#निर्भया #मराठी #म
अखेर सात वर्षे तीन महिन्यांनंतर निर्भया केस मधील चारही दोषींना फाशी देण्यात आलेली आहे !
हि केस केवळ एका मुलीला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यापूरती मर्यादित नव्हती तर एक शासनव्यवस्था म्हणून इथल्या व्यवस्थेचा कस लावणारी होती !
आणि इथल्या व्यवस्थेने
सगळ्या न्यायिक तत्वांचे पालन करत अखेर आज शिक्षा पूर्ण केली !
न्यायाला विलंब हा अन्याय असतो असे म्हणले जाते त्याचप्रमाणे तडकाफडकी न्याय हा देखील अन्यायचं असतो !
आपण एक देश म्हणून,समाज म्हणून एक संविधान आणि त्या आधारावर असलेली एक शासनव्यवस्था व कायदाप्रक्रिया स्वीकारलेली आहे....
कुठल्याही परिस्थितीत कायदे-नियम पाळणे हे जबाबदार शासनव्यवस्थेच आणि समाजाच लक्षण आहे !
रुल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य हि गोष्ट कुठल्याही समाजाचा पाया असतो, हि एक गोष्ट बाजूला गेली कि आपल्यात आणि झुंडीतील फरक शून्य होतो !
कुठलीही व्यवस्था परफेक्ट नसते, आपलीही नाही पन म्हणुन...
व्यवस्थाच गुंडाळून ठेवणे हे देखील योग्य नाही !
अतिगंभीर गुन्हे,त्यातील कायदेशीर प्रक्रिया यातील अनेक दोष निर्भया केसमुळे पुढे आले आहेत.... ते दूर करण्याचं काम इथली व्यवस्था नक्की करेल किंबहुना ते काम सुरुही झालं आहे !
एका स्पष्ट,पारदर्शी,नियम आधारीत व योग्य प्रक्रियेतुन....
मिळवलेल्या न्यायालाच खरा व योग्य न्याय असे म्हणता येईल !
झुंडीद्वारे,तडकाफडकी, इन्स्टंट जे केलं जातं तो कधीही न्याय असू शकत नाही.....!!
महिला सुरक्षेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना आणि सामान्य लोकांसाठी सामाजिक,न्यायिक तत्वांचा प्रचार-प्रसार करणे हि काळाची गरज आहे !
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
