दादासाहेब गायकवाड हे ‘जमीनी’च्या लढ्यांना आंबेडकरवादी विचार देणार खूप महत्वाच नाव.
मराठवाड्यातील गायरानांचा प्रश्न असूदे वा शहरांतील झोपडपट्टीचा प्रश्न असूदे दादासाहेबांनी तो हिरारीने मांडला.
पण ह्याच मुळे काहींनी त्यांना डावे ठरवायचा डाव ही रचला. (१)
त्यांच्या नंतर जमीनींच्या प्रश्नांवर व्यापक सर्वसमावेशक असे काम केले गेले नाही. जे आहेत छोटे छोटे लढे होते, त्यांना आंबेडकरी विचारांची बैठक नव्हती.
आजही जमीनींच्या प्रश्नाबद्दलचा बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका एकदम पक्की आहे. त्यामुळे कोणत्याही जमीनींच्या लढ्यात ते पुढे असतात,(२)
तो लढा कोणताही पक्ष चालवत असला तरी त्यांच मार्गदर्शन घेतलच जात. पण दुसर्या फळीतील नेतृत्वाने सुध्दा केवळ सामाजिक लढे न उभारता जमीनींच्या लढ्यांकडे सुध्दा गांभीर्याने बघितल पाहिजे. आंबेडकरी विचार सर्वदूर पसरवण्यासाठी जमीनींचे लढे मार्ग होवू शकतात हे लक्षात घेतल पाहिजे. (३)
आज तुम्ही कितीही शिव्या घालत असला तरी डाव्या विचारांनी संपूर्ण देशभर जमीनींचे लढे जीवंत ठेवलेले आहेत. त्यावर ते सतत सामान्यांच्या ही जवळ आहेत. आजही लढ्यांसाठी डावा विचारांची नेतृत्वाची अपेक्षा न ठेवता पुढे असते.
(४)
आता आंबेडकरी विचारांच्या तरूणांनी सुध्दा याचा विचार करणे गरजेचे आहे. कारण जमीनींचे लढे संपणारे नाहीत. जमीन निर्माण करता येत नाही ती लाख वर्षापासून तेवढीच आहे पुढेही तेवढीच राहिल. फक्त तीची मालकी बदलत राहणार आहे आणि किंमत.(५) @gunvantsr@drsachinshinde
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
#thread
तीन वर्षापूर्वी रतन खत्रीवर लेख लिहला होता.
त्या दिवशी अनेकांचे कॅाल आलेले लेख वाचून
पहिलाच कॉल एका स्त्री चा आलेला, तिने ज्या दिवशी तिला रतन खत्री गेल्याचे कळले त्यादिवशी उपवास केला होता.
दोन भाईंनी मला मटका शिकवण्याची गळ घातली.
(१) divyamarathi.bhaskar.com/amp/news/avina…
एक तर मागेच लागले होते , तुम्ही 'प्रोफेसर' आहात तुम्ही मला ह्या आठवड्यातले आकडे सांगायलाच पाहिजे. तुम्हाला चांगलं गणित जमत असणार.
एक जण म्हणाले तुम्ही लेख अर्धवट लिहलाय, तुम्ही मटका कसा खेळतात हे सांगितलेच नाही, खूप कर्ज आहे. मटक्यातूनच काहीतरी मार्ग निघेल. (२)
खत्री वर त्यांचा खास माणूस असा लेख लिहू शकतो,तुम्ही 'पंटर' असणार, मला एजन्सी मिळेल का?
एक जण म्हणले तुम्ही सुलतान भाई ज्यांची प्रेस आहे ,तिथे हे पेपर छापतात, मटक्याला लागणारे त्यांना माझा निरोप सांगा
मला एकाने माझे वय विचारले ,ह्या आठवड्यात तो आकडा नक्की लागेल असे भाकीत केलंय(३)
मारी भारी का माहितेय, कर्नन मध्ये 'येमन' च्या पात्राला दिलेला न्याय. येमन हाच खरा मुख्य केंद्र आहे ह्या फिल्मचा.
येमन हा ह्या देशात घडलेल्या प्रत्येक जातीय हत्याकांडाचे प्रतिनिधित्व करतो. (१)
त्या जातीय हत्याकांडांतील त्यांचा संघर्ष, त्याग आणि सांडलेल्या रक्ताला न्याय देतोय. पोचिराम कांबळे, विलास घोगरे, भोतमांगे परिवार, रमाबाई हत्याकांडातील शहीद, नांमातर लढ्यातील शहीद आणि इतर सगळ्यांना मानवी 'चेहरा' देण्याचे कार्य येमन च्या पात्रातून मारीने केलय.
(२)
येमन हा चळवळींच्या इतिहासाचा प्रतिनिधीय, दलित पँथर चा प्रत्येक कार्यकर्ताय त्यांचा संघर्षय. त्या सर्वांना 'चेहरा' दिलाय मारील.
कर्नन हा येमन च्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करतोय. त्याच्या त्यागाचे संपूर्ण स्मरण करून. येमन हे इथल्या प्रत्येक असर्शन चे प्रेरणा बिंदूय.(३)
प्रकाशन समारंभ - शनिवार, ३ जून २०२३
वेळ - सायंकाळी ५.०० वाजता
स्थळ - कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक
मूल्य - ३०० रु.
Phone Pay / Google Pay - 7020045653 (Ashay Yedge)
(१)
राहुल बनसोडेच्या निधनानंतर ब्लॅक इंक मीडिया आणि राहुलच्या मित्र परिवाराने त्याच्या निवडक लेखांचा संग्रह प्रसिद्ध करण्याचे ठरवले आहे. या निवडक लेखसंग्रहाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
(२)
गेल्या महिन्यापासूनच या पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू करण्यात आली होती आणि त्याला संमिश्र असा प्रतिसाद मिळाला आहे.या पुस्तकाचे मूल्य ३०० रुपये असून छपाई आणि वितरणाचा खर्च वगळून या पुस्तक विक्रीतून येणारे सर्व उत्पन्न हे राहुल बनसोडे यांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे(३)
गिरणगावचा विचार केला की साधारण लालबाग परळ हा भागच डोळ्यासमोर तराळतो. कारण त्यामागे केलेले डॉक्युमेंटेशन आहे. बर्यापैकी याभागावर साहित्यिक मुल्यांतून वा सामाजिक आशयातून लिहलेले आहे. मागे मी बोलल्या प्रमाणे गिरणगावचे तीन सांस्कृतिक भागात विभागणी होते.(१)
शहरांना कधीच संस्कृती नसते वा सभ्यता नसते. बाहेरून आलेले लोक शहरांना ओळख देत असतात. गिरणगावात देखिल तसेच होते. कोकणी बहूल लालबाग-परळ, कोल्हापूर मिश्र वरळी, पारशी प. महाराष्ट्र बहूल नायगाव दादर असे भाग केले जातील. गावांकडून आलेल्या चाकरमाण्यांनी आपल शेत सर्व काही आणले.(२)
अशी विभागणी होण्यास मास्तर नावाचे पद कारणीभूत होते. मास्तर चा खाक्या व कापड खात्यात असणारी वचक त्यातून आपल्याच भागातले कामगार भरण्यापर्यंत चक्र होते.
लालबाग नावाप्रमाणे 'लाल' होता. मिलांवर लालबावटा चेच वर्चस्व होते. वरळी तसे दोलायमान होते.(३)
Long thread #चुनाभट्टी
मुंबईतल्यांना चुनाभट्टी हे नाव सहज माहीतेय. हार्बर ला रेल्वे स्टेशन ही आहे त्या नावाचे.
मुंबईतली ब्रिटिशकालीन जी काय बांधकामे झालीत, आणि आजही ही मजबूत आहेत याचे संपूर्ण श्रेय चुनाभट्टी भागाचे आहे. चुन्याच्या खूप मोठ्या भट्ट्या त्याभागात होत्या. (१)
चुन्याच काम हे सिमेंटच्या कामापेक्षा कितीतरी मजबूत.जुन्या गड किल्ल्यांची पण साक्षय याला.
मुंबईत आता चुनाभट्टी नाहीत,मला चुनाभट्टी बघायला मिळाली रत्नागिरी मधल्या जुवे गावात.जुवे म्हणजे खाडीतले बेट.खाडीत मिळणारे शिंपले गोळा करून भट्टीत भाजून मग चोपले की बारीक शुभ्र चुना मिळतो(२)
हे वाचायला जेवढे सोप्पे वाटते तेवढेतर नक्कीच नाही.
गोलाकार भट्टीत लाकडाचा थर द्यावा लागतो. थोडीही जागा न ठेवता तो मांडवा लागतो. मध्ये उभा ओंडका बसेल एवढीच जागा ठेवायची, मग त्यावर शिंपल्यांचा थर लावायचा. परत लाकडांचा थर लावायचा. अशे पाच थर लावायचे.(३)
हे आहे साखरी नाटे.
४००० वा थोडी कमी जास्ती लोकसंख्या. साखरी नाट्यात साधारण ५०० मोठ्या तर २०० च्या वर छोट्या बोटी आहेत.मोठ्या बोटीवर ४० च्या आसपास काम करतात. तर छोट्या बोटावर १० जण काम करतात. हे बघता एकूण २२ हजार लोकांना काम यातून मिळत. हे फक्त मासेमारी शी निगडित(१)
मासे विकणे , त्याचे परिवहन , प्रक्रिया याचा यात उल्लेख नाही. ते धरले तर ४० हजार हून अधिकचा रोजगार केवळ साखरी नाटे हे बंदर देते. एक मोठी बोट व त्यावरचे इतर सामान यांची किंमत साधारण ७० लाखांच्याही वर जात असते. म्हणजे ३५० कोटी हे बोटींसाठी लागलेत.(२)
आणि दिवसाला ३ कोटींची उलाढाल ह्या बंदरातून होत असते. आजही हे बंदर पुर्ण क्षमतेने कार्य करत नाही. कारण बंदरावर जाण्यासाठी मोठा रस्ता नाही किंवा मोठी जेट्टी सुध्दा नाही. त्याची अंमलबजावणी केली तरी लाखभर रोजगार निर्माण करण्याची क्षमता ह्या ‘गावाची’ आहे.(३)