PaisaPani Profile picture
अर्थ विषयावरील सर्व अपडेट्स आपल्या मराठी भाषेत तुमच्यासाठी... 📲Whatsapp- https://t.co/G87QKpUJZs 📲Telegram- https://t.co/oO9DDgqffm 📲YouTube- https://t.co/dwgx70PxBb

Oct 10, 2022, 8 tweets

स्थळ - आयसीआयसीआय बँक, लोणावळा ब्रँच

एके दिवशी एक साठीतला माणूस बँकेत आला. आतमध्ये जाऊन एका कोपऱ्यात बसला. बराच वेळ तो बँकेत चाललेल्या कामाचे निरीक्षण करत होता. हा माणूस इतर लोकांसारखा कस्टमरच असेल असे वाटून बँकेचे कर्मचारी त्यांचे काम करत होते.
#म #मराठी #icici

काही वेळाने तो माणूस उठला आणि ब्रँच मॅनेजरच्या केबिनमध्ये गेला.त्याने ब्रँच मॅनेजरला आपली ओळख सांगितली,

"मी संदीप बक्षी."
एवढ्याने ब्रँच मॅनेजरने त्याला ओळखणे अपेक्षित होते मात्र तसे झाले नाही.मग त्या माणसाने ब्रँच मॅनेजरला सांगितले की,

"मी संदीप बक्षी.आयसीआयसीआय बँकेचा सीईओ."

ते ऐकून ब्रँच मॅनेजरची धांदल उडाली. त्याने आधी बक्षी यांची माफी मागितली. बक्षी यांनी आपल्या मानपानाला दुय्यम दर्जा देत ब्रँच मॅनेजरबरोबर संवाद साधणे पसंत केले.

लोणावळा ब्रँचचा बिझनेस काहीसा कमी होता.
#म #मराठी

मात्र बक्षी यांच्या या काही वेळाच्या भेटीने आणि पेप टॉकने अशी काही जादू केली की ब्रॅंचने त्यानंतर बिझनेसचे आपले सगळे जुने रेकॉर्डस मोडीत काढले.

बक्षी यांनी २०१८ मध्ये आयसीआयसीआय बँकेचे सीईओ म्हणून सूत्रे हातात घेतली.
#म #मराठी

तेव्हापासून बँकेने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. जे लोक शेअर बाजारात सक्रिय आहेत त्यांना आयसीआयसीआय बँके शेअरच्या किमतीवरून याचा अंदाज आला असेलच.

थोडी आकडेवारी पाहूयात. बक्षी यांच्या कार्यकाळात आयसीआयसीआय बँकेचा बिझनेस पर एम्प्लॉयी २०१८ मधील ०.५८ कोटीवरून
#म #मराठी

२०२२ मध्ये १६.६९ कोटींवर पोहोचला आहे. प्रॉफिट आफ्टर टॅक्स पर एम्प्लॉयी ०.०८ कोटीवरून ०.२२ कोटींवर गेला आहे. बँकेचा ROE २०१९ मधील ३.३४% वरून २०२२ मध्ये १४.९७% वर गेला आहे. NPA २०१८ मध्ये ४.७७%, २०१९ मध्ये २.०८% तर आता २०२२ मध्ये ०.७६% पर्यंत खाली आले आहेत.
#म #मराठी

बक्षी २००९ पासून आयसीआयसीआय ग्रुपमध्ये काम करत आहेत. त्यांनी आयसीआयसीआय प्रुडेंशियल लाईफचे प्रमुख म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआयने उत्तम कामगिरी तर केलीच आहे
#म #मराठी

पण लोणावळा ब्रँचच्या उदाहरणावरून त्यांच्या नेतृत्वाची स्टाईल कशी वेगळी आहे हे दिसून येते.

संदर्भ - फॉर्च्युन इंडिया

थ्रेड आवडला असल्यास रिट्विट नक्की करा.

#म #मराठी #icici

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling