🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Sep 18, 2020, 13 tweets

गेले १५ दिवस झाले महाराष्ट्रात #राष्ट्रपती_राजवट लागु करा अशी काही लोक मागणी करत आहेत.आजच्या थ्रेडमध्ये राष्ट्रपती राजवटीबद्दल माहिती जाणून घेऊ.सोप्या शब्दात कलम,घोषणेचा आधार व देशात कितीवेळा,कुठे जास्त कुठे कमी लागु केली इ #म #मराठी #धागा #महाराष्ट्र #PresidentRuleInMaharashtra

एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची असल्यास 'कलम ३५६' चा वापर केला जातो.राज्यशासन घटनात्मक तरतूदींनुसार चालत नाही याची खात्री झाल्यास राष्ट्रपती राज्यशासन आपल्या हातात घेते यालाच 'राष्ट्रपती राजवट' किंवा 'राज्य आणीबाणी' किंवा 'घटनात्मक आणीबाणी' असे म्हटले जाते. #म #रिम

*कलम ३५६ लागु करण्यासाठी दोन आधार घेतले जातात.
१)कलम ३५६:-
जर राष्ट्रपतींना एखाद्या राज्याचे शासन घटनात्मक तरतुदींना धरून चालत नाही अस जाणवलं तर ते राजवटीची घोषणा करतात.अशी घोषणा ते संबंधित राज्याच्या राज्यपालांकडुन तसा अहवाल प्राप्त झाला किंवा नाही झाला तरी करू शकतात. #कोशियारी

२)कलम ३६५:-
जर केंद्राने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यास किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यात राज्याने कसुर केला तर, राष्ट्रपती अस गृहीत धरतात की ते राज्यशासन घटनात्मक तरतूदींनुसार चालत नाही.
*राष्ट्रपतींच्या घोषणेला संसदेची संमती असावी लागते.

*संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली की राष्ट्रपती राजवट दुसरा ठराव पारित झाल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांपर्यंत राहते.त्यानंतर ती संसदीय ठरावाद्वारे पुढे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविता येते.पण,अशी ती जास्तीत जास्त ३ वर्षांसाठीच वाढवता येते.

*राष्ट्रपती राजवट समाप्त करणे-(revocation of President's rule)
राष्ट्रपती केव्हाही राष्ट्रपती राजवटीची उद्घोषणा दुसर्या उद्घोषणेद्वारे करू शकतात.अशी समाप्तीची उद्घोषणा करण्यासाठी संसदेच्या संमतीची आवश्यकता नसते.

कलम ३५६ चा वापर:-
संविधान सभेत जेव्हा कलम ३५६ वर टिका झाली तेव्हा डॉ.आंबेडकरांनी अशी आशा व्यक्त केली होती की, कलम ३५६ हे घटनेतील एक 'मृत-पत्रा'(dead letter) प्रमाणे राहील व त्याचा वापर केवळ शेवटचा पर्याय म्हणुनच केला जाईल.पण जेव्हा घटना लागू झाली त्यानंतर कलम ३५६ 'मृत पत्र'

ठरण्याऐवजी कित्येक राज्य आणि विधानसभांसाठी 'घातक-शस्त्र' म्हणुन वापरले गेले.म्हणुन एच.व्ही.कामथ १९९० ला म्हणतात,"डॉ.आंबेडकर तर आता जीवित नाहीत,मात्र हे कलम आजही मोठ्या प्रमाणात जिवंत आहे."
१९५० नंतर आजपर्यंत '१२०'पेक्षा अधिकवेळा राजवट लागू झालीय.
खालील १९५०-२०१६ चा तक्ता पाहा.

*घटना लागु झाल्यावर सगळ्यात सुरूवातीला १९५१ ला पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली.
*सर्वात जास्त वेळा:-उत्तरप्रदेश(९)
*सर्वात जास्त दिवस:-J&K(२४५५ दिवस)
*महाराष्ट्रात आत्तापर्यंत ३ वेळा:-
१)१७ फेब्रु ते ८ जुन १९८०
२)२८ सप्टे ते ३१ ऑक्टो २०१४
३)१२ नोव्हे ते २३ नोव्हे २०१९

*छत्तीसगड व तेलंगणा असे दोनच राज्य आहेत जिथे एकदाही राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही.
*आत्तापर्यंत इंदिरा गांधींच्या काळात सर्वात जास्तवेळा राजवट लागु करण्यात आली आहे.त्यांच्या पंतप्रधानपद कालावधीत(१९६६-७७ व १९८०-८४) एकुण ५० वेळा राजवट लागु करण्यात आली आहे.

*तर मोरारजी देसाई यांच्या फक्त २ वर्ष पंतप्रधानपद कालावधीत एकुण १६ वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.
*सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक 'बोम्मई खटल्या'मुळे(१९९४) राष्ट्रपती राजवटीचा अवाजावी वापर मोठ्या प्रमाणात कमी झाला.त्या खटल्यात कोर्टने राजवट लादायचे निकष सांगितले.#म

अवाजावी वापराचे काही उदाहरणे:-
१)१९७७ मोरारजी सरकारने काॅंग्रेसशासित ९ राज्यांत राष्ट्रपती राजवट लागू केली.या राज्यात विधानसभा आता लोकांची मते प्रदर्शित करत नाही अस कारण दिलं.
२)१९८० काॅंग्रेस सत्तेत आल्यावर त्यांनीही त्याच आधारावर ९ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागु केली.

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling