Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Trustee - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

May 28, 2021, 13 tweets

#Thread : रत्नागिरी पर्व - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जात्युछेदक कार्य

आज हिंदुत्वाचे जनक, आद्य स्वातंत्र्यवीर, सामाजिक क्रांतिकारक, महाकवि, लेखक, महामानव विनायक दामोदर सावरकर यांची जयंती.

तात्यारावांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन🙏🏼

#स्वातंत्र्यवीर_सावरकर_जयंती

१/१३

धर्मस्वातंत्र्य म्हणजे तत्त्वज्ञान सांगायचे स्वातंत्र्य, संघटितपणे प्रचार करण्याचे स्वातंत्र्य नव्हे. देशाच्या एकीला व नेकीला विरोधी असे धर्मस्वातंत्र्य असूच शकत नाही.

- स्वातंत्र्यवीर सावरकर

हिंदु समाजाला संघटित करणं हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं ध्येय होतं.

२/१३

सावरकरांना भारतीय समाजात मतभेद निर्माण करणार्‍या प्रथा नष्ट करायच्या होत्या.

६ जुलै, १९२० रोजी बंधू नारायणराव यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलेलं की, “मला इंग्रज राजवटी विरूद्ध लढा देण्याची जितकी गरज वाटते तितकीच जातीभेद आणि अस्पृश्यतेविरूद्ध बंड करण्याची गरज वाटते.”

३/१३

६ जानेवारी, १९२४ ला सावरकर बंधूंची रत्नागिरीच्या कारागृहातून सुटका झाली.

पण त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा सोडून जाण्यास बंदी होती.

रत्नागिरीतला हा काळ सावरकरांनी हिंदु समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्थकी लावला.

रत्नागिरीत केलेलं जात्युछेदक कार्य याच मोहीमेचा भाग होतं.

४/१३

#समाजसुधारक_सावरकर हे जातिव्यवस्थेचे कडक टीकाकार होते.

तात्यारावांनी तथाकथित खालच्या जातीतील मुलांनी शाळेत जावं या साठी त्यांच्या पालकांना आर्थिक प्रोत्साहन दिले आणि या जातीतील मुलांना स्लेट आणि खडूचे वाटप केले.

५/१३

एकदा मुलांना एकत्र शिक्षण मिळालं कि ते नंतरच्या जीवनात जातीभेद पाळणार नाहीत. त्यांना त्याची गरज भासणार नाही. याव्यतिरिक्त, सरकारने मागासवर्गीय जातीच्या मुलांसाठी विशेष शाळा बंद केल्या पाहिजेत. ह्याने शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हीनतेची भावना निर्माण होते - हे त्यांचं मत होतं.

६/१३

सावरकरांनी अस्पृश्यतेविरूद्ध सर्वात शक्तिशाली सामाजिक चळवळ सुरू केली होती.

१९२९ मध्ये त्यांनी अस्पृश्य समाजासाठी यज्ञोपवीत समारंभ, वेदांचे पठण आणि सामुदायिक भोजन आयोजित केले होते.

७/१३

सावरकरांना वैदिक साहित्य केवळ ब्राह्मणांसाठी नव्हे तर प्रत्येकासाठी लोकप्रिय करायचे होते.

त्यांनी स्वत: अस्पृश्य समाजातील लोकांना गायत्री मंत्र वाचणे, लिहिणे आणि पाठ करणे शिकवले होते.

हिंदु सणा दिवशी ते विविध जातीतील लोकांच्या घरी जाऊन मिठाई वाटप करत असत.

८/१३

#सावरकर हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते एक सक्रिय सामाजिक क्रांतिकारक होते.

जानवी घाला जानवी! - स्वातंत्र्यवीर विनायाक दामोदर सावरकर यांनी अस्पृश्य समाजाला केलेल्या या उपदेशावरुन त्यांच्या सामाजिक क्रांति ची ओळख आपल्याला पटेल.

९/१३

अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी रत्नागिरीत १९३१ साली पतित पावन मंदिराची स्थापना केली.

या मंदिराच्या समितीवर प्रत्येक जातीचे प्रतिनिधित्व करणारी लोकं होती.

याच बरोबर सावरकरांनी काही मंदिरात सामुदायिक जेवणाचेही आयोजन केले होते.

१०/१३

२१ सप्टेंबर, १९३१ रोजी पतितपावन मंदिरात महिलांसाठी महाराष्ट्रातील प्रथम सामुदायिक भोजन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी सुमारे ७५ महिला उपस्थित होत्या. १९३५ पर्यंत ही संख्या ४०० वर गेली होती.

यावर कोल्हापूरच्या सुप्रसिद्ध ब्राह्मणेतर नेते माधवराव बागल यांचे मत👇🏼

११/१३

१ मे, १९३३ रोजी सावरकरांनी अस्पृश्यांसह सर्व जातींच्या हिंदूंसाठी एक खानावळ सुरू केली. त्यांनी महार जातीतील एका व्यक्तीला तिथे भोजन देण्यासाठी नोकरी दिली होती.

संपूर्ण भारतातील ही पहिली अशी खानावळ होती. हे अशा वेळी होते जेव्हा आंतरजातीय जेवण समाजासाठी अकल्पनीय होते.

१२/१३

#समाजसुधारक_सावरकर एके ठिकाणी म्हणाले होते की, "तुम्ही माझी मार्सेलिसची उडी विसरलात तरी चालेल, पण माझी जात्युच्छेदक, अस्पृश्यता निवारक आणि विज्ञानवादी विचारप्रणाली मात्र मुळीच विसरू नका !"

सावरकरांचे हे कार्य जास्तं लोकांपर्यंत नाही पोहोचले हेच या देशाचे दुर्दैव!

१३/१३

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling