांच्या "छावणी हलते आहे" या काव्याला राज्य पुरस्कार देऊन त्यांना महाराष्ट्र शासनाकडून मान्यताही मिळाली आहे, व त्यांच्या एकूणच कार्य (10)
कर्तृत्वाकडे पाहिले तर त्यांच्या "विषयुक्त ब्रेड" या काव्यसंग्रहांनी भारतीय लेखकच नव्हे तर पहिले राजकीय राष्ट्राध्यक्ष "नेल्सन मंडेला" ही खूप प्रभावित झाले.
त्यांनी डांगळेंचे भरपूर कौतुक केले व नेल्सन मंडेलांनी आपले आत्मचरित्र (11)
"Long Walk to Freedom" सादर करून त्यांचा गौरव केला.
आंबेडकरी चळवळीसाठी आपले प्राण पणाला लावून व्यवस्थेशी लढलेल्या सर्व लढवय्यांना मानाचा सलाम..🙏🙏
(संविधान आणि त्याची नैतिक मूल्य जपणे आजच्या काळाची गरज.)
वर्षानुवर्षे गुलामगिरी त जीवण कंठणाऱ्या समाजाला मनुष्य म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या घटनात्मक राजकीय आणि सामाजिक विचारात टाकलेली भर ही (1)
देशाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करणे हे प्रत्येकाने आपले परमकर्तव्य मानले पाहिजे, असा संदेश देणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय राज्यघटनेच्या व निर्माण केलेल्या नव्या समाजव्यवस्थेचे रक्षण व पालन करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले (2)
घटना समितीतील अखेरचे भाषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते.
राष्ट्राच्या भवितव्यासंबंधी आपले मत व्यक्त करताना बाबासाहेब म्हणतात,
"भारत २६ जानेवारी १९५० ला स्वतंत्र होईल. या स्वातंत्र्याचे काय होईल? तो आपले स्वातंत्र्य रक्षण करील की पुन्हा गमावून बसेल, हा माझ्या मनात पहिला प्रश्न (3)
( जातीअंताच्या चळवळीचा समग्र प्रवास महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर )
असंख्य भारतीय समाज सुधारकांना आजही प्रेरणा देणारे, आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे भारतीय सामाजिक क्रांतीचे उद्गाते क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले, आजही-- (1/18)
कित्येक सामाजिक क्रांतीकारकांमध्ये तसेच समाजसुधारकांमध्ये महात्मा फुलेंचे नाव हे सूर्याच्या किरणांप्रमाणे तितक्याच प्रखरतेने व तेजाने आजही चमकत आहे,
याला कारणही तसेच आहे. जेंव्हा 19 व्या शतकामध्ये "मानवमुक्तीची चळवळ" जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन समाज सुधारकांनी जातीयता (2/18)
नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांच्या या कृतीचा भारतीय जनमानसात सखोल असा कोणताच परिणाम झाला नाही.
कारण अस्पृश्यतेचे मूळ असणारा चातुर्वरण्यांचा सिद्धांत व त्यातून निर्माण झालेली सामाजिक विषमता व त्या आधारित जातीभेद नष्ट करणे, हे त्या समाजसुधारकांचे मुख्य (3/18)
#सावित्रीमाईंनी ज्यांच्या नेतृत्वात "केशवपन" परंपरेला विरोध करत सर्व न्हाव्यांचा संप घडवून आणला असे, भारतीय संघटित कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे एक समाज सुधारकाबरोबर उत्तम पत्रकार देखील होते..(1/15)
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्थापलेल्या "सत्यशोधक समाज" मुंबई शाखेचे अध्यक्ष असणारे नारायण मेघाजी लोखंडे यांचा जन्म इ.स १८४८ रोजी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला.
अतिशय गरीब परिस्थितीतून लोखंडेंनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. व ते रेल्वे (2/15)
खात्यात कारकून म्हणून तर 'पोस्ट खात्यात' काही काळ नोकरीस राहिले, पुढे लोखंडेंनी मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळवली.
तिथे त्यांनी दिवसातून १३-१४ तास दहशतीच्या वातावरणात काम करीत असलेले गिरणी कामगार बघितले. (3/15)
"स्त्रियांनी शिकावे" हे ज्यांचे ब्रीद वाक्य होते. व विधवा पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केले, अश्या भारतीय स्त्रीवादाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंचे एकूणच सर्व कार्य समाजाला आजही प्रेरणा देणारे आहे. (1/27)
#समानता व बंधुभावाचे मूल्य समाजात रुजवणारे तसेच 'श्यामची आई' ही अजरामर साहित्यकृती निर्माण करणारे थोर स्वातंत्र्यसैनिक, साहित्यिक आणि संवेदनशील शिक्षक पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच साने गुरुजी मानवतेविषयी महान असा संदेश देताना म्हणतात, (2/16)
"आपल्याला वैचारिक दर्जा वाढवायचा असेल तर मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न करा.
व्देषाची लाट आली तर, प्रेमाचा सिंधू घेऊन चला.
संकुचितपणा येत असेल तर विशालता घेऊन चला.
क्षुद्रता पेरू पाहात असाल तर उदारता घेऊन चला.
मनात अंधारुन येत असेल तर प्रकाशाचे झोत आणा." (3/16)
असे प्रतिपादन करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शेतीविषयक विचारांना गती देणारे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी हाच विचार अधिक समृद्ध करत (2/12)
"शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला."
तसेच "शेतकऱ्यांनी शिक्षण घेतल्याखेरीज त्यांच्यामध्ये नवविचार, नवतंत्रज्ञानाची बीजे रुजवता येणार नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षणाची कास (3/12)