Rofl Gandhi (मराठी) Profile picture
@RoflGandhi_ चा अधिकृत #मराठी पॅरोडी. अधिकृत ट्विट चोर. ⭕ट्विट चोरांपासून सावधान⭕ ⛳जय महाराष्ट्र ⛳ #म #मराठी
Dec 13, 2019 5 tweets 4 min read
काल नागपूर विमानतळावर फ्लाईट ४० मिनिटं लेट. वेटिंग एरियात बसायला ही जागा नाही. ताटकळत उभा असताना, खंद्यावर सॅक, त्याच्या साईड पॉकेटमध्ये पाण्याची बाटली, साधा शर्ट, पॅन्ट अशी ही व्यक्ति दिसली. आधी वाटलं "आयला! हा माणूस सेम टू सेम प्रकाश आंबेडकरांसारखा दिसतो".
/१
#म #मराठी पण फोनवर बोलतानाचा त्यांचा आवाज ऐकून कळलं "अरे, प्रकाश आंबेडकरच आहेत." महाराष्ट्राच्या राजकारणातलं गेल्या काही वर्षातला महत्वाचा नेता. पण बरोबर हुजर्‍यांचा लवाजमा नाही, बाऊनर्स वगैरे तर नाहीच नाहीत. कुठलीच वी.अाय.पी ट्रीटमेंट नाही.
/२
#म #मराठी