आज पेपर मधे चीनी आणी इतर देशातील कंपन्या #मॅग्नेटिक_महाराष्ट्र 2.0 मधे हजारो कोटींची गुंतवणूक करणार आहे, आणि दुसरी बातमी की भारत चीन सीमेवर चीन कडून गोळीबार यात एक अधिकारी आणि दोन जवान #हुतात्मा झाले. मग अश्या देशा बरोबर आर्थिक व्यवहार करून त्यांचे खिशे भरायचे आणि मग तोच पैसा +क
चीन आपल्या जवानांना मारण्यासाठी उपयोगात आणणार. सध्या कोरोना वरून जगाचे लक्ष हटवण्या साठी पण चीन ही आगळीक करत असेल, मग आपणच आपल्या सैन्याला मारण्या साठी चीनी कंपनीना भारतात कशाला बोलवायचे, हा देश किती धूर्त आणि सीमा विस्तारवादी आहे हे जगाला माहीत आहे. नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश +
पाकिस्तान, भूतान अश्या देशांना कधी आर्थिक मदत देऊन अगर धमकावून भारता विरुद्ध त्यांचा वापर करून घेत आहे. आज भारत अमेरिकेच्या आणि इतर देशांच्या जास्त जवळ आला आहे त्यामुळे पण चीन ची जळफळाट होत आहे. त्यामुळे यापुढे किती आर्थिक संबंध असल्या देशाशी ठेवायचे हे ठरवण्याची वेळ आली आहे +
चीन त्यांच्या आणि वरील देशांच्या सीमेवर रस्ते,रेल्वे,विमानतळ,बंदरे विकसित करत आहे आणि भारत स्वतःच्या सीमेत हया गोष्टी करायला लागला तर लगेच आक्षेप घेतो, त्यांचे सैन्य लगेच LOC ओलांडून आपल्या देशात येते आणि आपल्या सैन्यावर दादागिरी करते. त्यामुळे आता आपण आपापसातले पक्षीय राजकारण +
सोडून भारत देश म्हणून एकत्र आले पाहिजे नाहीतर हा ड्रॅगन अजून डोईजड होणार हे नक्की. @PMOIndia @rajnathsingh @AmitShah @CMOMaharashtra @PawarSpeaks @RahulGandhi @adgpi #BoycottChina #Galwan #chinaindiaborder #China #ChinaIndiaFaceoff @Wangchuk66
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
