Ketan Sawant 🇮🇳 Profile picture
Jul 12, 2021 9 tweets 6 min read Read on X
#थ्रेड #Thread

थोडंस संदर्भासहित बोलूया. आपल्या इतिहासकारांनी जे लिहून ठेवलंय जो शोध घेतलाय त्याबद्दल नितांत आदर आहेच. मी कुठेही त्यांचा अनादर करत नाहीय पण ह्या पोस्टमुळे कदाचित अस वाटू शकतं म्हणून लिहितोय कारण ते सगळेच मला कायम वंदनीय आहेत आणि राहतील.
१+
एक भयंकर रात्र आणि त्यात फक्त चिखलात रुतत जाणारे पाय आणि जिवाच्या आकांतने ते ओढट्झ काटे तुडवत विशाळगडाच्या दिशेने धावणारे ते स्वराज्य वेडे. खुद्द राजे सिद्दीच्या वेढ्यातून निसटले. कसे? आषाढातल्या पावसाने आपली जादू दाखवली त्यात राजांचा धूर्तपणा कामी आला
२+
राजे पन्हाळ्यावरून निसटले आणि विशाळगडावर जाऊन पोहोचले सोबत कोण कोण होते तर नागव्या तलवारी परजून उभे असलेले बांदल- बाजी, फुलाजी. का? कारण त्यांनाच ती वाट माहिती होती. नजरबाज जागोजागी पेरले होते. सोबत कडाडणारी वीज पुढचा रस्ता दाखवीत होती.
३+
राजे विशाळगडावर पोहोचले आणि तोपर्यंत तिथे जौहरच्या छावणीत खबर पोहोचली की 'राजे पळाले'. लगोलग सिद्दी मसूद सैन्य घेऊन आला. तेव्हा बाजी फुलाजी विशाळगड उतरून त्यांनी मसूदला रोखलं ज्यात सर्व बांदल आणि बाजी फुलाजी ह्याना वीरमरण आलं. पण राजांना सुखरूप ठेवलं.
४+
मुद्दा असा आहे की लढाई ही पावनखिंडीत झालीच नाही आणि दुसरा असा की राजे बांदलांसोबत विशाळगडावर पोहोचले आणि मग बांदलांनी पुन्हा खाली उतरून मसूदला रोखलं.

ह्याला पहिला आणि सर्वात विश्वसनीय पुरावा म्हणजे शिवभारत अध्याय २६ - श्लोक ७८, आणि २७ - श्लोक २२, २५, ३०, ३१, ३२.

५+
आता दुसरा पुरावा- शिवचरित्र प्रदीप पृष्ठ - २१

६+
आता तिसरा पुरावा - हे डच कंपनीच्या पत्र व्यवहारातल ५ सप्टेंबर १६६० सालच पत्र आहे.

खेळणा किल्ला - विशाळगड

संदर्भ - शि. प. सा. संग्रह खंड १ पृष्ठ १९४
ह्यात दुमत असू शकत. समकालीन अजून काही पुरावे कोणाला मिळाले तर नक्कीच चर्चा करू शकतो.

@prahappy
@HearMeRoar21
@malhar_pandey @potnis_ashutosh
@threadreaderapp @authorAneesh

#History
#chhatrapatishivajimaharaj #म #मराठी

Unroll
समाप्त

• • •

Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh
 

Keep Current with Ketan Sawant 🇮🇳

Ketan Sawant 🇮🇳 Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

PDF

Twitter may remove this content at anytime! Save it as PDF for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video
  1. Follow @ThreadReaderApp to mention us!

  2. From a Twitter thread mention us with a keyword "unroll"
@threadreaderapp unroll

Practice here first or read more on our help page!

More from @KetansinhS

Sep 10, 2021
#भारत_भाग्य_विधाता
#Thread
2014 पूर्वी उठसुठ #US #Russia ह्यांच्याकडे धाव घेत होतो. पण आज चित्र बदलल आहे. UK, US, रशिया ह्यांचे #NSA हे श्री अजित #डोवाल ह्याना भेटायला भारतात येतात का? तर #अफगाणिस्तान! तोच अफगाणिस्तान ज्यावर रशिया,US (#महासत्ता😜) ह्यांनी अयशस्वी राज्य केलं! १/७
मोदी सरकारचे अपयश आहे काही गोष्टीत मान्य करायलाच हव पण हे सुद्धा बघायला हवं की जे गेल्या ७० वर्षात झालं नाही ते आता घडतंय. अतिदुर्गम भागात रेल्वे, राम मंदिर निकाल, ३७० कलम, तीन तलाक ह्या गोष्टी घडल्या. २/७
नुसतं गल्लीत माझा नगरसेवक, सरपंच - कार्यसम्राट, दादा, ताई हे करून आपला फायदा फक्त क्षणिक आहे. कारण राष्ट्र जर सुरक्षित हातात नसेल तर काय होऊ शकत हे आपण अफगाणिस्तान मध्ये बघतोच आहोत. विरोधक कितीही बोलले तरी मोदींना 🔔 फरक पडत नाही. ३/७
Read 8 tweets
Aug 30, 2021
#threadstorytimes

#कृष्ण जन्मतो कारागृही

आषाढाचा पाऊस. एवढा प्रचंड पाऊस पडतोय. पण पहारा! तो अजूनच कडक! कारागृहावर अजून दासींनी आणि रक्षकांनी दाटी केली आहे! १+
हलगर्जीपणा नको म्हणून प्रत्येक प्रहराला सैनिक बदलत आहेत. देवकीने जरा काही खुट्ट केलं तरी कंसाला खबर जातेय. घटका भरत आली आहे! नऊ मास उलटून गेले आहेत! आज नववा दिवस.

आपल्या आधीच्या सात अपत्यांसारखं ह्याला देखील तो नीच कंस मारून टाकणार का? २+
नको तो विचारच नको! आता ही कुडी फक्त त्याच्या भक्तीसाठी खर्च करायची! त्याला जे उचित वाटेल ते तो करेल. दिवस सरला! सकाळ पासून पावसाने जोर धरला. गोरज मुहूर्तावर त्याला अजून उधाण आलं! एवढा धुवांधार पाऊस की अगदी दोन हातावरच काही दिसत नव्हतं! मधेच सोसाट्याचा वारा सुटायचा! ३+
Read 7 tweets
Jul 28, 2021
१०० नंबरी सोन!

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटलं की एक नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे - श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.. एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व

पूर्ण नाव - बळवंत मोरेश्वर पुरंदरे. १/

#बाबासाहेब_पुरंदरे_शताब्दी
लहानपणापासून इतिहासाचं बाळकडू मिळालेले बाबासाहेब पुढे जाऊन एवढं भव्य कार्य करू शकले त्याची गोम खरी त्यांच्या बालपणात आहे. खुद्द पुरंदरे घराण्यात जन्म झाला. अस घराणं ज्याने शेकडो वर्षे ह्या महाराष्ट्राची सेवा केली. अशा समृद्ध इतिहासाचा वारसा लाभलेले बाबासाहेब. २/
बाबासाहेबांनी कधीही हातच राखून सांगितलं नाही. जे इतिहासात सापडलं ते तसच्या तस त्यांनी जगासमोर मांडलं. या महाराष्ट्राला कोमल, नाजूक नव्हे तर रांगडेपणाची सवय आहे पण कालौघात त्याच विस्मरण झालं. पण तो अज्ञानाचा थर बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं आणि ३/
Read 9 tweets
May 26, 2021
तोंडओळख दहशतवादी संघटनेची - भाग २

आज आपण आताच्या घडीला जगाची डोकेदुखी असलेल्या सगळ्यात खतरनाक दहशतवादी संघटनेची माहिती करून घेणार आहोत.
#आयसिस
२०१५ सालच्या द न्यूयॉर्क टाइम्स मध्ये एकलेख आला होता ज्यात अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशनचे मध्य-पूर्वेमधले एक उच्चपदस्थ अधिकारी मिशेल नागता ह्यांनी मान्यकेलं की "आम्ही त्यांचा विचार मारू शकलो नाही हेचकाय आम्हाला त्यांचा विचारच अजून कळलानाही" ISIS - इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया.
स्थापना - १९९९ साली जमात अल ताहीद वल जिहाद ह्यानावाने झाली.

ऑक्टोबर २००४ साली ह्यांनी अल - कायदा ह्या संघटनेशी हातमिळवणी केली.

ह्याचा निर्माता - अबू मुसब अल झराकी
नेता - अबू बक्र अल बगदादी
Read 10 tweets
May 13, 2021
#तिसरे_महायुद्ध
आपल्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय ह्याची कल्पना अभ्यासू लोकांना आली असेल आणि जे बेफिकीर वागतायत त्यांना All The Best! कारण
"जोवर राष्ट्र जिवंत आहे तोपर्यंतच आपण जिवंत आहोत" - डॉ अनिरुद्ध जोशी.

१/७
'शांतीचा बुरखा पांघरून तिसऱ्या महायुद्धाची डाकिण दार ठोठावते आहे' हे वाचलं आणि पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि मग काही दिवसात पुस्तक वाचून पूर्ण झालं. @lotuspubl ने प्रकाशित केलेलं हे पुस्तक #तिसरे_महायुद्ध. मराठी, इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे.

२/७
ह्याच डॉ अनिरुद्ध जोशी ह्यांनी दै प्रत्यक्ष @NewscastGlobal ह्यात तिसरे महायुद्ध ह्या विषयावर दीर्घ लेखमाला लिहिली जी आता पुस्तक रुपात उपलब्ध आहे. २००६ पासून तिसरे महायुद्ध अतिशयोक्ती वाटणाऱ्यांना आता ह्यापुस्तकाच महत्त्व पटू लागलय. जगात स्थित्यंतरे घडवणारी २ महायुद्ध आणि

३/७
Read 9 tweets

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3/month or $30/year) and get exclusive features!

Become Premium

Don't want to be a Premium member but still want to support us?

Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal

Or Donate anonymously using crypto!

Ethereum

0xfe58350B80634f60Fa6Dc149a72b4DFbc17D341E copy

Bitcoin

3ATGMxNzCUFzxpMCHL5sWSt4DVtS8UqXpi copy

Thank you for your support!

Follow Us!

:(