मित्रांनो आजचा #thread तसा युनिक आहे आणि तुम्हाला माहिती नसलेल्या गोष्टी समजण्यासाठी उपयुक्तही.'2000 ची नोट' हे thread च शिर्षक आहे.ज्यावेळीस 8 नोव्हेंबर 2016 ला रात्रीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या कण्यावर #नोटाबंदी रूपी हल्ला झाला तेव्हा नोटाबंदी लागु करताना जे कारणं दिली त्यातील एक
म्हणजेच'आतंकवाद्याकडे आणि जनतेकडे असलेला काळा पैसा नष्ट करणे व बाहेर काढणे'. हयासाठी 500 व 1000 च्या नोटा बंद करून '2000 ची' करकरीत नोट मार्केटमध्ये आली(ती नोट देशात आणखी नीट वितरीत ही झाली नसताना भाजपाच्या लोकांकडे बंडल सापडले अशी बातमी त्यावेळी फिरत होती(?) तो मुद्दा वेगळा,असो)
तर सांगायच हे आहे की आपल्यामधल्या कोणी सुज्ञाने RTI,2005 (माहितीचा अधिकार,2005) कायद्याअंतर्गत '2019' मध्ये 2000 च्या किती नोटा छापल्या अशी विचारणा केली असता RBI ने स्पष्ट शब्दात त्याला सांगितले की १ ही नवी नोट छापली नाहीय..आणि इथल्या मित्रांना माहित नसाव पण त्याच कारण ही
RBI ने नमुद केलय ते म्हणजे सरकार व बॅंकला वाटतय की 2000 च्या नोटांमुळे काळा पैसा वाढलाय..😑 म्हणजे ज्यासाठी(काळा पैसा रोखण्यासाठी) नोटाबंदी केली त्याच्या उलट होत आहे म्हणुन छपाई बंद!!वा!!ह्यावरून अंदाज लावा की नोटाबंदी कशी फसलीय.. अर्थव्यवस्थेसोबत एक मोठा जुमला झालाय..हा एक point
दुसरा मुद्दा fake currency.
2018-19 सालात '2000'च्या जवळपास '21847' खोट्या नोटा पकडल्या गेल्या असुन 2019-2020 सालात तेच प्रमाण '17020' वर आलय म्हणजेच ही एक जमेची बाजु आहे की '2000'च्या खोट्या नोटांचे प्रमाण '22.1%' नी कमी झालय.
परंतू चिंताजनक बाब म्हणजे '500' व '200' च्या
खोट्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडत आहेत.
**2018-2019 मध्ये '500'च्या एकुण '21865' खोट्या नोटा सापडल्या त्याच 2019-2020 मध्ये वाढुन '30054' झाल्या.
**2018-2019 मध्ये '200' च्या '12728' वरून 2019-2020 मध्ये '31969' म्हणजे जवळपास '151%' वाढ😵
ही अर्थव्यवस्थेसाठी धोक्याची घंटी आहे.
जाता जाता तुमच्यासाठी...नोटा कुठे छापल्या जातात आणि 2000 ची नोट कोण छापत ह्याबद्दल छोटीसी माहिती..
2000 नोट छपाईचे कंत्राट 'भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लि.'(BRBNMPL) जो की RBI चाच भाग आहे हयांच्याकडे आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे RBI totally केंद्र सरकारच्या
अधिपत्याखाली येते.
'सेक्युरिटी प्रिंटींग and मिंटींग काॅ. Of इंडिया लि.'(SPMCIL) ह्यांच्याकडे इतर नोटांची छपाई असते.
भारतात नोटा छपाईच्या एकुण 4 प्रेस असुन म्हैसुर(कर्नाटक) व साल्बोनी(बंगाल) येथील प्रेस BRBNMPL च्या under आहे तर नाशिक(महाराष्ट्र) व देवास(मध्यप्रदेश) येथील
प्रेस SPMCIL च्या under आहेत.
#म #मराठी #धागा #लेख #नोटाबंदी #currency_press #पैसा #fake_currency #demonitisation #RBI #centralgovernment #RTIinfo #RTI @Raptor1996 @KKW_NH66 @irajratna @abhi_palaskar @MarathiDeadpool @ankita__SA @2307rebelday
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.