🆂🅰🅽🆃🅾🆂🅷 🆁🅰🆅🅺🅰🅻🅴 Profile picture
💢छत्रपती शिवाजी महाराज🚩 💢हिंदू मराठा 96 कुळी ⚔️ 💢निस्सिम कपालेश्वर भक्त 🔱 💢पुस्तक वाचन 📚 💢बुद्धिबळ♟ 💢अंतः अस्ति प्रारंभः 💢B'Day - 09 Mar🎉🎂

Jun 7, 2022, 14 tweets

#एक_सुगंधी_दिवस_स्वस्थ_रहा_मस्त_रहा
#प्राजक्ताच्या_सुगंधा_प्रमाणे_दरवळत_रहा
पहाटे #प्राजक्ता सारखे उमजलून,निशिगंधा
सारखे सुगंधित होत जावे सुगंधित आनंदा
च्या लाटांवर आयुष्य झुलत जावे.अश्रू असो
कुणाचेही आपणच विर घळुन जावे नसतो

कुणीही आपले आपण मात्र सर्वांच्या व्हावे.
प्राजक्त पारिजात नाव घेता सुगंध दरवळतो
पहाटेचे मंद मंद आसमंत,गार वारा कोवळे
उन ल् त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा
सडा हिवाळा सुरु झाला की प्राजक्त बहरा
यला लागतो सकाळी सकाळी झाडाखाली

फुलांचा अगदी सडा पडलेला असतो झाडा
वरुन प्राजक्त ओघळतो त्याचा आवाज होत
नाही याचा अर्थ असा होत नाही की त्याला
इजा होत नाही.प्राजक्त किंवा पारिजातक
किती नाजुक फुलं कळी पूर्ण उमलली की

इतर फुलाझाडां प्रमाणे फुल खुडायचीही
गरज नसते डबडबलेल्या डोळ्यांतुन अश्रु
ओघळावा,तसं देठातुन फ़ुल जमिनीवर
ओघळतं सकाळी सकाळी झाडाखाली
फुलांचा सडा पडलेला असतो झाडावरुन
प्राजक्त ओघळतो.आवाज होत नाही याचा
अर्थ असा नाही की त्याला इजा होत नाही

किती नाजुक फुलं.कळी पूर्ण उमलली की,
इतर फुलाझाडांप्रमाणे खुडायचीही गरज
नसते..डबडबलेल्या डोळ्यांतुन अश्रु ओघ
ळावा तसं देठातुन फ़ुल जमिनीवरओघळतं.
सुख वाटावे जनात, दुःख ठेवावे मनात" हे

प्राजक्ताच्या फुलांनी शिकवलं...एवढसं
आयुष्य त्या फुलांचं.झाडापासुन दुर होता
नाही गवगवा करीत नाहीत. छोट्याशा
नाजुक आयुष्यात आपल्याला भरभरुन
आनंद देतात.आणि केवळ आपल्यालाच

नाही तर आपल्या कुंपणात लावलेल्या या
झाडाची फुलं शेजारच्यांच्या अंगणात पड
तात की.खरंच.प्राजक्त 'मोकळा' झाला पण
रिता झाला असेल का खरंच ? मला नाही
तसं वाटत 'रित' होण्यासाठी 'रिकामं'असावं

लागतं मुळात प्राजक्ता कडे हे रिकामपण
नक्कीच नाही तो केव्हाच पुन्हा सृजनाच्या
त्या सुंदर प्रक्रियेत मशगुल झाला उद्यासाठी
तेवढ्याच कळ्यांना खुलवायचंय...फुलांना
फुलवायचंय प्रत्येकात सुगंधाची कुपी लपवा
यचीये शिवाय देठादेठात केशर माती कडून
घेतलेल्या जीवन रसाचं देणं,निसर्गाला

सुगंधाच्या रूपात परत करायचंय उपकारांची
परतफेड करायची आहे ही जाणीव आहे
त्याला कृतघ्न व्हायला तो काही माणूस
नाही जणु ज्या क्षणी ती फुलं फांदीपासून
सुटतात त्या क्षणी तो फुलांवरचे सारे हक्क

ही सोडतो आजची फुललेली सारी फुलं
वर्तमानाच्या त्या क्षणाला वाहून मोकळा
होतो गुंतून नाही पडत तो त्या फुलांमध्ये
म्हणून विरहाच दुःख त्याला ठाऊक नाही.
आणि म्हणूनच रितेपणा ची भावना मुळ
धरत नाही.तो अनुभवतो .ती फक्त बहर
ण्यातली परिपूर्णता 'देण्या'तलं समाधान

आपल्यालाही जर आपले आयुष्य असंच
जगता आलं तर ? प्राजक्त पारिजातक..
.माणसाचं आयुष्यही असंच.एवढसं क्षण
भंगुर प्राजक्ता सारखं.कधी ओघळुन जाईल
माहीत नाही..आज आहे त्यात भरभरुन

द्यावं हेच खरं.तो तो क्षण वर्तमानाला अर्पण
करून टाकायचा. आणि मोकळं व्हायचं त्या
क्षणातून ! गुंतून नाही रहायचं त्यात. पुढचा
नवा क्षण खुलवायला.फुलवायला.नव्याने
सज्ज व्हायचं फक्त आपलंच नाही तर इतरां
चही आयुष्य सुगंधी करायचं.जमेल का,असं
प्राजक्त व्हायला आपल्याला #शक्य झाल्यास

सकाळी फिरता फिरता पारिजातकाच्या झाडा
खाली थोडं थांबु या सुगंधा सोबतच त्याची थोडी
#प्रांजळता,#निर्मळता ह्रदयात भरुन घेऊ या.
.बघा कसं #प्रसन्न वाटतं.#rusantusht
#एक_सुगंधी_दिवस_स्वस्थ_रहा_मस्त_रहा
#प्राजक्ताच्या_सुगंधाप्रमाणे_दरवळत_रहा
🇷 🇺 🇸 🇦 🇳 🇹 🇺 🇸 🇭 🇹

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling