/मराठी, #महाराष्ट्र Profile picture
#मराठी भाषेचा गौरवासाठी बोलावे ते 'बोली'तच! #बियाँडमराठी #म https://t.co/OywkU9FlAh https://t.co/DdyKhBr7Je
Jan 5, 2021 20 tweets 8 min read
इंग्रजांनी नोट छापण्याकरिता नाशिक ठिकाणचं का ठरवलं (#इतिहास)
पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आ। हे. आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे. इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा. त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते.
#म #मराठी बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत. पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे. नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा. हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे. अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे.
Apr 22, 2020 6 tweets 2 min read
जे #रामायण बघत आहेत त्यांनी बघितलं असेल की रावण जेव्हा सिंहासनावर बसलेला दाखवत असत तेव्हा त्याच्या पायाखाली एक माणूस हा असा पडलेला असायचा. हा माणूस कोण होता ? रावणाच्या पायाखाली सिंहासनाच्या समोर या अशा अवस्थेत शनिदेव असायचे. रावणाने फक्त देवांना त्रास दिला नाही, त्याने नवग्रहांनाही आपल्या मुठीत ठेवलं होतं. त्यांना डांबून तो त्यांना लंकेला घेऊन गेला होता.

रावण ज्योतिषविद्येत पारंगत होता. जेव्हा मेघनादचा जन्म होणार होता तेव्हा रावणाने सगळ्या ग्रहांना अशा घरांमध्ये बसवलं की होणारा मुलगा अजय, अमर होईल.
Apr 12, 2020 14 tweets 4 min read
नमस्कार
आज आपल्या सगळ्यांबरोबर मुद्दाम एक प्रसंग शेअर करीत आहे की, जेणेकरुन कोरोनाच्या या भयावह संकट काळात आपण सकारात्मक मानसिकता ठेवून विचार केल्यास प्रशासनास काय सहकार्य करू शकतो हे सर्वांच्या लक्षात यावे .ही कसोटीची वेळ आहे. एकटे सरकार कदाचित याच्याशी लढू शकणार नाही. जोपर्यंत प्रत्येक नागरिक आपापल्या परीने आपणहून मदत करणार नाही. आपल्याकडे असणाऱ्या बुद्धीचा व उपलब्ध साधनसामुग्रीचा या लढ्यात कशा प्रकारे वापर करता येईल हा विचार प्रत्येक नागरिक, तंत्रज्ञ, उद्योजक , कन्सल्टंट यांनी सतत केल्यास लवकर आपण या संकटातून सुखरूप बाहेर पडू.
Aug 8, 2019 6 tweets 2 min read
महत्वाचे

#KolhapurFlood
Hi all
पूरग्रस्तांसाठी काही टेक्निकल गोष्टीच्या अभावी मदत मिळत नाही किंवा एकाच ठिकाणी खूप मदत होत आहे. लोक पोस्ट वर पोस्ट टाकत आहेत. पण Requirements complete झाली की नाही हे समजत नाही. त्यासाठीच आम्ही 4 friends मिळून 1 technical support घेऊन 1 sqaud तयार केला आहे. आम्ही फक्त कॉल सेंटरच काम करणार आहे. ज्यांना जी काय हेल्प हवी आहे त्यांनी खाली mention केलेल्या कोणत्याही एकाच नंबर la whatup करा. किवा ज्यांच्याकडे जे काय उपलब्ध आहे ते तुम्ही खालील नंबर वर पाठवा.
Aug 26, 2018 32 tweets 5 min read
#सत्यनारायण पूजा : काळाची गरज

नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले ... ...तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले. काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. (त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात.