#आर्थिकसाक्षरता -पुढचा टप्पा म्हणजे गुंतवणुक!
आपण नोकरी,व्यवसाय अथवा वडीलोपार्जित संपत्ती सांभाळत असाल,बचत करत असाल पण त्या बचतीचा काही हिस्सा जर योग्य गुंतवणुकीवर खर्च केला नाही तर आपल्याला होणाऱ्या/येणाऱ्या महागाईचा चटका नक्की बसेल.
मग योग्य #गुंतवणुक म्हणजे काय?#मराठी #म १/७
व्यवसाय, मासिक पगार, भाडे किंवा अजून कोणते ऊत्पन्न सुरू होणे म्हणजे आपल्याकडे वाहणारी नदीच समजा.
कधी त्या नदीला पुर येतो,
कधी ती शांत प्रवाही असते तर
ऊन्हाळ्यात फारच कमी पाणी असते कधीकधी तर ती आटतेही.
खरे पाहता नदीला जेंव्हा पुर येतो किंवा ती चांगली प्रवाही असते तेंव्हा २/७
ते पाणी योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने अडविले आणि चांगले नियोजनपुर्वक धरण बांधले तर ते धरणं म्हणजेच आपली बचत.
आता ही बचत आपण कशी वापरतो / गुंतवणुक करतो यावर आपली प्रगती, भविष्य आणि आयुष्याचा आनंद अवलंबून असतो.
एकदा धरण बांधले की त्याच्यापासून वीजनिर्मिती करणे,३/७
त्यातून पुढे हमखास, शाश्वत आणि कायमस्वरूपी ऊत्पन्न सुरू होते.
त्याचबरोबर पुढे जाणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास कालवे आणि त्याच धरणाच्या पाण्यावर अत्यंत चांगली शेती होते.
मुबलक १२ महिने पाणी मिळते, त्यामुळे शेतीतूनही चांगले ऊत्पन्न येऊन सुबत्ता येते.
४/७
#शेती #मराठी #म
शेतीपुरक दुध,फळे यावर आधारीत कारखाने आणि प्रक्रिया ऊद्योगात पैसे लागतात, त्याच पाण्यामुळे आजूबाजूस अनेक चांगले ऊद्योग येतात त्यातूनही अनेक फायदे मिळतात.
आता या सर्व बाबी म्हणजेच योग्य #गुंतवणुक
ती सुनियोजित असेल तर पावसाळा, हिवाळा ऊन्हाळा आला तरी आपण डगमगत नाही. #म #मराठी ५/७
एकदा तुम्हाला हे चारही टप्पे लक्षात आले की मग सुरू होतो खरा प्रवास.
मोटार ट्रेनिंग स्कूलमधे पहिल्या दिवशी जाऊन वाहतूकीचे नियम समजून घेतो आणि मग गाडीत बसायची मानसिक तयारी करतो, खरतर आज आपला आर्थिकसाक्षरतेचा प्रवास इथपर्यंत पोहचलाय.
खरी गाडी चालवायला शिकणे आणि नंतर स्वत: ६/७ #म
चालविणे हे ही ओघात येईलच. ती जमली की तुमच्या आर्थिक साक्षरतेचा प्रवास योग्य मार्गाला लागला असे मी म्हणेन.
या प्रवासात धोक्याच्या सुचना, काळजी, सुरक्षितता स्वत:लाच पहावी लागते, आम्ही आपल्या पुढेमागे आहोतच की मदतीला.
तुर्तास धन्यवाद आणि स्वल्पविराम,
#क्रमश:
#आर्थिकसाक्षरता #म
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
