Ketan Sawant 🇮🇳 Profile picture
Proud #Indian | Tweets are Personal l #ModiLipi Learner | Author | DMV | Passionate about Chh. Shivaji and Sambhaji Maharaj | Founded @amogh_creations

Jul 12, 2021, 9 tweets

#थ्रेड #Thread

थोडंस संदर्भासहित बोलूया. आपल्या इतिहासकारांनी जे लिहून ठेवलंय जो शोध घेतलाय त्याबद्दल नितांत आदर आहेच. मी कुठेही त्यांचा अनादर करत नाहीय पण ह्या पोस्टमुळे कदाचित अस वाटू शकतं म्हणून लिहितोय कारण ते सगळेच मला कायम वंदनीय आहेत आणि राहतील.
१+

एक भयंकर रात्र आणि त्यात फक्त चिखलात रुतत जाणारे पाय आणि जिवाच्या आकांतने ते ओढट्झ काटे तुडवत विशाळगडाच्या दिशेने धावणारे ते स्वराज्य वेडे. खुद्द राजे सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. कसे? आषाढातल्या पावसाने आपली जादू दाखवली त्यात राजांचा धूर्तपणा कामी आला
२+

राजे पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर जाऊन पोहोचले सोबत कोण कोण होते तर नागव्या तलवारी परजून उभे असलेले बांदल- बाजी, फुलाजी. का? कारण त्यांनाच ती वाट माहिती होती. नजरबाज जागोजागी पेरले होते. सोबत कडाडणारी वीज पुढचा रस्ता दाखवीत होती.
३+

राजे विशाळगडावर पोहोचले आणि तोपर्यंत तिथे जौहरच्या छावणीत खबर पोहोचली की 'राजे पळाले'. लगोलग सिद्दी मसूद सैन्य घेऊन आला. तेव्हा बाजी फुलाजी विशाळगड उतरून त्यांनी मसूदला रोखलं ज्यात सर्व बांदल आणि बाजी फुलाजी ह्याना वीरमरण आलं. पण राजांना सुखरूप ठेवलं.
४+

मुद्दा असा आहे की लढाई ही पावनखिंडीत झालीच नाही आणि दुसरा असा की राजे बांदलांसोबत विशाळगडावर पोहोचले आणि मग बांदलांनी पुन्हा खाली उतरून मसूदला रोखलं.

ह्याला पहिला आणि सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे शिवभारत अध्याय २६ - श्लोक ७८, आणि २७ - श्लोक २२, २५, ३०, ३१, ३२.

५+

आता दुसरा पुरावा- शिवचरित्र प्रदीप पृष्ठ - २१

६+

आता तिसरा पुरावा - हे डच कंपनीच्या पत्र व्यवहारातल ५ सप्टेंबर १६६० सालच पत्र आहे.

खेळणा किल्ला - विशाळगड

संदर्भ - शि. प. सा. संग्रह खंड १ पृष्ठ १९४

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling