Tushar Lagad Patil  Profile picture
हिन्दू 🚩
May 5, 2022 13 tweets 3 min read
#Thread 🧵

• शिवचरित्रावरील कलंक "वाघ्या कुत्रा" -

शिवराय यांच्या इतिहासात वाघ्या कुत्रे होते याचा कोणताही पुरावा प्रथम आणि दुय्यम साधना मध्ये उपलब्ध नाही मग हा वाघ्या कुत्रा कुठून आला ते पाहूया...

१/१३ वाघ्या कुत्र्याचा पहिला उल्लेख शिवरायांच्या नंतर २५० वर्षांनी म्हणजे १९०५ मध्ये झाला.

ची.ग. गोगटे यांच्या महाराष्ट देशातील किल्ले या पुस्तकात तो उल्लेख आला आहे तो असा -

२/१३
May 4, 2022 7 tweets 2 min read
#Thread 🧵

• शास्ताखानावर हल्ला आणि भोर -

सलग दोन-तीन वर्षे पुणे परिसरात ठाण मांडून बसलेल्या मोघल सरदार शास्त्ताखाना मुळे स्वराज्यविस्ताराला खिळ बसली होती.

चाकणचा किल्ला खानान घेतला, पुणे आणि आजूबाजूच्या इलाख्यात जबर दहशत निर्माण केली.

१/७ राजांच्या खाशा लालमहालातच कडक पाहाऱ्यात खान मुक्कामी राहिला.

त्याच्यापासून सावध रहा म्हणून राजांनी बाजी सर्जेराव जेधे देशमुख रोहिडखोरे तर्फ भोर यास खलिता धाडला होताच.

जसवंतसिंग कोंढण्याचा पायथा आवळून बसला होता.

२/७
Mar 30, 2022 9 tweets 2 min read
#Thread 🧵

• २९ मार्च १६६७ सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी पूर्ण..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवणच्या समुद्रात असलेल्या कुरटे बेटावर उभा असलेला जलदुर्ग सिंधुदुर्ग...

१/९ छत्रपती शिवाजी महाराजांकडे ३६२ किल्ले होते.

या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश-वर्‍हाड या प्रदेशापर्यंतचा विस्तार होता.

भुईकोट आणि डोंगरी किल्ल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रुंची स्वारी परतून लावण्यासाठी…

२/९
Mar 29, 2022 5 tweets 2 min read
• वराह -

वराहमुर्तीसंयुक्त यदी चक्रं प्रपद्यते।
पुजनाल्लभते राज्यं पृथ्वीव्यामेकराजकं।।

चक्र धारण केलेल्या वराह मूर्तीच्या पूजनाने पृथ्वी च देखील साम्राज्य मिळू शकत. विष्णूच्या १० अवतारातील एक अवतार म्हणजे वराह जो सत्यायुगात होऊन गेला.

१/५ याच मुख वराहाच (डुक्कर) असतं तर बाकी शरीर माणसाचं.

सदर च्या मूर्तीत भूमाता वराहाच्या सुळ्यावर किंवा डाव्या खांद्यावर बसलेली आहे आणि एका वेगळ्याच आविर्भावात भगवान वराह तिला पाताळातून आणत आहेत.

वरहाच्या पायाशी हिरण्याक्ष राक्षस मूर्च्छित पडला आहे.

२/५
Mar 28, 2022 6 tweets 3 min read
जेधे वाडा -

कान्होजी घराण्याने स्वराज्यासाठी एका हातात तुळशीपत्र आणि दुसऱ्या हातात निखारा ठेवला होता. यांची निष्ठा उत्तम उदाहरण आहे.

सध्या वाड्यातील देव्हारा आणि चिलखत बघण्यासारखे आहे.

१/६ ImageImageImage शहाजीराजे त्यांना बोलले, “मावळप्रांती तुम्ही जबरदस्त आहा, राजश्री शिवाजी महाराज पण आहेत. त्यांकडे जमेतीनिसी तुम्हास पाठवितो. तेथे इमाने शेवा करावी, कलकला (बिकट प्रसंगी) तरी जिवावर श्रम करून त्यापुढे खस्त व्हावे (मरण पत्करावे) तुम्ही घारोबियातील मायेचे लोक आहा. …

२/६
Mar 11, 2022 11 tweets 3 min read
#Thread 🧵

• शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा आज स्मृतीदिन...

इतिहासाला जसे या छत्रपतींचे आकर्षण तसेच इतिहासकारांना देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचे प्रचंड आकर्षण दिसून येते. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उत्तरकालीन बखरकारांनी…

@MulaMutha

१/११ …छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास नासवला, या बखरकारांची री ओढत नाटककार, कादंबरीकार आणि चित्रपट या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात अनेक काल्पनिक पात्रे घुसवून त्यांना बदफैली, व्यसनी ठरवण्याचा देखील प्रयत्न केला.

२/११
Feb 19, 2022 13 tweets 4 min read
#Thread 🧵

#शिवजन्मोत्सव 🧡🚩

गडावर एका सुरक्षित खोलींत बाळंतपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या खोलीला आंतून पांढरा चुनकळीचा रंग देण्यांत आला होता. भिंतीवर कुंकवाने ठिकठिकाणी स्वस्तिके व शुभचिन्हे रेखण्यात आली होती.

@the_mahrattas @ShefVaidya @MulaMutha

१/१२ दाराला व झरोक्यांना पडदे लावण्यांत आले होते. दाराच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्रे काढण्यांत आली होती.

खोलीत सतत तेवते दीप ठेवण्यात आले होते. पाण्याने भरलेले कलश आणि इतर जरूर त्या त्या वस्तूंचा व औषधांचा संच तयार ठेवलेला होता.

२/१२
Feb 18, 2022 8 tweets 2 min read
#Thread 🧵

सबंध महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून वयाच्या सतराव्या वर्षी स्वराज्याचा श्रीगणेशा केला. व एकाच वेळी दक्षिणेतील शाह्यांशी आणि मोगलांशी तसेच युरोपमधून आलेल्या इंग्रज,फ्रेंच,पोर्तुगीज या सर्वांशी…

१/८ …एकाच आघाडीवर संघर्ष केला, आणि त्यांना त्यात यशही येत गेले.

वेगवेगळ्या साम्राज्यांच्या आणि मुसलमानी शाह्यांच्या सत्तांतरामुळे महाराष्ट्रात जो राजकीय अस्थिरपणा आला होता त्याला योग्य वळणावर नेण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली.

२/८
Feb 16, 2022 7 tweets 3 min read
#Thread 🧵

थोरले माधवराव पेशव्यांचे शेवटचे काही महिने फार हलाकीचे गेले. त्यांना अत्यंत बिकट परिसथितीत मृत्यूला तोंड द्यावे लागले होते.

माधवरावांना पोटदुखीचा रजयक्षमा (Intestinal Tuberculosis) या रोगाने नी ग्रासले होते. …

@the_mahrattas

१/६ Image …हा रोग अत्यंत बिकट असून यात त्या माणसाचे पोट प्रचंड दुखते.

माधवरावांच्या आजारपणा वेळी एक प्रसंग आहे. तो प्रसंग वाचला की त्यांना होणाऱ्या वेदनांचे मूर्तिमंत चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते.

वासुदेव शास्त्री खरे यांच्या ऐतिहासीक लेख संग्रह खंड ४ मधे शेवटी…

२/६
Jan 2, 2022 10 tweets 4 min read
#Thread
• छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करणारा मुकर्रबखान आणि शंभूछत्रपतींच्या हत्येचा बदला घेणारे सरसेनापती संताजी घोरपडे -

छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर पेशवाई आली आणि तब्बल १३० वर्षांनंतर, १८१८ साली शंभूराजेंच्या हत्येचा बदला घेण्यात आला अशी अनैतिहासिक माहिती…

१/९ …खोडसाळपणा करत सोशल मीडियातून पसरवली जात आहे.

एकीकडे छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतरच्या काळातील अनेक पराक्रमी लोकांच्या तसेच छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या इतिहासावर अन्याय करण्याची मानसिकता रूजली असताना आता हे चळवळ, विद्रोह इत्यादी गोंडस नावाखाली बुद्धीभेदाच्या…

२/९
Dec 31, 2021 6 tweets 2 min read
#Thread
• इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ह्यांचा आज ९५ वा स्मृतिदिन 🙏💐

इतिहास म्हटलं की पुरावे आणि त्यांचा अभ्यास म्हटलं की वि का राजवाडे यांनी लिहलेले मराठ्यांच्या इतिहासाची साधने आपोआप आलीच. इतिहास अभ्यासा च्या दृष्टीने त्यांचे कार्य न भूतो न भविष्यती आहे.

१/६ Image भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण इ. बहुविध विषयांवर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले एक अतिशय परिश्रमी, प्रतिभावान, दृढनिश्‍चयी आणि निष्ठावान असे महाराष्ट्रीय विद्वान होते.

राजवाड्यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने जमविण्यासाठी जो प्रचंड खटाटोप केला, …

२/६
Dec 20, 2021 10 tweets 4 min read
#Thread
#विशाळगड_वाचवा -

बाजीप्रभू, बांदलांसह अनेक ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या धारोष्ण रक्तांनी आणि शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी.

शिलाहार, यादव राजांपासूनचा इतिहास असलेला हा गड १५व्या शतकात कोण कुठला मलिक रेहानने 7 वेळा घासून मेटाकुटीला येऊन गड घेतला.

१/९ आणि इथं मेल्यावर त्याचं जे थडगं होतं त्याची आज 3 मजली मशीद झालीये तेही पुरातत्व खात्याच्या नाकावर टिच्चून.

कोर्टाने अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश दिलेले असतानाही प्रशासनाने हिजड्याची भूमिका घेतलेली दिसून येते.

२/९
Dec 1, 2021 12 tweets 3 min read
#Thread
• छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी-

१) सईबाई – सईबाई या शिवरायांच्या प्रथम पत्नी असुन त्या सातारा जवळच्या फलटण येथील निंबाळकरघराण्यातील होत्या. मुधोजीराजे निंबाळकर हे त्यांचे वडील तर बजाजी निंबाळकर हे बंधु होते. …

@TMahrattas @ShefVaidya

१/११ …शिवरायांचा आणि त्यांचा विवाह १६४० मध्ये झाला. त्यांच्यापासुन शिवरायांना चार अपत्ये झाली.त्यांचा मृत्यु ५ सप्टेंबर १६५७ रोजी राजगडावर झाला.

२/११
Dec 1, 2021 18 tweets 4 min read
#Thread
• “शिवाजीराजांचा मावळा मी, तुझा कौल हवाय कुणाला?” - दिलेरखानाला धूळ चारणाऱ्या योद्ध्याची शौर्यकथा... (भाग 1)

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळीकडे जणू स्वराज्याचे नवचैतन्य सळसळू लागले. पण म्हणतात ना चांगल्या गोष्टीला देखील…

१/१५ …विरोधक असतात, त्याप्रमाणे अनेक वतनदारांचा शिवरायांच्या स्वराज्याला विरोध होता. या साऱ्या मंडळीनां शिवरायांनी स्वराज्याचे महत्व सांगितले. अनेक जण स्वराज्यात सामील झाले. तर अनेक जणांनी आपला विरोध कायम ठेवला.

यापैकी एक होते जावळीचे मोरे घराणे जे आदिलशाही दरबारी सरदार होते.

२/१५
Nov 29, 2021 5 tweets 2 min read
#Thread

पद्मभूषण रावबहाद्दूर रियासतकार गोविंद सखाराम सरदेसाई यांची आज ६२ वी पुण्यतिथी, त्या निमीत्त त्यांना सादर वंदन🙏

त्यांचा मृत्यू नंतर आज ६२ वर्ष झाली तरी त्यांनी अतिशय परिश्रमपूर्वक लिहिलेल्या मराठी रियासत व मुसलमान रियासत, ब्रिटिश रियासत व पेशवे दफ्तर…

१/५ Image …ह्या त्यांचा महत्त्वपूर्ण पुस्तकांनां भरपुर मागणी आहे. त्यांचा इतके कष्ट करुन लोकाभिमुख मांडणी इतर कोणीही इतक्या मोठ्या प्रमाणात केली नसेल.

त्यांनी काही हजार कागदपत्रे तपासली ज्यात मोडी, फारसी, गुजराथी, इंग्रजी भाषेतील मजकुर अभ्यासला.

२/५
Nov 27, 2021 9 tweets 4 min read
#Thread

बाळाजी बाजीरावानें सदाशिवरावभाऊची पानिपतसाठी जी निवड केली ती यथायोग्य होती. कारण, सदाशिवरावभाऊ असा उत्तम मुत्सद्दी म्हणून नांवाजला गेला होता तसा लढवय्या सरदार म्हणूनहि त्याचा चांगला लौकिक होता.

@TMahrattas @the_mahrattas @ShefVaidya

१/८ १७४७ त सदाशिवरावभाऊने बहादूर मेंड्याची स्वारी केली (का. पत्रे, यादी ६८). १७५० त यमाची शिवदेवाचें बंड त्याने स्वतः जाऊन मोडिले -१७५१ च्या मार्चात बाळाजीने सलाबताला तुंगभद्रेवर अडविलें त्या वेळी भाऊ त्याच्या बरोबर होता.

२/८
Nov 26, 2021 4 tweets 2 min read
चौपाटी रोडवर नाकाबंदी करत असतानाच तेथे एक संशयास्पद वाटणारी गाडी थांबली. दोन पोलीस लाठी घेऊन गाडीकडे गेले असता, त्यांना दोन अतिरेकी दिसले, इस्माईल नामक एका अतिरेक्यास जागीच ठार मारण्यात आले. दुसरा अतिरेकी अजमल कसाब जखमी अवस्थेत दिसला.

#MumbaiTerrorAttack

१/४ कसाबने प्रथम शरणागती पत्करल्याचे नाटक केले, व जसे ओंबळे गाडीजवळ गेले, तसे त्याने "ए के ४७" बंदुकीने सर्व पोलिसांवर निशाणा साधला. हे लक्षात येताच ओंबळेंनी जिवाची पर्वा न करता बंदुकीवर झडप घातली, त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचले पण ...

२/४
Nov 26, 2021 5 tweets 3 min read
बांधवानो आपण हे असले प्रकार आणखी किती पाहायचेत याला आता थांबवने खुप महत्वाचे आहे. आज गरज आहे सर्वांनी सहभागी होवून मोठी मोहिम उभारायची. आपण पाहतो की उदा. शिवाजी हायस्कूल, शिवाजी चौक, शिवाजी महाविद्यालय यासर्वांना ...

१/४ ‘छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल’, ‘छत्रपती शिवाजी महाराज चौक’ व ‘छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालय’ करायला लावा तरच बाकी शक्य आहे आजही परिस्थिती अशीच आहे चौक ,शाळा व महाविद्यालयवाले महाराजांचा एकेरी नामोच्चार करतांना सर्रास आढळतात !

२/४
Nov 24, 2021 11 tweets 3 min read
#Thread
• महाराणी ताराबाईसाहेब -

छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर दीडच महिन्यात (२१ एप्रिल १७००) सातारचा किल्ला मोगलांनी ताब्यात घेतला आणि त्यानंतर पुढच्या दीडच महिन्यात (९ जून १७००) परळीचा किल्लाही मराठ्यांच्या हातून मोगलांच्या हाती गेला‌.

@TMahrattas @ShefVaidya

१/१० Image यानंतर औरंगजेबाची कल्पना अशी की, राजाराम महाराजांच्या ‘असाहाय्य स्त्रिया आणि अज्ञान मुले’ यांना शरण आणायला कितीसा वेळ लागणार?

परंतु त्याच्या दुर्दैवाने आणि महाराष्ट्राच्या सुदैवाने त्यावेळी दक्षिणेच्या राजकीय नभोमंडळात एक अत्यंत दीप्तिमान तारा उदय पावत होता.

२/१०
Aug 28, 2021 7 tweets 5 min read
#Thread -
• शिवछत्रपतींच्या पत्रांतील भाषासामर्थ्य

पत्र म्हणजे संवादाचे साधन. पत्रातून व्यक्तिमत्वाचे पैलू अगदी सहजपणेउलगडत जातात. शिवछत्रपतींच्या पत्रव्यवहारातून ठळकपणे जाणवते ती त्यांची कडक शिस्त !

शिवछत्रपतींची पत्रे अभ्यासली असता पत्रांतील वाक्यरचनेची खास...

१/ ...वैशिष्ट्य जाणवतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू लक्षात येण्यास मदत होते. पत्रव्यवहारातून शिवछत्रपतींचे सामर्थ्य, लोभ, प्रेम, माया, राग, थोरवी, दबदबा, शिस्त, धर्म, कर्तव्य, धाक, व्यवहार, मुत्सद्दीपणा, कान उघडणी, जाब, प्रश्न, आदेश, आज्ञा, विनंती, दान, ...

२/
Aug 26, 2021 7 tweets 6 min read
#Thread -

• कैलासा मंदिर, वेरूळ, महाराष्ट्र, भारत

कैलास मंदिराला वेरूळ लेण्यांची ‘गुफा क्र. १’ असे संबोधले गेले आहे आणि हे जगातील सर्वात मोठे अखंड रचना म्हणून उल्लेखनीय आहे जो की एकाच खडकाच्या मोठ्या तुकड्याने बनवलेले आहे.

१/ ImageImage मंदिराच्या प्रभावी आकाराव्यतिरिक्त, हे त्याच्या शिल्पांसाठी, तसेच त्याच्या इतर स्थापत्य घटकांच्या उत्कृष्ट कारागिरीसाठी देखील उल्लेखनीय आहे.

कैलास मंदिर हे महाराष्ट्राच्या पश्चिम भारतीय भागात स्थित एक प्राचीन हिंदू मंदिर आहे.

२/ Image