उत्तर प्रदेश निवडणूकीच्या थोडं आधी @iamsrk चा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. ती अटक खंडणी उकळण्यासाठी केली होती हे रोज पुराव्यानिशी तत्कालीन मंत्री @nawabmalikncp हे मांडत होते. तेव्हा अनेक लोक मलिक साहेबांना दोषी ठरवत होते. (१)
आता त्यावेळचा NCB zonal director समीर वानखेडे याच्याविरोधात CBI ने FIR दाखल केली आहे. कोट्यावधी रूपयांची खंडणी उकळण्यासाठी आर्यन खान याला अटक केली होती. हे आता CBI च सांगत आहे. नवाब मलिक यांनी केलेले आरोप पुर्णतः खरे ठरत आहेत. (२)
वानखेडे हा मोठा देशभक्त असल्याचं लोकांना वाटत होतं. तो स्वतः ही सारखं देशभक्त असल्याची पुंगी वाजवायचा. मात्र त्याचे कारनामे काय आहेत ते हळूहळू समोर येत आहे. नवाब मलिक यांना अटक केली आहे, वर्ष उलटून गेलं आहे, मात्र या बदमाश अधिकाऱ्याला expose करायचं काम त्यांनी आधीच केलं होतं(३)
गुजरातच्या बंदरावर मोठ्या प्रमाणात हजारो कोटींचे ड्रग सापडले होते मध्यंतरी. मात्र त्यावर काही कारवाई झाल्याचं ऐकिवात नाही. इथं आर्यन खान याच्याकडे गुंजभर ही ड्रग नव्हतं तर त्याला वीस पंचवीस दिवस तुरूंगात काढायला लागले. हे नीच अधिकारी आम्हा तुम्हाला काय वागणूक देतील? (४)
अलिकडे जरा बरे दिवस येत आहेत. नकली देशभक्तांची हरामखोरी बाहेर येत आहे. नवाब मलिक यांच्यासारख्या चांगला नेता दुर्दैवाने आत आहे याची खंत वाटते. मलिक साहेब आज बाहेर असते तर अनेक नकली अधिकाऱ्यांना नागवं केलं असतं. (५)
बाकी वानखेडेकडे भरपूर सारा पैसा पाणी आहे. त्याच्या जोरावर तो सुटेलही, मात्र नवाब मलिक साहेबांनी केलेले आरोप खरे होते हे तरी सिद्ध झालं. आज मलिक साहेब बाहेर असते तर नक्की शायऱ्या ऐकायला वाचायला मिळाल्या असत्या. #sameerwankhede#NCB#cbi#srk
• • •
Missing some Tweet in this thread? You can try to
force a refresh
धनगरांच्या घरी जन्मलेला मुलगा, तिथून वकील झाला, नंतर राजकारणात आला आणि आज दूसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या जेव्हा शपथविधीसाठी उठले तेव्हा लोकांचा जल्लोष बघण्यासारखा होता. स्टायलिश नाही, उच्चवर्णीय नाही मात्र लोकांना तो आपला वाटतो (१)
सिद्धरामय्या यांचे व्हायरल होणारे रील किंवा व्हिडिओ बघा. त्यात अतिरंजित किंवा लै भारी असं ईडिटींग नाही. आपल्या नगरसेवक लोकांचे कितीतरी स्टायलिश व्हिडिओ प्रसिद्ध होत असतात तशी इथं काही भानगड नाही. इथे जो काही आहे तो सच्चेपणा आहे. (२)
लोकनेते, जननायक अशा बिरूदावली कुणालाही हल्ली लावल्या जात असतात. मात्र सक्रीय राजकारणात असूनही सर्वसामान्यांत लोकप्रिय असणे फार कमी लोकांना जमतं. त्यात सिद्धरामय्या परफेक्ट बसतात. (३)
महाराष्ट्रात भाजपचा पराभव होणार हे आज @Dev_Fadnavis यांनी आज अप्रत्यक्षपणे मान्य केलं. ते म्हणाले कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, इथे फक्त मोदी पॅटर्न चालेल.
पराभवाची चाहूल लागली की माणूस कधीच स्वतःवर जबाबदारी घेत नाही. फडणवीस यांनी मोदींना पुढं करून (१)
स्वतःला पराभवास कारणीभूत होण्यापासून वाचवलं आहे.
