राईट्स इश्यू म्हणजे काय?
निधी उभारण्यासाठी कंपन्या राईट्स इश्यूचा वापर करतात. आता याला राईट्स असं का म्हणतात? तर ज्या लोकांकडे याच कंपनीचे शेअर्स आधीपासून आहेत त्यांना अजून शेअर्स घेण्याचा हक्क, राईट या माध्यमातून मिळतो.
#म #मराठी #Suzlon
पण या शेअर होल्डर्सने ते शेअर्स विकत घेतलेच पाहिजेत अशी सक्ती नसते. शिवाय हे नवीन शेअर्स कंपनी सध्याच्या भावापेक्षा कमी किंमतीत देते. #म #मराठी
म्हणजे बेसिकली कंपनी तुम्हाला आणखी शेअर्स घ्या असे एक प्रकारे आवाहन करते. मग आता समजा तुम्हाला हे जास्तीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत तर ते कसे घेणार?
तर कंपनी यासाठी भविष्यातील एक तारीख निश्चित करते. #म #मराठी
आता सुझलॉनने काय केलंय? तर निधी उभारणीसाठी राईट्स इश्यू आणला आहे. यातून उभा राहिलेला पैसा ते डेट कमी करण्यासाठी वापरु शकतील.
प्रत्येक कंपनी याच हेतूने राईट्स इश्यू आणते असेही नाही. मागे रिलायन्स, एअरटेल यांनीसुद्धा राईट्स इश्यू आणला होता. #म #मराठी
आता राईट्स इश्यूमध्ये तुम्हाला किती शेअर्स विकत घेता येऊ शकतात? तर याच एक प्रमाण कंपनी ठरवते. उदा. तुमच्याकडे सुझलॉनचे १०० शेअर्स असतील तर तुम्हाला १० शेअर्स राईट्समधून विकत घेता येतील. हे फक्त उदाहरण आहे. #म #मराठी
समजा सुझलॉन आत्ता १० रुपयांवर ट्रेड करतोय तर राईट्समध्ये कंपनी तुम्हाला ७ रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स देते. म्हणजे ३०% डिस्काऊंटमध्ये.
आता तुम्हाला १० शेअर्स राईट्समध्ये मिळणार हे तर तुम्हाला कळले. पुढे काय? तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत. #म #मराठी
१. राईट्समध्ये मिळणारे सगळे १० शेअर्स विकत घेणे.
यात तुम्हाला नवे शेअर डिस्काउंटमध्ये मिळणार. पण त्याचवेळी हे लक्षात घ्या की राईट्स इश्यूची किंमत सध्याच्या मार्केटमधील भावापेक्षा कमी आहे. #म #मराठी
म्हणजे जेव्हा राईट्स इश्यू पूर्ण होईल तेव्हा शेअरची मार्केटमधील किंमत आत्ताच्या भावापेक्षा कमी असेल. म्हणजे तुमच्याकडे आत्ता जे शेअर्स आहेत त्याची किंमत कमी होईल. पण त्याचवेळी नव्याने खरेदी केलेले शेअर्स स्वस्तात मिळाले आणि त्याची किंमत राईट्स इश्यू नंतर जास्त असेल. #म #मराठी
सो तो प्रॉफिट असेल. एकुणात ऍव्हरेज होईल.
२. काहीच न करता बसून राहणे आणि १० शेअर्स विकत न घेणे.
तुमच्याकडे राईट्स इश्यूमधून शेअर्स विकत घ्यायला पैसे नाहीत. त्यामुळे तुम्ही काहीच न करता राईट्स एक्सपायर होऊ देता. #म #मराठी
३. तुमच्या वाट्याचे राईट्स इतर कुणालातरी विकणे. यासाठी कंपनीने तसा पर्याय देणे गरजेचे असते.तरच तुम्ही तुमचे राईट्स इतरांना विकू शकता. तशी सूचना तुम्हाला कंपनीकडून मिळते.
आता ज्यांना सुझलॉनकडून राईट्स इश्यू बाबत ईमेल आला आहे त्यांना काय करायचे हे कळेल. #म #मराठी
फक्त ईमेलमध्ये राईट्स विकत घेण्यासाठी पेमेंटची तारीख किती आहे ते पाहून त्याच्याआधी पेमेंट करा. राईट्स नको असतील तर काही करू नका.
भविष्यात तुमच्याकडे असलेल्या कंपनीने राईट्स इश्यू आणला तर काय करायचे हे तुम्हाला नक्की कळेल. #म #मराठी
शेअर मार्केटमधील मराठी लोकांसाठी पैसापाणी आणि चार्टीयन्स घेऊन आले आहेत 'महाराष्ट्रातला सर्वात मोठा वेबिनार'
या मेंटरशिप प्रोग्रॅमबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर आम्हाला मेसेज करा.
wa.me/message/AFGSHH…
#म #मराठी @chartians
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.