पत्रिका न काढता, कुंडली न बनवता, ती न पाहताही आयुष्यात यशस्वी होता येतं याचा धडधडीत पुरावा म्हणजे १ जून जन्मतारीख असलेली कर्तृत्ववान माणसं..!
तारीख, वेळ, दिवस, वार, हे सर्व माणसानं मोजण्यासाठी बनवलेली एककं आहेत.
जसं किलो, मीटर, फूट ही जशी एककं.,
तसलंच हेसुद्धा एक एकक ही साधी सोपी गोष्ट समजून घेतली की, यश त्या गोष्टींवर अवलंबून नसतं, तर यश माणसाच्या कर्तृत्वावर, कर्मावर ठरतं हे मान्य करायला लागतं..!
गावोगावी शाळा काढल्या आणि अशा शाळांमध्ये जाणारी अडाणी आईबापाची लेकरं, जन्म तारीख विचारली तर ह्यो जन्मला तवा संक्रांत ४ दिसांवर होती, दिवाळी तोंडावर होती, तवाच्या साली दुष्काळ पडला होता बघा अशी उत्तरे मिळत.
गुरुजींनीच मग शाळेसाठी म्हणून १ जून १९६५, ६६, ६७, ६८...अशा तारखा टाकल्या.
रीतसर शिक्षण घेतलेली ही पहिली पिढी आपल्या कर्तृत्वाने यशस्वी झाली. नेटाने संसार केला. आपल्या पोरांना इंजिनिअरिंग, मेडिकल, लॉ, असं उच्चशिक्षण दिलं.
आणि, आता यांची हीच उच्चशिक्षित पुढची पिढी, पत्रिका, कुंडली, मुहूर्त यात अडकून पडली आहे.
जस चूल-मूल यात अडकलेली स्त्री शिकण्यासाठी समाजसुधारकांनी खस्ता खाल्या, सनातन्यांचा रोष पत्करला, सावित्रीबाईंनी शेणामुताचा मारा सहन केला.
तीच स्त्री शिकली आणि आज गुरुवार बघून शामबालेची कथा वाचत बसली, बाबा महाराजांच्या बैठकीला जाऊन बसू लागली, संकंटांवरचा इलाज भटाकडे शोधू लागली...
समाजात आलेल्या या नव्या कुंडली, पत्रिका, मुहूर्त तसेच अनेक बाबा, भट, महाराज यांच्या मागे लागण्याआधी आपण आपल्या बापजाद्यांनी या गोष्टी कधी केल्या होत्या का..??
त्यावाचून त्यांचं कधी काही अडलं होतं का..??
याचा साधा सरळ विचार केला पाहिजे व मिळणारे उत्तर स्वीकारले पाहिजे.
नाहीतर या शिकलेल्या तिसऱ्या-चौथ्या पिढीपेक्षा, पहिल्या पिढीला शाळेत घालणारी व लौकिक अर्थाने अडाणी असणारी पिढीच खरी बुद्धिमान पिढी म्हणावी लागेल.
आत्ताच्या पिढीने मात्र निव्वळ घोकंपट्टी करून डिग्र्या घेतल्या खऱ्या पण बुद्धीचा वापर केला का हे पाहणं एक संशोधन ठरेल.
असो...
आज वाढदिवस असणाऱ्या सर्वांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक-हार्दीक शुभेच्छा..!!💐💐♥️
एकदा काय होतं,
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे खाजगी हेलिकॉप्टर बंद पडते.
पायलट लाख प्रयत्न करून बघतो पण निष्फळ, काही उपयोग होत नाही.
अखेरीस व्हाईट हाऊसमध्ये कार्यरत ड्युटी इंजिनिअरला पाचारण करतात, तो संपूर्ण हेलिकॉप्टर २-३ वेळा तपासून बघतो पण त्यातला दोष त्यालाही सापडत नाही.
मग स्थानिक इंजिनीअर्स येतात, कुणी इलेक्ट्रीकल तर कुणी मेकॅनिकल क्षेत्रातील मातब्बर असतात, सगळं इंजिन खोलून, तपासून परत जाग्यावर बसवतात पण काही म्हणता काही ही उपयोग होत नाही, हेलिकॉप्टर मात्र ढिम्मच, जागचं हलायला काही तयार नाही....
अखेरीस हेलिकॉप्टर कंपनीमधील इंजिनीअर्स ला थेट अलास्का वरून बोलावण्यात येतं...
आता खुद्द राष्ट्राध्यक्षांचं काम म्हटल्यावर बिचारे हातातलं सगळं काम सोडून धावत पळत व्हाईट हाऊस गाठतात.
ते सगळी माहिती घेतात, सगळं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा तपासतात पण त्यांनाही त्यात कुठलाच दोष अढळत नाही.
महाराष्ट्रात आदिमायाशक्तीची एकूण साडेतीन शक्तिपीठं आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी माता एक शक्तिपीठ,
तुळजापूरची भवानी माता दुसरं तर,
माहूरची रेणुका माता तीसरं आणि,
नाशिक जिल्ह्यातील वणी-दिंडोरी येथील सप्तशृंगी माता हे अर्धं शक्तीपीठ...
तसेच, पेशवाईतील साडेतीन शहाणे ही महाराष्ट्राच्या इतिहासात तितकेच प्रसिद्ध आहेत...
सखारामपंत बोकील एक शहाणा, देवाजीपंत चोरघडे दुसरा तर,
विठ्ठल सुंदर हा तिसरा,
हे झाले पूर्ण शहाणे कारण हे मुत्सद्दी तसेच योद्धेही होते.
आणि उरलेला अर्धा शहाणा म्हणजे नाना फडणीस जो फक्त मुत्सद्दी होता.
आणि तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रातील जनतेत साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांपैकी प्रचलित असलेले साडेतीन मुहूर्त...
मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणून ज्याचं स्वागत गुढ्या व तोरणं उभारून केलं जातं तो गुढीपाडवा हा पहिला मुहूर्त...
मित्र, नामे अजय राहाणे, राहणार पंचकेश्वर, ता.निफाड, जी.नाशिक याच्यासोबत सकाळी दुरध्वनी द्वारे चर्चा झाली, विषय अर्थातच काल निफाड तालुक्यात झालेल्या गारपिटीसंदर्भातील होता...
अजयचं स्वतःचं क्षेत्र म्हणाल तर नाममात्र एकरभर, त्यात त्याने ७५% अर्थात दिड बीघा द्राक्षबाग केलेली आहे व उर्वरित अर्धा बीघा म्हणजे १० गुंठे हे तो घरच्या दुभत्या जनावरांच्या वैरणीसाठी राखून ठेवत असतो.
या दीड बीघा क्षेत्रात तो थॉमसन सिडलेस नामे द्राक्षाच्या व्हरायटीचं उत्पादन घेत असतो, वर्षभर त्याची निगा राखणे, त्याला वेळच्यावेळी खतं-औषधी फवारणं, वेळच्यावेळी मजुरांद्वारे डिपींग-थिनिंग सारखी कामं करुन घेणं, या सर्व मशागतीपोटी त्याला वर्षाकाठी दिड-पावणेदोन लाखाचा खर्च पडतो.
२०१३ मध्ये कांदा ७००/- रुपये क्विंटलने विकला होता आणि २०२३ ला, कालच कांदा ७००/- रुपये प्रति क्विंटलनेच विकला आहे...
फरक इतकाच आहे, २०१३ मध्ये डिएपी ५६०/- रुपयांना एक बॅग होती आज १९००/- रुपयांना एक बॅग आहे..
तेव्हा लागवड मजुरी ५०००/- रुपये एकर होती आता ११,०००/- रुपये एकर आहे...
मजूर तेव्हा ५००/- रुपयांचा गॅस भरत होता, तोच आज १२००/- रुपयांना झालाय...
२०१३ ला ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर मशिन ६,००,०००/- रुपयांत सहज बसून जात होते आज तोच संपूर्ण सेट घेतला तर ११,००,०००/- रुपये लागत आहेत.
तेव्हा मिळणारी १५,०००/- रुपयांची बैलजोडी आज ५५,०००+ रुपयांच्या घरात गेली.
तसे तर मराठी रियासतीमध्ये अनेक आयांनी असे बरेच योद्धे जन्माला घातलेत ज्यांनी आपले प्राण याच मराठी रियासतीच्या रक्षणार्थ ऐन तारूण्यात रणांगणावर खर्ची घातले...
मग ते सिंहगडाचे सिंह सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे असुदेत वा बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणारे दत्ताजी शिंदे असुदेत...
शुजा उद्दौल्लाह ने ज्यांच्या मृत्युपश्चात फक्त गोऱ्यापान चेहऱ्यावरच ४० जखमा मोजल्या ते विश्वासराव पेशवे असोत वा निव्वळ "समयी का पावला नाहीत" म्हणणाऱ्या राजांच्या क्रोधाला उत्तर म्हणून केवळ ७ जणांना सोबत घेऊन मोगली छावणीत कहर माजवून मृत्युस आलिंगन देणारे प्रतापराव गुर्जर असोत...
या समस्त मराठी इतिहासात दोन शुरवीरांचे मृत्यू मात्र मनाला चटका लावून जातात...
त्यांचा इतिहास वाचतांना मनाला प्रचंड दाह झाल्याशिवाय राहत नाही आणि तोच दाह आज लेखणीतून रीता करावा या प्रामाणिक उद्देशाने आज काहीतरी अपणासमोर मांडतोय...