शुभांगी - मी मराठी ❤️ Profile picture
छत्रपती शिवाजी महाराज🚩🙏🏻 मराठी असल्याचा अभिमान आहे.🚩 ग्राफिक डिझायनर #मुंबईकर #कोकणी #कॉफीप्रेमी ☕ #कलाकार © #मी_शुभांगी ✍️
Oct 13, 2022 25 tweets 5 min read
महत्त्व "व्यवहार पाठां" चे

ब्रिटनमध्ये काही वर्षांपूर्वी एका तीन-साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला

#म #मराठी #रिम Image आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती.
Oct 11, 2022 4 tweets 2 min read
अप्रतिम गीत संरचना... ❤️

सुटताना हात, विझताना वात
वाटे आता तो काळही परतून यावा
घडले जे सारे, ते उधाण वारे
फिरुनी पुन्हा तो नवासा डाव मांडावा
खोडून कालच्या खुणा
जगायचे आहे पुन्हा
अधुरे स्वप्न साजिरे पुरे करायचे मना

#काकण
#म #मराठी #रिम पुसुनी आसावे आता
नवी लिहायची कथा
नवासा द्यायचाय अर्थ जीवना
तुझ्या सावलीत माझे क्षण क्षण
अन पूर्ण आज झाले काकण!

भेटीला आणी ती जुनी कहाणी
आठवू दोघे पुन्हा
लाटांची गाणी ती माझी निशाणी
जपली आहेस ना
बेरंग झालेले आयुष्य सारे
रंगवू थोडे जरा
पहाट सारली नि रातीही गेल्या
वाट पाहण्यात त्या
Sep 25, 2022 12 tweets 5 min read
#Threadकर

पुण्यातल्या पाषाण रस्त्यावर वृंदावन गृहरचना सोसायटीमध्ये अगदी डोंगराच्या बाजूला निसर्गाच्या कुशीत निवांत ठिकाणी लपलेला एक टुमदार बंगला आहे. त्या बंगल्याचं नाव आहे ‘सांख्य’. अध्यात्मातील सांख्य तत्त्वज्ञानाशी जवळीक साधणारे हे आगळेवेगळे नाव असणाऱ्या (१/११)
#म #मराठी #रिम या बंगल्याचे मालक कोणी साधुसंत वा बुवामहाराज नाहीत, तर ते आहेत अभिमानाने भारताची मान ताठ ठेवणारे, ‘परम’ या महासंगणकाची निर्मिती करणारे संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर!
विदर्भातल्या मूर्तिजापूर तालुक्यातलं मुरांबा गाव हे भटकरांचं मूळ गाव. वडील स्काउटचे संघटक तर आई मुख्याध्यापिका. (२/११)
Jun 7, 2021 29 tweets 10 min read
समाजमाध्यमं वापरताय तर सावधान!! 🛑

तीन वर्षांपूर्वीची घटना...
साल २०१९ च्या उन्हाळ्यात दक्षिण कोरियामधील आणीबाणी क्रमांकावर (Emergency Number) एक फोन कॉल आला. हा फोन कॉल केला होता दक्षिण कोरियाच्या एका विद्यापीठात पत्रकारिता शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा. (१/२७)
#म #मराठी #रिम या विद्यार्थ्यांनी पोलिसांना एका गंभीर गुन्ह्याची माहिती दिली की; टेलिग्राम वर एक ग्रुप आहे, जो क्रूर सेक्स नेटवर्कींग चालवतो. हा ग्रुप १८ वर्षांखालील मुलींना व महिलांना अमानविय आणि विकृत सेक्स करण्यासाठी भाग पाडून त्याचे अश्लील चित्रफिती बनवून आॅनलाईन मानवी तस्करी (२/२७)
May 22, 2021 34 tweets 9 min read
चिमुरड्यांचा लैंगिक छळ थांबवा!!

आपल्या भारतात लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबत बोललं जात नाही, किंबहुना लोक या गोष्टीला नगण्य समजतात. आपल्या देशात बाल लैंगिक शोषणाच्या घटना फार घडत नाहीत असा पांचट गैरसमज लोकं करून बसतात. (१/३३) Image इंटरनेटचा वापर जितका चांगल्या कामांसाठी होतो त्याहूनही जास्त वाईट कामांसाठी होतो. आधी संगणक आणि आता मोबाईल यामुळे चाईल्ड पोर्नोग्राफी, लैंगिक शोषण यांसारख्या घटना समाज माध्यमांद्वारे फार मोठ्या प्रमाणात होत आहेत. लहान मुलांचा वापर अश्लील दृश्यांसाठी करणं, (२/३३)
May 6, 2021 11 tweets 3 min read
भारतीय समाजसुधारनेतील अगाध सामर्थ्याचा ओजस्वी महापुरूष म्हणून जर कोणाला म्हंटलं पाहीजे तर ते आहेत लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज!! यांच्या कार्याविषयी जितकं बोलावं तितकं कमीच! भारतवर्षातील समाजव्यवस्थेत समानता आणण्यात राजर्षी शाहूंचा सिंहाचा वाटा आहे.
(१/११)

#म #मराठी #रिम जो लोकांमध्ये नांदला आणि तळागाळातील लोकांना सहजतेने ज्याने वर आणलं, म्हणूनच तो लोकराजा होऊ शकला.

आरक्षणाचे जनक, स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते, ब्राह्मणशाहीविरूद्ध प्रचंड बंड पुकारणे, शिक्षणाचा अधिकार सर्व समाजघटकात पोहोचवणे,
(२/११)
May 2, 2021 15 tweets 7 min read
#जागतिक_हास्य_दिन

लाफिंग बुद्धा हे नाव बहुतेकांना नक्कीच माहित असेल! असं म्हंटलं जातं, ह्यांच्या मुर्तीचं वास्तूत असणं ऐश्वर्य प्रदान करतं. बर्‍याच जणांना वाटतं की हे काल्पनिक पात्र आहे, पण असं नाही. इसवी सन ९ व्या शतकात चीनमध्ये 'झेन' पंथाचे बौद्ध साधू होऊन गेले. १👇🏻

#म #मराठी Image ज्यांना चीन मध्ये बुडाई/बुद्धई आणि जपान मध्ये होतेई असं म्हंटलं जातं. 'झेन' हा बौद्ध धर्मातील महायान शाखेतील एक पंथ आहे. झेन म्हणजे ध्यानोपासना. होतेई यांनी बौद्ध दीक्षा घेतल्यानंतर ध्यानधारणा अथवा ध्यानसाधना करण्यास सुरूवात केली.२👇🏻 Image
Feb 26, 2021 28 tweets 12 min read
मानवतेचा कलंक - लैंगिक हिंसाचार :-
जुनको फुरुटा (Junko Furuta) सोबत घडलेली काळीज पिळवटून टाकणारी वास्तविक घटना.

विश्वभरात अपराध हे दररोज घडत असतात. पण जर लैंगिक हिंसाचाराबाबत बोलायचं झालंच, तर या संदर्भात भयंकर अपराध घडल्याची साक्ष इतिहास देतो. +👇🏻 हृदयाला चरे पडतील अशीच एक घटना आधुनिक फॉरेंसिक जपान मध्ये १९८८ साली "जुनको फुरुटा" या अवघ्या १६ वर्षाच्या शाळकरी मुलीसोबत घडली.

जपान मध्ये अपराध्यांसाठी कडक कायदेकानुन तर आहेत, पण असे बरेच अपराध पोलिसांच्या अथवा कायद्याचा दृष्टीस पडत नाहीत. +👇🏻
Feb 25, 2021 4 tweets 4 min read
आजकाल काही जणांचे मराठी भाषेशी वैर आहे, असंच दिसतं. #मराठी भाषा ही फक्त राजकारणापुरती मर्यादित आहे, असंच त्यांना वाटतं. असेच काही तथाकथित स्वयंघोषित पत्रकार आणि इतर काही #मराठीभैय्ये आहेत ज्यांना वाटतं सारखं सारखं मराठी भाषेबद्दल बोलल्याने रोजगार मिळत नाही. 👇🏻
#म #रिम #मायबोली रोजगार म्हणजे फक्त ८-९ तासांची नोकरी नव्हे. मराठीतील साहित्य संपदा, ज्यावर कितीतरी जणांचा रोजगार अवलंबून आहे. मग लेखक असो, कवी असो, प्रकाशक असो की पुस्तक विक्रेता या सर्वांचेच मराठी साहित्य संपदेवर पोट भरतं. हा रोजगार नाही का? शिवाय त्याच लेखकांच्या कादंबर्‍यांमधून, 👇🏻
Feb 6, 2021 23 tweets 10 min read
मुलाकरम्

तुम्ही विचार करत असाल की या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो? तर या शब्दाचा अर्थ आहे 'स्तन कर/Breast Tax'. आता तुम्ही म्हणाल या विषयावर कोणी का करवसुली करेल?? तर तसंच आहे!

दक्षिण भारतातील त्रावणकोर राज्यातील ही घटना. जे सध्याच्या केरळ राज्यात आहे. सुमारे १५० वर्षापूर्वी केरळ मधला मोठा क्षेत्रफळाचा भाग असणार्‍या त्रावणकोर (जे ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होते) राज्याच्या राजाने हा कर लागु केला.

त्याकाळी नाडर, थिया आणि एडवा अश्या क्षुद्र जातीतील स्त्रियांना स्तन झाकून ठेवण्यास बंदी होती.
Dec 21, 2020 9 tweets 5 min read
कोकणात कधीच जातीवादी मनसुबे तग धरू शकणार नाहीत...

दोन दिवसांपूर्वी काही फेक हँडलस् वरून कोकणात धार्मिक द्वेष कसा पसरवता येईल व कशा प्रकारे हिंदू मुसलमान करून भावना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. पण आमच्यातीलच काहींनी हा प्रयत्न उधळून लावला. कोकणात, तळकोकणापासून, राजापूर-रत्नागिरी भागात अनेक धर्मियांची धार्मिक स्थळं आहेत पण केव्हाच लोकांनी अंतर ठेवलं नाही एवढंच काय स्वातंत्र्य काळापासून कोकणातील शांतता कधीच भंग पावली नाही. काही तुटपुंज्या फेक हँडलस् ने द्वेष पसरवून काही घंटा फरक पडणार नाही,
Nov 19, 2020 9 tweets 9 min read
दादर म्हटलं की खरेदी ही आलीच. तिथे पदपथावर बरेच विक्रेते असतात. पण त्यातला कोणता #विक्रेता #मराठी आहे कोणता परप्रांतीय कसं कळणार?
आजच आलेला #अनुभव
स्थळ: स्टार मॉलच्या समोरील पदपथ
➡️ एका विक्रेत्याकडे खरेदी करत असताना नेहमीप्रमाणे मराठीत बोलायला सुरुवात केली. 👇🏻

#म #मराठी तो विक्रेताही माझ्याशी मराठीत बोलत होता. बाजूचा दुसरा विक्रेता आला आणि ते दोघेही गुजरातीत संवाद करू लागले. त्या दोघांना गुजरातीत संवाद करताना पाहून तिसर्‍या विक्रेता त्यांना म्हणाला, "तुम्ही दोघे काय बोलताय? आम्हाला समजेल असे हिंदीत बोला." (हे तो त्यांच्याशी हिंदीत बोलला)👇🏻