आर्थिक साक्षरता हा खर तर व्यवहारज्ञानाचा एक महत्वाचा प्रकार आहे, जो आपल्या भारतात फार चर्चिला किंवा अभ्यासला जात नाही.
तो फक्त ठराविक समुदायांमधे मौखिक स्वरूपात एका पिढीतून दुसऱ्या पिढीत दिला जातोय.
काही हा तंतोतंत पाळतात ते श्रीमंत होतात जे विसरतात ते देशोधडीला लागतात. #म 👇
यावर ऊच्चशिक्षणात नक्कीच खुप चांगला अभ्यास आहे पण याचे तज्ञ, व्यावसायिक सल्लागार मंडळी दांडगी फी आकारतात;
जे रास्तही आहे.
कारण फुकटच्या सल्ल्याला लोक कधीच किंमत देत नाहीत.
दुसरा उपाय म्हणजे स्वत: या विषयांमधे खोल अभ्यास करून या विषयातील तज्ञांशी वेळोवेळी चर्चा करणे #म #आर्थिक
आर्थिक, वित्तीय गोष्टींचा दररोज मागोवा घेणे; आपण व्यावसायीक आहात कि नोकरी करता हे दुय्यम असते.
अगदी शाळेत असल्यासारखे एक एक टप्पा पार करणे (याला शाॅर्टकट नाही, तो वापरूही नये)
वेळ लागेल पण आर्थिक साक्षरता ही शिक्षणाइतकीच किंबहुना त्यापेक्षा अधिक गरजेची आहे. #म #मराठी #Thread
सुरूवातीला तसा हा प्रकार म्हणजे अंध व्यक्तींनी पाहिलेल्या हत्तीच्या गोष्टीसारखा वाटेल पण जसजसे आपण पुढे जाऊ तसे ते सोपे होईल.
प्रचलित पद्धतीत बॅंकेतील खात्यावर व्यवहार करता येणे, किंवा एखाद-दोन घरे, एखादी चार चाकी किंवा दुचाकी घेणे, किंवा थोडेफार सोने, राष्ट्रीयकृत बॅंकेत #म
एफडी, ॲानलाईन व्यवहार वा विमा संरक्षणालाही गुंतवणुक समजणे म्हणजे पुर्ण आर्थिक साक्षरता का तर अजिबात नाही.
खरतर वरील गोष्टी करता येणे म्हणजे बाराखडी शिकल्यासारखे आहे.
वित्तीय नियोजन,
गुंतवणुक,
बचत,
वाढ हे त्याचे काही प्रमुख टप्पे!
क्रमश:
#म #मराठी #आर्थिक_साक्षरता
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
