#Threadकर
#सत्यशोधक
विषय: गांधी सावरकर (भाग१)
गांधी,जिना,सावरकर आणि आंबेडकर अशे चारही बेरिस्टरांवर पुस्तक लिहण्याचे यदुनाथ थत्ते यांनी सुरेश द्वादशीवार यांना सुचवलं होत.यदुनाथ थत्ते गेल्यानंतरही त्या सूचनेला न विसरता द्वादशीवार यांनी पूर्ण केलं.
#MahatmaGandhi #म (१)
गांधी आणि त्यांचे टीकाकार मध्ये ते लिहितात .
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताला स्वातंत्र्य देण्याचं आश्वासन देत असाल तरच युद्धाला सहाय्य करू अशी ताकीद इंग्रज सरकारला काँग्रेस ने दिली.त्यावेळी सावरकरांनी हिंदूंचे सैनिकीकरण करण्याची घोषणा करून भारतीय तरुणांना इंग्रज फौजेत भरती (२)
होण्याचे आवाहन केले धर्माच्या नावावर गांधींनी धर्माच्या नावावर होऊ घातलेल्या फाळणीवर विरोध करणारी भूमिका घेतली तेव्हा १९२५ पर्यंत हिंदू आणि मुसलमान ही दोन वेगळी राष्ट्र आहेत ही सर सय्यद अहमद यांच्या पातळीवर जाऊन भूमिका घेणारे सावरकर हे हिंदूंचे राष्ट्र आहे असं म्हणत गांधींवर (३)
मात करण्याचा प्रयत्न करू लागले.जेव्हा प्रत्यक्ष फाळणी झाली तेव्हा त्यांनी आणि त्यांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील त्यांच्या अनुयायांनी फाळणी च्या पापाच खापर गांधींच्या माथ्यावर फोडलं आणि तसा प्रचार केला परंतु त्यांनी किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील हिंदूमहासभेने फाळणी विरुद्ध कुठे (४)
आंदोलन केले असे निदर्शनास आले नाही. तात्पर्य काय तर हिंदू महासभा काँग्रेस सोबत असताना तिच्या पंखाखाली राहिली आणि सावरकर नेतृत्व लाभता ती इंग्रज विरोधी न बनता गांधी विरोधी बनली.(५)
पुढे…
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.
