कार्तिक | Kartik Profile picture
Entrepreneur by Profession | Freelance Content Creator | सामान्य म्हणून जन्मलेला, पण असामान्य ध्येय बाळगणारा, नावाचं BRAND करु इच्छिणारा एक मराठी मुलगा. 💝

Nov 16, 2022, 10 tweets

न संपणारी साखळी 😢

घटना १२ वर्षांपूर्वीची आहे. १७ ऑक्टोबर २०१० रोजी एका विवाहित स्त्रीचे तिच्याच नवऱ्याने ७२ तुकडे केले. स्थळ आहे डेहराडूनमधील. पत्नीच्या शरीराचा रोज एक तुकडा तो जंगलात जाऊन टाकत होता. आपल्या मुलांना आई कामानिमित्त दिल्लीत गेल्याची थाप त्याने मारली

#म #मराठी

पण अखेरीस गुन्हेगारी काळोखावर सत्याचा प्रकाश पडलाच. १ सप्टेंबर २०१७ मध्ये न्यायालयाने गुन्हेगाराला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. गूगलवर 'अनुपमा गुलाटी हत्याकांड' शोधलं म्हणजे याची संपूर्ण माहिती मिळून जाईल.

आज हे का सांगतोय? कारण

२/१०

आपल्याकडे श्रद्धा हत्याकांड घडल्यावर त्यास जो काही धार्मिक रंग देण्याचा कयास केला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे. शिवाय #टिकलीचा रंगारंग कार्यक्रम देखील निव्वळ ढोंगीपणा आहे. त्यासह #JusticeForShraddha याने काही दिवसांचा मीडिया कंटेंट मिळतो बस. समाज बदलत नाही.

३/१०

अशाने बदलणार देखील नाही. तिन्ही मुद्दे सविस्तर लिहितो बघा पचवता येतात का!

'प्रेम - प्रेमभंग - वाद - घृणा - विध्वंस' या साखळीत कुठेही 'धर्म' नसतो. त्यास घुसवले जाते आणि तुमच्या आमच्यासारखे तरुण त्यास बळी जातात. एक लक्षात घ्या समाजात अशा विकृत घटना घडतात.

४/१०

त्याने माणुसकीला काळिमा फसला जातो त्यास जबाबदार किंवा पार्श्वभूमी धार्मिक नसते. जर ती असेल तर सर्व धर्मात या घटना घडल्या नसत्या. त्या तशा घडतात कारण समाज म्हणून कोणत्या वातावरणात आपण वाढतो, आपल्यावर होणारे संस्कार कसे आहेत, आपल्याला लाभलेली सांगत कशी आहे,

५/१०

आणि सर्वात महत्वाचं आपल्यासमोर असणारे आदर्श कोण यावर आपली वैचारिक जडणघडण होत असते.

'#टिकली' खरंतर यावर बोलून माझे शब्द आणि आपला वेळ वायाच जाणार. त्यामुळे थोडक्यात सांगेन टिकली हा प्रकार फक्त लक्ष वेधून घेण्यासाठी निर्माण केलेला आहे, त्याहून अधिक काहीही नाही.

६/१०

ज्याने ते वक्तव्य केलं तो पाखंडी आहेच, पण त्यास उत्तर म्हणून ज्या ज्या पत्रकारांनी आपले विना टिकली फोटो टाकले तेही वैचारिक पातळीवर किती खुजे आहेत हे पाहायला मिळालं. त्यामुळे आता घडलेलं श्रद्धा हत्याकांड असेल, वा तेव्हा घडलेलं अनुपमा हत्याकांड

७/१०

यांत टिकलीने तिळमात्र फरक पडणार नव्हता.

तिसरा आणि शेवटचा मुद्दा #Justice चा. असले हॅशटॅग आणि दिवे लावून न्यायव्यवस्थेचे डोळे उघडले असते तर देशात २०२१ या एका वर्षात ३१,६६७ महिलांवर बलात्कार (नोंदणीकृत) झाला नसता. बिल्किस बानो प्रकरणात गुन्हेगारांना शिक्षा माफ मिळाली नसती.

८/१०

अनुपमाला न्याय मिळण्यासाठी ७ वर्ष लागले नसते. दिवे लावा, हॅशटॅग चालावा मला याबद्दल तिटकारा नाही. पण समस्येचं मूळ आपण जाणून घेणार आहोत का? समस्या सोडवण्यासाठी त्याच्या मुळाशी कधी जाणार? की आजही मुंबईच्या गर्दीला ठोस उपाय देण्याऐवजी मेट्रोचा पर्याय देणार?

९/१०

आता तुम्हीच विचार करा आणि काय ते ठरवा. अन्यथा पुन्हा एक श्रद्धा आहेच. पुढे ही साखळी सुरू राहणार...

१०/१०

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling