Ajay Profile picture
उद्देश - मराठी घरात गुंतवणूक रुजावी ह्यासाठी प्रयत्न करणे..🔥 स्वप्न - मराठी माणूस म्हणजे 'गुंतवणूकदार' अशी ओळख जगभर झालेली बघणे..✌️🔥

Jan 31, 2023, 8 tweets

गोष्ट तारण ठेवलेल्या शेअर्सची
(Loan Against Securites/शेअर्स)

#अडाणी ग्रुप

कोणतीही बँक शेअर्स तारण म्हणून घेताना त्या शेअर्सच्या किंमतीच्या ६०-८०% रक्कम कर्ज म्हणून देते.

जर त्या शेअर्सची किंमत वाढली तर जास्तीचे कर्ज घेता येते..पण जर का किंमत खाली आली तर..२ गोष्टी होतात -

#म

१. एकतर बँक त्या व्यक्तीला/कंपनीला त्यांचे कर्ज safe राहावे म्हणून जास्तीचे (~ फरकायेवढे) पैसे मागते..ह्याला म्हणतात margin. किंवा

२. ते 👆 पैसे मिळणार नसतील तर एका मर्यादेनंतर त्यांच्या कडील शेअर्स विकायला चालू करते..! आणि हे असे शेअर विकायला चालू केले की अजूनच जास्त पडतात -

कारण बँकाकडील शेअर्सच्या पुरवठ्याने, खूप जास्त शेअर्स विकायला आल्याने भाव अजूनच पडतात

आणि

परत पर्यायाने बँकांना शेअर्स विकावे लागतात..हे दुष्टचक्र चालूच राहते..

जोपर्यंत बँकाकाकडील शेअर्स संपत नाही तोपर्यंत..!!🤯

Btw..हे असे मागे अशातच #yesbank च्याबाबतीत घडलेले आहे..!

आता आपण अडाणी कडे येऊ.. 👇

पहिले चित्र आहे -

अडाणीचे किती % शेअर्स बँकाकडे तारण आहेत..! (Sept २०२२ data)

(विशेष गोष्ट पाहिली का -अडाणीने
~ ५०,००० कोटीला Acc-अंबुजा सिमेंट कंपनी कर्जाने विकत घेतली व त्या कर्जासाठी त्याच कंपनीचे सगळेच्या सगळे १००% शेअर्स तारण ठेवले..🤯)

आता दुसरे चित्र बघा -

ह्यात अडाणीचे शेअर्स all time high पासून ~ किती % खाली आले आहेत ते दिलेले आहे.

आता यापुढे शेअरची किंमत अजून खाली तर काय होऊ शकते हे मी सांगणार नाही..ते तुम्हाला याआधीच सांगितले आहे..!

तरी एक गोष्ट सांगतो 👇

अडाणीकडे सध्या भारतातील सर्वात Cream assets आहेत..त्याला ह्या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी फक्त त्याचा चालू असलेला FPO म्हणजे दुसरा IPO यशस्वी होणे गरजेचे आहे..म्हणजे त्याला पाहिजे असलेले ' Margin ' भेटेल..! कर्ज थोडे कमी होईल आणि भावाला जरा हायसे वाटेल..😅

बाकी तो FPO यशस्वी होईल न होईल पण ज्यांना अडाणी चे शेअर्स घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी ही तशी बरी संधी आहे असे दिसते.

आणि मी काय करतोय हे विचाराल तर - मार्केटमध्ये इतर पण ४-५ हजार शेअर्स आहेत..ह्याच शेअर्स मध्ये काय धन गाडून ठेवलंय ह्या मताचा मी आहे..😉😅🙏

टीप - ह्या अडाणी saga मुळे शेअर मार्केटच्या बऱ्याच किचकट गोष्टीत आपल्या लोकांचा इंटरेस्ट वाढल्याने Loan against Securites, Margin ,FPO इ गोष्टी समजावणे सोपे झाले आहे..हा वरील thread त्याचाच एक प्रयत्न आहे..🙏

#StockMarketअभ्यास

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling