Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Sep 18, 2021, 12 tweets

छायाचित्रांचा #Thread : पुण्याचा गणेशोत्सव (२०२१)

गेल्या वर्षी (२०२०) कोरोनामुळे नेहमीसारखा गणेशोत्सव साजरा करता आला नाही.

पण ह्या वर्षी काही राहवलं नाही. म्हणून काळजी घेऊन श्रींच्या दर्शनासाठी गेलेलो.

🔸मानाचा पहिला : कसबा गणपती

#मराठी #Pune

@ShefVaidya @aparanjape

१/१२

🔸मानाचा दुसरा : तांबडी जोगेश्वरी गणपती

२/१२

🔸मानाचा तिसरा : गुरुजी तालीम गणपती

३/१२

🔸मानाचा चौथा : तुळशीबाग गणपती

४/१२

🔸मानाचा पाचवा : केसरीवाडा गणपती

५/१२

🔸श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : पुण्याचे आराध्य दैवत

यंदा मूळ मंदिरातंच श्रींची प्रतिष्ठापना झाल्यामुळे मनासारखी छायाचित्रे काढता आली नाहीत.

म्हणूनंच २०१९ च्या गणेशोत्सवातील छायाचित्र पण जोडत आहे.

६/१२

🔸भाऊसाहेब रंगारी गणपती

१८९२ साली सरदार खासगीवाले, गणपतराव घोटवडेकर आणि भाऊ रंगारी ह्यांनी एकत्रितपणे हा गणपती बसवला.

पुढे १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकारच्या विरोधात सगळ्या समाजाला एकत्र आणण्यासाठी पुणे-मुंबईसह इतर ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली.

७/१२

🔸अखिल मंडई मंडळाचा श्री शारदा गजानन

८/१२

🔸मंडईच्या गणपती समोर असणारी क्षत्रियकुलावतंस गोब्राह्मणप्रतिपालक हैंदव धर्म-उद्धारक म्लेंच्छक्षयदीक्षित श्री राजा शिवछत्रपती ह्यांची सिंहासनारुढ मूर्ति

९/१२

🔸हुतात्मा बाबू गेनु गणपती

१०/१२

🔸महात्मा फुले मंडईच्या परिसरात असलेलं श्री स्वामी समर्थांचं मंदिर आणि लोकमान्य टिळक ह्यांचा पुतळा

२२ जुलै १९२४ रोजी मोतीलाल नेहरूंच्या हस्ते हा पुतळा बसविण्यात आला. पांढऱ्या शुभ्र मेघडंबरीत असणाऱ्या लोकमान्यांची नजर आजही धारदार आहे. त्यांच्या नजरेतून त्यांचा धाक जाणवतो.

११/१२

🔸केसरीवाड्यातील काही चित्र:

१) साहित्यसम्राट न.चि.केळकर, दादासाहेब खापरडे आणि लोकमान्य

२) क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर

३) लाल-बाल-पाल, पंडित मदनमोहन मालवीय आणि इतर मंडळी

आणि नर-केसरी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक…

#गणेशोत्सव२०२१ #KnowPune

१२/१२

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling