अनेकांना प्रश्न पडत असेल की घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर करताना नेमका बौद्ध धर्मचं का स्विकारला? का त्यांना हिंदु,इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्म स्विकारू वाटला नाही?🤔
बाबासाहेबांनी १९५६ साली लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्म स्विकारला परंतु हे करण्या
पुर्वी त्यांनी जवळपास दोन दशकं सगळ्या धर्मांचा सखोल अभ्यास केला.बौद्ध धर्म निवडण्यामागे अनेक कथा असल्या तरी बाबासाहेबांनी 'बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भविष्य' ह्या निबंधात उत्तर दिले आहे.ह्या निबंधामध्ये त्यांनी जगातले ४ महत्त्वाचे धर्म आणि त्यांच्या संस्थापकांची
तुलना केलीय.ते म्हणजे 'गौतम बुद्ध,येशु ख्रिस्त,मोहम्मद पैगंबर आणि श्रीकृष्ण'.बाबासाहेब म्हणतात,"बुद्धांना उरलेल्या ३ जणांपासुन कोणती गोष्ट वेगळी करत असेल तर ती आहे त्यांची स्वतःबद्दलची उदासिनता अथवा त्याग"...बाबासाहेब म्हणतात,"येशु म्हणायचे की मी साक्षात देवाचा मुलगा असुन ज्यांना
स्वर्गात जायचयं त्यांनी मान्यच केल पाहिजे की मी देवाचा मुलगा आहे.पैगंबर एक पाऊल पुढे जाऊन म्हणायचे की मी अल्लाह चा दुत असुन मीच पहिला व शेवटचा दुत आहे.श्रीकृष्ण ह्या दोघांच्या २ पाऊल पुढे जाऊन फक्त देवाचा मुलगा अथवा देवाचा दुत एव्हढ्यावर न थांबता मी स्वताच परमेश्वर असुन माझ्या
अनुयायांनी मला 'देवाधिदेव' संबोधावे अस म्हणायचे."पण गौतम बुद्धांनबद्दल लिहीताना बाबासाहेब म्हणतात,"त्यांनी स्वतःला कोणतीच पदवी बहाल केली नाही.ते एका सामान्य मनुष्याच्या पोटी जन्माला आले,आयुष्यभर सामान्य म्हणुन जगले आणि त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाचा प्रसार,उपदेश एका सामान्य
माणसासारखा केला.त्यांनी कधीच आपल्याकडे एखादी दैवी शक्ती आहे असं भासवलं नाही अथवा तिचं प्रदर्शनही केले नाही.बुद्धांनी 'मार्गदाता' आणि 'मोक्षदाता' ह्यामधला फरक स्पष्ट केला.पैगंबर,येशु हयांनी शिकवल्याप्रमाणे ते बोलतील तो शब्द देवाचा अशी शिकवण दिली.श्रीकृष्ण स्वतः देव असल्यामुळे तिथ
प्रतिप्रश्न करता येत नव्हता परंतु बुद्धांनी त्यांच्या शिष्यांना समजावलं"मी जे शिकवतो ते १०० टक्के बरोबरच असेल अस नाही,त्यात त्रुटीही असतील पण तुम्हाला आयुष्य जगताना काही अनुभव आले तर त्या शिकवणीमध्ये सुधारणा करा आणि योग्य काय आहे ते लोकांना सांगा".
मला वैयक्तिकपणे वाटत की
धर्माच्या प्रवासामध्ये मुळ विचारांना अनेक शाखा,उपशाखा फुटत गेल्या व त्यामुळे प्रत्येक धर्मात त्रुटी,गोंधळ निर्माण होत गेला.म्हणुन तर घटनेचे शिल्पकार आणि इतक्या उच्चविद्याविभूषित महामानवाने धर्मपरिवर्तन केले नसावे ना??😄🤔 #म #मराठी #रिम #सहज #बाबासाहेब #आंबेडकर #बौद्ध #हिंदु
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
