Devashish Kulkarni Profile picture
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

Sep 23, 2021, 14 tweets

#Thread : एकता

गेल्या काही दिवसांपासून ‘मराठ्यांच्या राज्याचा अखेर’- ह्या विषयावरचे समकालीन संदर्भ चाळताना यशवंतराव होळकर यांची काही महत्त्वाची पत्रे वाचनात आली.

त्यावेळची आणि आजची परिस्थिती काही वेगळी नाही. म्हणूनंच प्रत्येकाने यशवंतरावांचे विचार आत्मसात करणे गरजेचं आहे.

१/१४

महादजींच्या मृत्यूनंतर त्यांचे दत्तकपुत्र दौलतराव ह्यांच्या हाती सत्ता आली.

दौलतराव महत्वाकांक्षी होते. तुकोजी होळकरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ज्येष्ठ पुत्रास (काशीराव) हाताशी धरुन सगळी सत्ता स्वतःकडे घ्यायची होती.

रावबाजी तर पहिल्यापासून दौलतरावाच्या अमलाखाली होते.

२/१४

पण नाना फडणवीस आणि मल्हारराव होळकर ह्यांना हे मान्य नव्हतं. मल्हारराव कर्तृत्ववान होते.

पेशवे-शिंदे-होळकर ह्यांच्यात रावबाजी-दौलतराव-काशीराव आणि नाना-मल्हारराव असे गट निर्माण झालेले.

नानाच्या भितीमुळे बाजीरावाने दौलतरावास पुण्यात ठेवून घेतलेलं.

३/१४

दौलतरावांनी काशीरावाला हाताशी धरुन पुण्यात मल्हाररावांना ठार केलं. ह्या भयानक हत्येमुळे नाना फडणवीस हदरुन गेलेले.

ह्या सगळ्यामुळे होळकर-शिंदे वाद लयाला गेला.

पुढे १६-४-१८०१ रोजी बाळोजी कुंजराच्या ऐकून मूर्ख रावबाजीने विठोजी होळकर ह्यांची अमानूष हत्या करवली.

४/१४

नरसिंह विंचूरकर ह्यांच्या विनवण्यांचा ही फायदा झाला नाही.

इथूनंच मराठ्यांच्या राज्याच्या अखेराला सुरुवात झाली.

एवढं सगळं होऊन ही यशवंतरावांच्या मनात पेशव्यांसाठी असलेला जिव्हाळा कमी झालेला नव्हता.

१७-६-१८०१ रोजी लिहीलेल्या पत्रातून यशवंतरावांची पवित्र भावना दिसून येते.

५/१४

पुढे १८०२ मध्ये यशवंतराव पुण्यास यायला निघाले.

दौलतरावांच्या तावडीतून पुण्याला सोडवायचे आणि रावबाजीकडून बाळोजी कुंजर ला आपल्या ताब्यात घ्यायचे अशी त्यांची इच्छा होती.

पण यशवंतराव पुण्यावर चालून येत आहेत म्हटल्यावर बाजीराव कासावीस झाले.

६/१४

यशवंतरावांनी समेट घडवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण बाळोजी कुंजर ह्याने हा समेट होऊ दिला नाही.

२५-१०-१८०२ रोजी हडपसरच्या युद्धात यशवंतराव होळकर ह्यांनी पेशवे-शिंदे ह्यांच्या फौजांना पाणी पाजलं.

युद्धाचा परिणाम लक्षात येताच रावबाजी पर्वतीवरुन सिंहगडाच्या पायथ्याशी पळून गेला.

७/१४

पण यशवंतरावांचा रोष रावबाजीवर होता का?

नाही!

यशवंतरावांच्या शौर्याचं वर्णन करताना रियासतकार सरदेसाईंनी यशवंतरावांच्या मनातील भावना फार छान टिपल्या आहेत.

ज्या माणसाने आपल्या भावाची अमानूष हत्या केली त्याच्याबद्दल पण यशवंतरावांची काय भावना होती ते पहा👇🏼

८/१४

यशवंतरावाने दुसऱ्या बाजीरावास परत येण्यास सांगितले. पण रावबाजी सुवर्णदुर्गमार्गे वसईला गेला.

इंग्रजांसोबत रावबाजीने वसईचा तह केला. तहानंतर लगेच बाजीराव आणि यशवंतराव ह्यांच्यामध्ये काही गुप्त पत्रव्यवहार झाला.

ह्यासंबंधी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे ह्यांचा लेख👇🏼

९/१४

१६-३-१८०३ रोजी यशवंतरावांनी अमृतराव पेशव्यांना एक पत्र पाठवलं.

यशवंतराव म्हणतात, "श्रीमंतांची दौलत मोठी आहे, माणसं आता शंभर वर्षात वाढली आहेत त्यामुळे एकदिली नाही असं वाटल्यास तसं समजू नये. पूर्वापार चालीवर दृष्टी ठेऊन सगळे एका दिवशी एकदिल होतील, आणि हेच उत्तम आहे”.

१०/१४

ह्या पत्रातून यशवंतरावांचे उच्च विचार दिसून येतात.

आज सगळ्यांनी हे विचार आत्मसात करण्याची अत्यंत गरज आहे.

इतिहासाचं विकृतीकरण करणारे #बाजारु_विचारवंत नेहमी बाजीराव-यशवंतराव वाद रंगवून सांगतात आणि ब्राह्मण-धनगर वाद पेटवून द्यायचा प्रयत्न करतात.

११/१४

प्रत्येकाने एकदा तरी इतिहास जातीचा चष्मा काढून वाचावा. आपल्या लक्षात येईल की अगदी १६४६ पासून १८१८ पर्यंत मराठ्यांच्यात अनेक वाद झाले. पण ते कधीही जातीय नव्हते. राजकारणापूर्ते मर्यादित होते.

मराठ्यांच्या राज्याचा अखेर होण्याचे एकंच कारण होते - आपापसातील वाद!

१२/१४

दुर्दैवाने आज ही परिस्थिती वेगळी नाही. पण इतिहासातून बोध घेऊन आपण हे सगळे वाद मिटवून ‘येक होऊन परराष्ट्राचा प्रसार नाही होऊ दिला पाहिजे’.

जातीभेद उभा जाळावा, अवघा हिंदु तितुका मिळवावा!

🚩#जयभवानी_जयशिवराय🚩

१३/१४

संदर्भः

१) मराठी रियासत उत्तर विभाग ३ (रियासतकार सरदेसाई)

२) पेशवे दप्तर खंड ४१

३) भारत सरकारचा केंद्रीय दफ्तरखाना - ऐतिहासिक मराठी साधनें

१४/१४

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling