Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Sep 13, 2020, 10 tweets

काल #Facebook वर ‘Amit Shah Fans’ ह्या पेजवरचं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शिवछत्रपतींच्या रुपातलं छायाचित्र वायरल झालं.

निश्चितच प्रत्येक शिवभक्ताला ते छायाचित्र पाहून क्रोध अनावर झाला नाही.

त्याच क्रोधाच्या भरात लोकांनी पंतप्रधान मोदींना आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या...

(१/९)

...त्यांची लायकी काढली आणि भाजप ला #महाराष्ट्रद्रोही घोषित केलं.

पण लोकं हे विसरतात की ह्यात पंतप्रधानांची काही ही चूक नाही. मोदींना ह्या गोष्टीची काही कल्पना पण नसेल. त्यांना आई-बहिणी वरुन शिव्या देऊन फायदा काय?

कित्येक वेळेला मी स्वत: अनुभव घेतलाय की उत्तर भारतातील...

(२/९)

...अनेक भाजप चे समर्थक मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करतात.

पण महाराष्ट्रात हे कधीही होत नाही. काल देखील महाराष्ट्रातल्या प्रत्येक भाजप समर्थकाने ह्या छायाचित्राचा विरोधच केला.

आणि महाराष्ट्रात हे न होण्याचं कारण म्हणजे आपल्याला महाराज माहिती आहेत.

(३/९)

महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या प्रत्येकाला शिवछत्रपतींची किर्ती ठाऊक आहे.

पण ह्याच महाराष्ट्रात राष्ट्रवादी काॅंग्रेस च्या समर्थकांकडून शरद पवार ह्यांना ‘जाणता राजा/छत्रपती’ संबोधण्यात आलं. येवढच नाही तर काहींची त्यांना ‘छत्रपतींचा बाप’ म्हणण्या इथवर मजल गेली.

(४/९)

बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या संजयराऊत ह्यांनी देखील बाळासाहेब ठाकरे ह्यांची तुलना शिवछत्रपतींशी केलेली हा महाराष्ट्र विसरलेला नाही.

ज्या महात्म्यामुळे आपण आज आहोत त्यांच्या नावाचा वापर फक्त राजकारणासाठी होतो हे ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.

(५/९)

‘शिवछत्रपती’ हे ह्या अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आहेत. ते कुठल्याही राज्यापूर्ते किंवा पक्षापूर्ते मर्यादित नाहीत.

इतर राज्यांमधली लोकं जेव्हा महाराजांची तुलना कुठल्याही नेत्याबरोबर करतात किंवा त्यांचा अपमान करतात तेव्हा त्या लोकांना शिव्या देऊन काहीही उपयोग होत नाही.

(६/९)

शिव्या देण्यापेक्षा त्या लोकांना शिवप्रतापांची माहिती करुन दिली तर आपोआप त्यांना त्यांची चूक लक्षात येइल.

महाराष्ट्राबाहेर कित्येकांना शिवछत्रपतींबद्दल माहिती नसतं. आणि त्यात त्यांची काहीही चूक नाही. त्यांना मराठ्यांपेक्षा मुघलांबद्दल जास्तं शिकवलं गेलय.

(७/९)

#AgrimaJoshua ने महाराजांचा एकेरी उल्लेख व अपमान केला त्या वेळेला अनेक कम्युनिस्टांनी आणि इतर राज्यातल्या लोकांनी तिची पाठराखण केली.

मी त्या वेळेला महाराजांवर एक #Thread लिहीला होता ज्याला महाराष्ट्रा बाहेरून उदंड प्रतिसाद मिळाला.

हा तो #थ्रेड 👇🏼

(८/९)

महाराजांबद्दल वाचल्यानंतर कित्येक लोकांच्या लक्षात येतं की जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण नसतो.

आपण सर्व शिवभक्तांनी महाराजांची किर्ती भारतभर अवगत करुन देणं हे आपलं कर्तव्य आहे.

🚩हिंदुह्रदयसिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

(९/९)

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling