राईट्स इश्यू म्हणजे काय?
निधी उभारण्यासाठी कंपन्या राईट्स इश्यूचा वापर करतात. आता याला राईट्स असं का म्हणतात? तर ज्या लोकांकडे याच कंपनीचे शेअर्स आधीपासून आहेत त्यांना अजून शेअर्स घेण्याचा हक्क, राईट या माध्यमातून मिळतो. #म#मराठी#Suzlon
पण या शेअर होल्डर्सने ते शेअर्स विकत घेतलेच पाहिजेत अशी सक्ती नसते. शिवाय हे नवीन शेअर्स कंपनी सध्याच्या भावापेक्षा कमी किंमतीत देते. #म#मराठी
म्हणजे बेसिकली कंपनी तुम्हाला आणखी शेअर्स घ्या असे एक प्रकारे आवाहन करते. मग आता समजा तुम्हाला हे जास्तीचे शेअर्स विकत घ्यायचे आहेत तर ते कसे घेणार?
तर कंपनी यासाठी भविष्यातील एक तारीख निश्चित करते. #म#मराठी
आता सुझलॉनने काय केलंय? तर निधी उभारणीसाठी राईट्स इश्यू आणला आहे. यातून उभा राहिलेला पैसा ते डेट कमी करण्यासाठी वापरु शकतील.
प्रत्येक कंपनी याच हेतूने राईट्स इश्यू आणते असेही नाही. मागे रिलायन्स, एअरटेल यांनीसुद्धा राईट्स इश्यू आणला होता. #म#मराठी
आता राईट्स इश्यूमध्ये तुम्हाला किती शेअर्स विकत घेता येऊ शकतात? तर याच एक प्रमाण कंपनी ठरवते. उदा. तुमच्याकडे सुझलॉनचे १०० शेअर्स असतील तर तुम्हाला १० शेअर्स राईट्समधून विकत घेता येतील. हे फक्त उदाहरण आहे. #म#मराठी
समजा सुझलॉन आत्ता १० रुपयांवर ट्रेड करतोय तर राईट्समध्ये कंपनी तुम्हाला ७ रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स देते. म्हणजे ३०% डिस्काऊंटमध्ये.
आता तुम्हाला १० शेअर्स राईट्समध्ये मिळणार हे तर तुम्हाला कळले. पुढे काय? तुमच्याकडे पुढील पर्याय आहेत. #म#मराठी
१. राईट्समध्ये मिळणारे सगळे १० शेअर्स विकत घेणे.
यात तुम्हाला नवे शेअर डिस्काउंटमध्ये मिळणार. पण त्याचवेळी हे लक्षात घ्या की राईट्स इश्यूची किंमत सध्याच्या मार्केटमधील भावापेक्षा कमी आहे. #म#मराठी
म्हणजे जेव्हा राईट्स इश्यू पूर्ण होईल तेव्हा शेअरची मार्केटमधील किंमत आत्ताच्या भावापेक्षा कमी असेल. म्हणजे तुमच्याकडे आत्ता जे शेअर्स आहेत त्याची किंमत कमी होईल. पण त्याचवेळी नव्याने खरेदी केलेले शेअर्स स्वस्तात मिळाले आणि त्याची किंमत राईट्स इश्यू नंतर जास्त असेल. #म#मराठी
सो तो प्रॉफिट असेल. एकुणात ऍव्हरेज होईल.
२. काहीच न करता बसून राहणे आणि १० शेअर्स विकत न घेणे.
तुमच्याकडे राईट्स इश्यूमधून शेअर्स विकत घ्यायला पैसे नाहीत. त्यामुळे तुम्ही काहीच न करता राईट्स एक्सपायर होऊ देता. #म#मराठी
३. तुमच्या वाट्याचे राईट्स इतर कुणालातरी विकणे. यासाठी कंपनीने तसा पर्याय देणे गरजेचे असते.तरच तुम्ही तुमचे राईट्स इतरांना विकू शकता. तशी सूचना तुम्हाला कंपनीकडून मिळते.
आता ज्यांना सुझलॉनकडून राईट्स इश्यू बाबत ईमेल आला आहे त्यांना काय करायचे हे कळेल. #म#मराठी
फक्त ईमेलमध्ये राईट्स विकत घेण्यासाठी पेमेंटची तारीख किती आहे ते पाहून त्याच्याआधी पेमेंट करा. राईट्स नको असतील तर काही करू नका.
भविष्यात तुमच्याकडे असलेल्या कंपनीने राईट्स इश्यू आणला तर काय करायचे हे तुम्हाला नक्की कळेल. #म#मराठी
शेअर मार्केटमधील मराठी लोकांसाठी पैसापाणी आणि चार्टीयन्स घेऊन आले आहेत 'महाराष्ट्रातला सर्वात मोठा वेबिनार'
या मेंटरशिप प्रोग्रॅमबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकवर आम्हाला मेसेज करा. wa.me/message/AFGSHH…
तुम्हाला दुकानदाराने डुप्लीकेट चार्जर📲देऊन गंडवले तर...कदाचीत असे चार्जर खराब क्वॉलीटीचे📵 असल्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. परंतू हे डुप्लीकेट चार्जर्स 📲ओळखणे सोप्पे आहे. थ्रेड👇
#Thread #म #मराठी 1/n
आजकाल अनेक मोबाईल कंपन्या मोबाईल सोबत चार्जर्स देत नाहीत. तसेच बऱ्याच वेळा आपला चार्जर खराब देखील होतो. अशावेळी चांगला चार्जर विकत घेणे मोठे कठिण होते. परंतू त्यावर उपाय सापडला आहे. चार्जर घेताना त्यावर तीन सिंबॉल प्रिंट केलेले असतात. ते नक्की पाहून घ्या.
#म #मराठी
2/n
डबल स्केअरचे जे सिंबॉल असते त्याचा अर्थ चार्जर इलेक्ट्रिक शॉक फ्री आहे. होमचा अर्थ असा आहे की हे चार्जर तुम्ही घरात वापरू शकता. याशिवाय ८ सारख्या सिंबॉलचा अर्थ आहे हे हाय क्वॉलीटी चार्जर असून यापासून चांगला परफॉर्मन्स मिळू शकतो.
#म #मराठी 3/n
आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की ज्या कर्ज घेतल्याशिवाय शक्य होत नाहीत आणि म्हणूनच आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी कर्ज घेतो. मात्र या कर्जाचे मॅनेजमेंट व्यवस्थित केले नाही तर त्याचा डोंगर उभा राहतो.
#म #मराठी
त्यातून मार्ग काढणे कधीकधी अतिशय जिकिरीचे होऊ शकते. मग या कर्जाच्या डोलाऱ्याखाली अनेकदा कुटुंब देखील उध्वस्त होते. म्हणूनच आजच्या थ्रेडमधून आपण कर्जमुक्त होण्याचे सहा मार्ग पाहणार आहोत. #म #मराठी
पहिला मार्ग आहे तो म्हणजे डेट कन्सॉलिडेशन, म्हणजे तुमची जी कर्जे आहेत किंवा क्रेडिट कार्डवरचे बॅलन्स आहेत, ते तुम्ही एकाच कर्जात एकत्र करायचे. या एकाच कर्जाचा व्याजदर इतर कर्जांच्या व्याजदरापेक्षा कमी असेल. #म #मराठी
डिजिटल एज्युकेशन क्षेत्रामध्ये काम करणारी बायजूज ही भारतीय युनिकॉर्न कंपनी आता घराघरामध्ये पोहोचली आहे. अगदी शनिवार, रविवार तुम्ही घरच्यांसोबत शॉपिंग मॉलमध्ये गेलात तर तिथेही या कंपनीचे सेल्स एक्झिक्युटिव्ह तुमचा पिच्छा सोडत नाहीत. #म #byjus
ऑनलाइन शिक्षण कसे महत्त्वाचे आहे आणि ऑनलाइन हेच कसे भविष्य आहे हे सगळ्यांना पटवून देत बायजूज ही कंपनी मोठी झाली. मात्र 2021 मध्ये या कंपनीने डिजिटल हेच भविष्य हा आपला मंत्र बाजूला ठेवत आयआयटी आणि मेडिकल प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारी #म #मराठी #byjus
आकाश एज्युकेशन सर्विसेस ही कंपनी विकत घेतली. नुसती विकतच घेतली नाही तर त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च केला. किती? तर तब्बल एक बिलियन डॉलर. म्हणजे साधारण आठ हजार कोटी रुपये!! जगभरामध्ये शिक्षण क्षेत्रातील कंपन्यांमध्ये झालेले हे सगळ्यात मोठे डील असेल. #म #byjus
थ्रेड👇
लॉकरमधून वस्तू चोरीला गेल्यास बँक भरपाई देते?
#मराठी #म #Banks
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या मौल्यवान वस्तू, सोनं वगैरे बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवता. यासाठी बॅंक तुमच्याकडून वार्षिक चार्जेसही घेते. परंतू जर त्या लॉकरमधील वस्तूंची चोरी झाली तर?.
@MarathiRT @MarathiBrain @RtMarathi @Mazi_Marathi @HashMarathi तुम्हाला यासाठी बॅंक कर्मचाऱ्याशी भांडण्याची गरज नाही. आरबीआयचा एक नियम तुम्हाला ग्राहक म्हणून इथे कामाला येतो.
एकच कंपनी अनेक स्टॉक एक्सचेंजेसवर लिस्टेड का असते?
थ्रेड👇
#म #मराठी #StockMarket #StockExchange
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi भारतात अनेक कंपन्या या बीएसई किंवा एनएसई अशा दोनही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट आहेत. इंफोसिससारखी कंपनी तर बीएसई एनएसई आणि अमेरिकेतील NASDAQ एक्सचेंजवरही लिस्ट आहे.
@MarathiRT @MarathiBrain @Mazi_Marathi कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होते, तेव्हा तीला वन टाइम फी बरोबरच अन्युअल फीदेखील भरावी लागते. मग कंपन्या इतका खर्च करून कंपन्या वेगवेगळ्या एक्सचेंजेसवर का लिस्ट होतात. तर त्याला मुख्य तीन कारणं आहेत.
भारतात पहिली नोटबंदी कधी झाली होती?
थ्रेड👇
#म #मराठी #Money
भारतात १९५४ साली आरबीआयने ५ हजार व १० हजारांच्या नोटा छापल्या होत्या. पुढे या नोटा २४ वर्ष चालू राहिल्या. परंतू १९७८ साली या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या.
थोडक्यात काय तर १९७८ पहिल्यांदा नोटबंदी करण्यात आली होती. तेव्हा ५ हजार व १० हजारांच्या नोटा चलनातून बाहेर काढण्यात आल्या होत्या. बाकी इतर नोटा मात्र चलनात होत्या.