Entrepreneur by Profession | Freelance Content Creator |
सामान्य म्हणून जन्मलेला, पण असामान्य ध्येय बाळगणारा, नावाचं BRAND करु इच्छिणारा एक मराठी मुलगा. 💝
Nov 16, 2022 • 10 tweets • 5 min read
न संपणारी साखळी 😢
घटना १२ वर्षांपूर्वीची आहे. १७ ऑक्टोबर २०१० रोजी एका विवाहित स्त्रीचे तिच्याच नवऱ्याने ७२ तुकडे केले. स्थळ आहे डेहराडूनमधील. पत्नीच्या शरीराचा रोज एक तुकडा तो जंगलात जाऊन टाकत होता. आपल्या मुलांना आई कामानिमित्त दिल्लीत गेल्याची थाप त्याने मारली
#म#मराठी
१
पण अखेरीस गुन्हेगारी काळोखावर सत्याचा प्रकाश पडलाच. १ सप्टेंबर २०१७ मध्ये न्यायालयाने गुन्हेगाराला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली. गूगलवर 'अनुपमा गुलाटी हत्याकांड' शोधलं म्हणजे याची संपूर्ण माहिती मिळून जाईल.
आज हे का सांगतोय? कारण
२/१०
Nov 6, 2022 • 10 tweets • 4 min read
आम्ही होतो थोर, इतिहासाच्या पानी 🥺
२९ नोव्हेंबर १६०७ रोजी रॉबर्ट आणि कॅथरीन यांच्या घरात चौथ्यांदा पाळणा हलतो आणि जन्म होतो जॉनचा. त्याची जन्मभूमी ही इंग्लंड मधली. १६२५ पर्यंत तो त्याच देशात वाढतो, शिक्षण घेतो. १६२५ मध्ये इंग्लंड मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीने त्याचे
#म
१/१०
सारे कुटुंब उध्वस्त होते. घरातील एक एक मंडळी प्लेगला बळी पडू लागतात. त्यामुळे जॉनला त्याची आई इंग्लंड सोडण्याचा आग्रह करते. इच्छा नसताना जॉन इंग्लंड सोडतो आणि अमेरिका गाठतो. जॉनला वाचनाची आवड असते. शिक्षणाचे महत्त्व त्याला ठाऊक असते.
हा फोटो आहे १ मे २००११चा. काहींना याची पार्श्वभूमी माहीत असेल काहीं नसेल. यात देशाचे अध्यक्ष असा क्षण बघताहेत जो जगाच्या दृष्टीने महत्वाचा आहे... पुढे याविषयी येईल.
#म#मराठी#धागा
'कुठेही जायचं असेल तर फोटोग्राफर हवाच', हा आपल्या पंतप्रधानांचा अट्टाहास आता देशाच्या समोर आहे. म्हणजे भक्तांच्या टोळीने कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी पंतप्रधान फोटोग्राफीसाठी आतुर असतात हे काही ते नाकारू शकणार नाहीत.
२/७
Sep 19, 2021 • 14 tweets • 5 min read
बाटलीतील पर्यावरण 🌎🕯️📌📌📌
पाणी हे कायम पवित्रच असते. त्याचे पावित्र्य नाकारांऱ्यांनी आपल्या बुद्धीला लागलेला गंज आधी काढायला हवा. आज 'बाटलीतील पाणी' (बिस्लरी) आणि 'नळाचे पाणी' या दोहोंची शुद्धता आपण वैज्ञानिक निकषावर घासून पाहणार आहोत.
१/१४
मागील धाग्यात पाण्याचे 'शिळेपण' आणि त्याचे 'खराब होणे' दोन्हीबद्दल लिहिलं आहेच. त्यामुळे पाणी नळाद्वारे येणारं असो, वा आपण विकत घेतलेल्या बाटलीतील असो दोन्ही पाणी ताजचं असतं. पण दोन्ही बाबी आपल्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर वेगवेगळा परिणाम करतात.
मागील काही दशकांपासून आपल्या अंगी एक सवय जडली आहे. 'जुगाड'! कोणत्याही परिस्थितीत याचा वापर केला जातो. यामुळे आपल्याला कामाचा 'दर्जा' काय असावा हेच कळत नाही. पर्यायी दर्जेदार कामे करण्याकडे दुर्लक्ष होते. हेच आज देशातील रस्त्यांच्या बाबती घडतंय. १/७
भारतीय खड्यांनी आपल्याला दिलेला सतर्कतेचा इशारा आपण काही दिवसांपूर्वी माझ्या थ्रेड मध्ये वाचला असेल. आज या खड्यांची खरडपट्टी काढुया.
