मला सावरकर आवडतात. मी सावरकरांना मानतो. : म्हणजे नेमकं काय?
तर
मी जन्माधिष्ठित जात-वर्ण वर्चस्व नाकारतो.
फक्त नाकारत नाही, कृतीत आणतो. त्यामुळे सनातन्यांची टाळकी फिरली तरी मला फरक पडत नाही.
मी सार्वजनिक नीती-नियमांसाठी पोथी-पुराण-ग्रंथप्रामाण्य इ चा आधार नाकारतो आणि +
ऐहिक सुख-सौख्य-समृद्धी-स्थैर्य-सुरक्षा यांसाठी बुद्धिप्रामाण्यवादी राज्यघटना मान्य करतो.
मी मानवता नाकारत नाही, पण राष्ट्रवादाचं मूल्य आणि गरज ही मान्य करतो.
मी मुस्लिम-द्वेष अजिबात करत नाही, पण इस्लामी मूल-तत्वांनी समोर उभा केलेला समस्यांचा आगडोंब दुर्लक्षित ही करत नाही. +
मी जाती-धर्माचा दुराभिमान बाळगत नाही. पण जन्माने ती ओळख मिळाली म्हणून तिची शरम ही बाळगत नाही.
मी गांधीजींशी अनेक बाबतीत असहमत असतो. पण मीसुद्धा त्यांना "महात्मा" गांधी"जी"च म्हणतो - कारण मीसुद्धा त्यांचं महात्म्य मान्यच केलेलं असतं. +
आणि मी गांधीजीना नाकारत नसलो, तरी छ. शिवाजी महाराज माझ्या हृदयात वास करत असतात.
यातलं सगळंच्या सगळं मला समजतं, पटतं, आवडतं.
म्हणून मी सावरकर मानतो.
म्हणून मी सावरकर आचरतो.
अनेकांना यातलं काहीच आवडतं. अनेकांना यातलं बरचसं खुपतं. +
ते सगळं दिसत असूनही मी सावरकर माझ्या हृदयात, मेंदूत, रक्तात भिनवून घेतो.
कारण मी सावरकर फक्त वाचत, बोलत, लिहीत नसतो.
मी सावरकर जगत असतो.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com
#Savarkar #सावरकर #स्वातंत्र्यवीर #IAmSavarkar
#म #मराठी #Marathi
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