महाराष्ट्रात भाजप विरोधी जोरदार वातावरण आहे. त्याच भितीमुळे जिल्हा परिषद, नगरपरिषद, महानगरपालिका इ. निवडणूक घेण्याचे धाडस भाजप करत नाही. त्यांना माहीत आहे निवडणूक लागली रे लागली लोक भाजपला पाडायची वाटच बघत आहेत. (२)
कसब्यातील भाजपच्या बालेकिल्ल्यात जर देवेंद्र फडणवीस तळ ठोकूनही लोकं भाजपला पाडत असतील तर देवेंद्र फडणवीस सारख्या चाणाक्ष माणसाला अंदाज यायला किती वेळ लागतो? (३)
भारत जोडो यात्रेची भाजप आणि त्यांच्या बेअक्कल भक्तांनी यथेच्छ चेष्टा केली. मात्र सर्वसामान्य लोक @RahulGandhi ला येऊन भेटत होते, मिठ्या मारत होते. देशात जातीधर्माच्या उकीरड्यावर भाजपची डुक्करं नंगानाच करत होती. तेव्हा समतेची मशाल हाती घेऊन राहूल भारत जोडत होता (१)
गॅस सिलिंडर, डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, खतांच्या किमती, जीएसटी रूपी लागलेला घोडा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. त्याची हातातोंडाशी गाठ पडेपर्यंत नाकी नऊ येत आहे (२)
भाजपचा खासदार ब्रिजभूषण सिंह महिला खेळाडूंवर बलात्कार करतो. त्या खेळाडू मुली बसल्या आहेत बोंबलत रस्त्यावर आणि इकडे निर्लज्ज भाजपचे भक्त केरळ स्टोरी हा प्रचारकी सिनेमा दाखवत आहेत. (३)
बहुचर्चित केरळा स्टोरी चित्रपट पाहिला. असा बकवास शनिमा गेल्या अडीच हजार वर्षांत झाला नव्हता असे मत आमचे झाले आहे.
हिंदू मूसलमान पेटलेली भांडणं पेटवणे हा उद्देश जरी असला, तरी ते पण नीट जमलं नाही. आजकालच्या मुस्लिमेत्तर पोरी यडपाट आहेत असे दिग्दर्शकाला वाटते (१)
Propoganda फिल्म करायची तर काय तर लॉजिक हवं. लॉजिक काय? तर मूसलमान लोक इतरधर्मीय पोरी पळवून नेतात आणि त्यांना सेक्स स्लेव म्हणून आयसिस सारखी संघटना वापरते. खरंतर असला ष्ट्राँग विषय असताना त्याचा पार चगळा चोथा करून ठेवलाय. (२)
त्यातील नायिका एवढी बालिश दाखवलीय कि खात्रीने सांगतो एवढ्या बालिश पोरी आता दुनियेत राह्यला नाहीत. हिजाब घातल्याने बलात्कार टळतात, मुसलमान मैत्रीण ड्रग चारते ते हि खाते, त्याचवेळी ती का या गोळ्या खात नाही? असा साधा प्रश्न पडत नाही (३)
कोकणातील रिफायनरी प्रकल्पाला विरोध का ?
आधी नाणार येथे होत असलेला प्रकल्प आता दूसरीकडे स्थलांतरित करण्यात आला आहे. त्याठिकाणी सर्वेक्षण सूरू झाल्यावर गावकरी आणि स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आहे. कुणाच्याही जमीनी जाणार म्हणजे विरोध हा असणार हे साहजिक आहे, मात्र... (१)
या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे तो जमिनीच्या बदल्यात जो मोबदला देणार आहेत त्याच्यावरून नाही. तर त्याची कारणं वेगळी आहेत. ती कारणं पाहिली तर आपणही एक नागरिक म्हणून या प्रकल्पाला विरोध करायला हवा असं मला वाटतं. (२)
कोकण हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रांत आहे. तिथल्या एवढी जैवविविधता सर्वत्र आढळत नाही. जैवविविधता म्हणजे काय? कोकणातल्या समुद्रात अनेक प्रकारचे मासे,खेकडे, कासवं आणि समुद्री जीव आहेत.
समुद्रात अनेक वनस्पती सुद्धा असतात. शेवाळांचे निरनिराळे प्रकार आढळतात. (३)
आज छत्रपती राजाराम कारखाना निवडणुकीचा निकाल आला आणि तिथं महाडिक गटाला एकहाती सत्ता मिळाली. हि निवडणूक एका कारखान्याच्या सभासदांपूरती जरी मर्यादित असली तरीही बंटी पाटील यांनी प्रचारात स्वतः उतरल्यामुळे हि निवडणूक राज्यभर चर्चेत होती. 'कंडका पाडायचा ' हे स्लोगन चर्चेत होते (१)
बंटी पाटील हे कल्पक प्रचारयंत्रणा नेहमी राबवत असतात. @ruturajdyp यांच्या निवडणूक कार्यक्रमात असेल, गोकुळ संस्थेच्या निवडणुकीत चांगली प्रचारयंत्रणा राबविली होती. (२)
हा कारखाना अप्पा महाडिक यांच्याकडे जवळपास २८ वर्षांपासून आहे. एवढ्या प्रदीर्घ कालावधीनंतर यावेळी कुठेतरी मोठे आव्हान मिळालेय अशी हवा माध्यमातून होती. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या आणि सहकारी संस्थांच्या वेगळ्या. (३)