खड्यांचा प्रश्न जगातील अनेक देशांत आहे. निकृष्ट रस्ते हा काही एकट्या भारताचा प्रश्न नाही. पण २/७
Jul 5, 2020 • 10 tweets • 3 min read
तुरुंगातील माणुसकी 🤗🚩
देशातील करोना मुळे मंदावलेला गुन्हेगारीचा आकडा पुन्हा पूर्वपदावर येतो आहे. भारतातील हा आकडा मंदावण्याचे एकमेव कारण म्हणजे देशाची टाळेबंदी हे होते. पण जगात असे अनेक देश आहेत जिथे गुन्हेगारांची संख्याच कमी होतेय. १/१०
गुन्हेगारांची संख्या कमी होण्यामागे तिथे गुन्हेगारास केले जाणारे कठोर शासन हे कारण नव्हते. उलट तुरुंगात यांना मिळणारी वागणूक सर्वसामान्य नागरीकांनाप्रमाणेच होती. मग तरीही तिथे गुन्हेगारी मानसिकता कमी होण्याची कारण काय असावे?
माणुसकी जपणाऱ्या अशाच काही तुरुंगाच्या यादीतील २/१०
Jul 4, 2020 • 9 tweets • 3 min read
गरिबीचा उत्सव 😢😢
एखादी गोष्ट सरकारने फुकट किंवा कमी पैशात उपलब्ध करून द्यावी हीच आपली मानसिकता झालीये. या मानसिकतेला अनेक कारणे जबाबदार आहेत. मुळात सरकारचे काम जनतेचे पोट भरणे आहे का? की जनतेला स्वतःचे पोट भरण्यास सक्षम बनवणे हे सरकारचे काम आहे? १/८
सध्या मुंबईत कार्यरत असणारी घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रोच्या मार्गाची लांबी आहे अवघी ११.४ किमी. त्यासाठी ₹४०/प्रति व्यक्ती एवढा कमाल दर आकाराला जातो. तरीदेखील यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली. तर दुसरीकडे मुंबई लोकल एवढ्याच अंतराच्या प्रवासासाठी ₹५ घेते. २/८
Jul 3, 2020 • 12 tweets • 2 min read
मागणी चुकतेय!
आज देशातील रेशनिंग पद्धतीवर थोडं परखड बोलणार आहे. माझे काही प्रश्न देखील आहेत. त्यामुळे थ्रेडवर व्यक्त होण्याआधी त्यांची उत्तरे जरूर शोधावी.
आजवर आपण अनेक मागण्या केल्यात. आरक्षणापासून ते संरक्षणापर्यंत केलेल्या मागण्यांची यादी काढली तर ती फारच लांबलचक होईल. १/१२
त्यातील किती पूर्ण झाल्या किती अपूर्ण राहिल्या तो मुद्दा सध्या बाजूला ठेवू. पण बऱ्याचदा आपण चुकीची मागणी करत राहिलो हे आपल्याला मान्य करावेच लागेल. याच चुकीच्या मागणीच्या शेगडीवर अनेक राजकारणी आपल्या राजकीय पोळ्या अविरत शेकत राहिले. २/१२
Jun 29, 2020 • 9 tweets • 3 min read
हीच ती वेळ!!
जनतेसाठी सत्तेत आलो म्हणणाऱ्यांना आज जनतेच्या व्यथा जाणून घ्याव्याशा वाटत नाहीत. आपल्या अल्पशिक्षित बुद्दीचा वापर करून अधिकार नसताना निर्णय घेतले जातात. यामागे यांना भविष्यातील वोट बँक दिसते. मग वीज ग्राहकांत ती का दिसत नाही?
आपले हितसंबंध जपून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा जो काही प्रकार @NitinRaut_INC यांनी चालवला आहे त्याला जाब कोण विचारणार? केंद्राने पैसे दिले नाही, अधिकार दिले नाही म्हणून कोकलत फिरणारे महाविकास आघाडीचे समर्थक आज मूग गिळून गप्प?
Jun 26, 2020 • 7 tweets • 2 min read
इतिहास पुरे, भविष्य रंगवा
माणूस म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळी बाजू असतेच. काहींची छोटी काहींची मोठी. पण स्वातंत्राच्या रणसंग्रामात योगदान देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान करायला नको का? देशात पक्षीय राजकारण पूर्वापार चालत आलेले आहे. १/७
यामुळेच आपण पारतंत्र्यात गेलो हे आपण विसरलो. पण स्वातंत्र्यानंतरही आपल्याला जाग येऊ नये, हे खरं दुर्दैव!!!
'शत्रूच्या मृत्यूबरोबर शत्रूत्वही संपते' हीच आमच्या राजांची शिकवण होती. मग आपल्याला याचा आज विसर कसा पडला? 'बर्लिन'ची भिंत पडते. जगाने ज्यांना विभागलं ते पुन्हा एकत्र २/७
Jun 8, 2020 • 6 tweets • 2 min read
तो म्हणे 'मी मोठा'
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या अमेरिकेने, चीन याही क्षेत्रात पुढे येईल याची कल्पना केली नसावी किंवा ही बाब गांभीर्याने घेतली नसावी. संशोधन आणि विकास (R&D) या क्षेत्रात चीन मागील दोन दशके भरमसाठ पैसा ओततो आहे. जिथे अमेरिका या १/६
क्षेत्रातील खर्चात ४% वाढ करतोय तर दुसरीकडे चीनची गुंतवणूक तब्बल १८%ने वाढत जाणारी आहे.
त्यात 5G सारखे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्यांच्या यादीत व्हूवेईचे देखील नाव आहे. आता करोना जगभर थैमान घालतोय तरी व्हूवेईच्या महसुलात यावर्षाच्या पहिल्या तिमाहीत जवळपास १.४% ($२५.७ बिलियन) २/६
Jun 3, 2020 • 6 tweets • 2 min read
जेसिंडा यांचे 'जाणतेपण'
करोनावर विजय मिळणाऱ्या काही मोजक्या देशाच्या यादीतील एक नाव म्हणजे न्यूझीलंड आणि त्यांच्या पंतप्रधान 'जेसिंडा आर्डेन'. आतापर्यंत तिथे १५०४ जणांना करोनाची बाधा झाली. पण यातून ठणठणीत बरे होणाऱ्यांची संख्या आहे ११३१. ज्यावेळी आपले नेतृत्व करोना विरुद्ध १/६
लढण्याच्या, त्याला हरवण्याच्या बात मारत होते त्यावेळी आर्डेन उपाययोजना राबवल्या व्यस्त होत्या.
जगातील तरुण नेतृत्वाच्या यादीतील वरचे नाव म्हणजे ४१ वर्षीय 'जेसिंडा आर्डेन'. देशाच्या १५० वर्षच्या इतिहासातील सर्वधिक तरुण पंतप्रधान म्हणून आज त्या ओळखल्या जातात. २/६
May 31, 2020 • 7 tweets • 2 min read
पत्रास कारण की...
मा. @narendramodi आपणास दुसऱ्यांदा सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. याबद्दल आपले अभिनंदन. पण यासाठी स्वतःच स्वतःचे कौतुक करून घेण्यात कोण हशील आहे? करोनाने गरिबांचे जिने मुश्कील केलेले असताना लोकप्रियतेचा मोह आपण आवरता घ्यायला नको होता का? १/७
बरं ज्याच्यासाठी स्वतःची पाठ थोपटून घेताय त्यासाठी आपण पात्र आहात का?
आपण देशातील 'इनोव्हेटि आयडिया'चे प्रणेते आहात. म्हणून यावेळी 'मन की बात' न घेता आपण थेट पत्र लिहिलं असावं. पण खरं सांगू त्या १६२० शब्दांच्या पत्रात मला वाचनीय मजकुरच सापडेना. २/७
May 30, 2020 • 6 tweets • 2 min read
प्रत्येकवेळी 'महाराज'च का?
आजचा थ्रेड कोणतीही माहिती देण्यासाठी नसून, एका विनंतीसाठी आहे. मागील जवळपास पंधरा दिवस वेगवेगळ्या विषयांवर मी थ्रेड लिहितो आहे. अनेक वादग्रस्त ठरले (चुकीचे नाही). काहींना पटले नाही, काहींनी उचलून धरले. मात्र आज विनंती करण्याचा विषय थोडा वेगळा आहे. १/६
◆ त्याआधी थोडंस माझ्या थ्रेड बद्दल...
लोकप्रियता मिळवणे, फॉलोअर्सवर वाढवणे यासाठी मी जर थ्रेड मांडत असतो तर त्यासाठी अभ्यास करून थ्रेड मांडण्याची मला आवश्यकता नव्हती. अर्थात मी फार ज्ञानी आहे अशातला भाग नाही. तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे. फक्त बातम्या वाचल्या की सोडून न देता २/६
May 29, 2020 • 7 tweets • 2 min read
◆ आलेख (अ)पात्रतेचा!
काही दिवसांपूर्वी नेपाळ सीमावाद उफाळून आला. याला चीनची फूस होती हे वेगळं सांगायला नको. आता खुद्द चीन या वादात उतरला आहे. यात अमेरिकेने मध्यस्ती करण्याची तयारी दाखवली हे विशेष. यानिमित्त आज दोन मुद्दे मी मांडणार आहे. १/७
१) युद्ध सज्जता
आता आपल्याकडील काही मंडळी 'देशाची युद्ध सक्षमता' देशवासियांना दाखवत आहेत. पण तसं अजिबात नाहीये. किंबहुना रणभूमीत आपली संरक्षण यंत्रणा चीनचे काहीही वाकडे करू शकत नाही. तुलना करायची झाल्यास भारतीय सैनिकांच्या जवळपास दुप्पट सैन्य चीनकडे आहे. भारतात लढाऊ २/७
May 27, 2020 • 7 tweets • 2 min read
योगी मुकुट उतरवतील का?😑
भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य उत्तर प्रदेश आहे. हे राज्य देशात अनेक कारणांसाठी ओळखले जाते. त्यातील प्रमुख आहे 'स्थलांतरित मजूर'. करोना निमित्ताने जवळपास ३.२५ लाख मजुर देशभरातून उत्तरप्रदेशात परतले. असो, आजचा विषय हा नाही. १/७
राज्याचे मुख्यमंत्री @myogiadityanath यांचा अहंकार पुन्हा बळावला आहे. वेळोवेळी त्यांचे गर्वहरण होऊनही विवेकाने मुद्दे हाताळणे यांनी नापसंत केले. 'इतर राज्यांना उत्तर प्रदेशातील मजूर हवे असल्यास राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल' हे वक्तव्य करताना २३ कोटी मधील किती नागरिक २/७
May 26, 2020 • 7 tweets • 2 min read
पास तरीही नापास
'मला मातृभाषेत शिक्षण घ्यायचं नाही' असं पहिल्या दिवशी शाळेत जाणारा विद्यार्थी बोलूच शकत नाही. पण इंग्रजीची अगतिकता इतकी असते की यश म्हणजेच इंग्रजी हे आपण ठरवून टाकतो. मग इथूनच जगावर अधिराज्य गाजवण्याची क्षमता असणारा विद्यार्थी 'जगाचा नोकर' होऊन जातो. १/७
भाषेचा न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून, पाल्याच्या स्वाभिमानाचा नाश आपण करतोय याची जाणीवच अनेकांना नसते. आधुनिकतेच्या नावाखाली मागासलेपण जपणारी ही मंडळी आयुष्यभर श्रीमंतीची वाट पहात राहतात.
घोड्यावर गाढवाप्रमाणे माल लादण्याचा प्रयत्न जेव्हा पालक करतात, तेव्हा पाल्य २/७
May 25, 2020 • 6 tweets • 2 min read
'राज'कारण
जिथे विरोधी पक्ष राजकारण करण्यात गुंग होते, तिथे राज ठाकरे प्रशासनाला सूचना देण्यात गर्क आहेत. 'महाराष्ट्र बचाओ'सारखे खोटे प्रकार मांडून सरकारचा भोंगळपणा मांडण्यापेक्षा यांनी सरकारला उपाययोजना सांगून खऱ्याअर्थाने महाराष्ट्र वाचवण्याचा मार्ग स्वीकारणे योग्य समजले. १/६
'मदतीचे फोटो, व्हिडीओ कॅमेराबद्ध करून मदत घेणाऱ्याला आपण लाजवत नाही का? असं करून एखाद्याला शरमेने मान खाली घालायला लावणे कितपत योग्य?' असा सवाल करून 'मदतीचे मार्केटिंग' न करण्याचे अवाहन करणारी ही खरी माणुसकी. आजवर अनेक वेळा यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले गेले. लॉकडाऊन हा काही२/६
May 15, 2020 • 5 tweets • 2 min read
दिशाहीन दशा
जगातील तब्बल २५% अभियंते भारत एकटा घडवतो. मात्र अजूनही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपण आघाडीवर नाही. यातील ९४% इंजिनिअर कोणत्याही कौशल्याविना बाजरात उतरतात. ज्यांच्याकडे कौशल्य असते ते निर्यात केले जातात. मग परदेशातून वस्तूंची आयात ही करावीच लागणार ना! १/५
भारतातील पहिल्या दहा मोबाईल कंपन्यामध्ये एकही भारतीय कंपनी नाही. देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या १० पैकी ७ गाड्या मारुती सुझुकीच्या आहेत. यात टाटा आणि महिंद्रा कंपनीचा क्रमांक अनुक्रमे १८ आणि २३वा आहे. कृषिप्रधान देश कृषी क्षेत्रावर देखील वर्चस्व गाजवू शकलेला नाही. २/५