शुभांगी - मी मराठी ❤️ Profile picture
छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 ग्राफिक डिझायनर #मुंबईकर #कोकणी #कॉफीप्रेमी ☕ #कलाकार © #मी_शुभांगी ✍️

May 2, 2021, 15 tweets

#जागतिक_हास्य_दिन

लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्‍याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻

#म #मराठी

ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻

काही वर्षांनी जेव्हा त्यांना आत्मज्ञानाची म्हणजेच परमानंदांची प्राप्ती झाली तेव्हा ध्यानावस्थेतच जोरजोरात हसु लागले. त्यामुळे होतेई यांना लोक "लाफिंग बुद्धा" म्हणू लागले.

परमानंद प्राप्ती नंतर होतेई यांनी गावोगावी, देशविदेशातील यात्रा करण्यास प्रारंभ केला.
३👇🏻

होतेई यांच्या शरीराकडे जर पाहीलं तर ते खूप प्रेमळ, हसतमुख व जाडजूड लठ्ठ पोटाचे होते. भगवं वस्त्र धारण करून व खांद्यावर भिक्षा झोळी घेऊन ते हिंडत असत. होतेई यांनी चीन आणि जपान मध्ये खूप यात्रा केली आहे. लहान मुलांमध्ये होतेई खूप प्रसिद्ध होते आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. ४👇🏻

ते आपल्या झोळीतून खाण्याचे गोडाद्य पदार्थ आणि खेळणी घेऊन येत असत आणि जे काही झोळीत असेल ते मुलांमध्ये वाटत असत. मुलांना हास्यकथा आणि विनोद सांगत ते त्यांच्यात रमत असत. इतकंच नव्हे तर प्रौढ आणि वयस्कर लोकांमध्ये जाऊन देखील ते मज्जा मस्करी करत असत. ५👇🏻

त्यांच्या येण्याने सगळीकडे वेगळं चैतन्य निर्माण व्हायचं त्यामुळे चीन मध्ये त्यांना देवतेसम पुजलं जातं. झेन बौद्ध पंथाचा प्रसार करण्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. ६👇🏻

आता तुम्ही म्हणाल, झेन म्हणजे नक्की काय? याचं उत्तर होतेई यांनीच दिलं आहे. होतेई अनेक झेन साधकांकडून काही पैशाची भिक्षा मागत आणि त्यातून खाण्याचे पदार्थ व खेळणी विकत घेत. झेन साधकांना होतेई एक आत्मज्ञानी पुरूष आहे हे ठाऊक होतं. त्यामुळे ते देखील त्यांना निसंकोच दान देत असत.
७👇🏻

एके दिवशी होतेई यांनी एका झेन भिक्षूकडे पैसे मागितले आणि त्या भिक्षुकाने दिले ही परंतू त्याने होतेई यांना एक प्रश्न केला. साधकाने विचारलं 'झेन' चा अर्थ काय तर होतेई यांनी आपली भरलेली झोळी खांद्यावरून खाली उतरवून उघडी केली आणि मौन राहीले. ८👇🏻

साधकांने परत विचारलं "झेन" चा यथार्थ काय? होतेई यांनी काहीही न बोलता झोळी उचलली आणि खांद्याला लावून आपल्या मार्गास लागले. होतेई यांना तात्पर्य सांगायचं होतं ते म्हणजे, आपल्या आयुष्यात जे काही चांगले-वाईट अनुभव किंवा ज्ञान आहे त्याची साठवणूक करणे, हा अर्थ आहे 'झेन' या शब्दाचा. ९👇🏻

यथार्थ म्हणाल तर आपल्याकडे जे ज्ञान आहे ते निःस्वार्थपणे जगाला वाटणे!!

खरंच होतेई एक आत्मज्ञानी योगीच होते. आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी लोकांच्या जीवनात सखाचे रंग भरण्यात घालवलं. आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस त्यांनी जपान मध्ये घालवले व तेथेच आपली जीवनज्योत विझवली. १०👇🏻

होतेई म्हणजेच बुद्धई यांना आपल्या मृत्युचं ज्ञान अगोदरच झालं होतं. त्यांनी जपानमधील आपल्या सहासात असणार्‍या लोकांकडे इच्छा प्रकट केली होती की, मेल्यानंतर त्यांच्या शरीराचं दाहसंस्कार केलं जावं. त्यावर जपान मधील लोक धर्मसंकटात पडले, ११👇🏻

कारण तिथे मृतांचं दाहसंस्कार करण्याची प्रथा नव्हती. परंतू होतेई यांच्या इच्छेनुसार लोकांनी होतेई यांना निर्वाण झाल्यानंतर चितेवर ठेवलं. अग्नी दिल्यांनतर चिंतेतून अचानक फटाक्यांचे आवाज येऊ लागले. हे पाहून मयताला आलेली लोकं देखील हसु लागली. १२👇🏻

होतेई यांनी मरणाअगोदरच आपल्या वस्त्रांमध्ये फटाके लपवून ठेवले होते. मेल्यानंतरही हा योगी लोकांना हसवून गेला. म्हणूनच होतेई यांची प्रतिमा विश्वभरात लाफिंग बुद्धा म्हणून प्रसिद्ध आहे. आजही जपान आणि चीन मध्ये यांना पुजलं जातं.
तर हे होते होतेई आणि त्यांचं जीवनकार्य!
१३👇🏻

जागतिक हास्य दिनानिमित्तानं त्यांची एक आठवण.

सर्वांना जागतिक हास्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 😁

होतेई यांनी सांगितल्याप्रमाणे, "हसत रहा, आनंदी रहा आणि इतरांनाही हसवत रहा!!"
१४🙏🏻

-- शुभांगी ✍️

छायाचित्रे साभार - गुगल

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling