Karan Jadhav 🕊️ Profile picture
Official Twitter Account Handle || Mechanical Engineer | Social Worker | Books lover | Bosch NaP | KKWIEER, Nashik | Failure KING | Tweets are personal...

Mar 14, 2023, 19 tweets

चला! तर मी तुम्हाला आमची आजची एकदिवसीय #मुंबई_ट्रीप थोडस brief मध्ये सांगतो.
आज आमच्या सोबत खूप अश्या गोष्टी घडल्या जे आम्ही कधीच जीवनात विसणार नाही आणि हो खूपच interesting घटना घडल्या.

थोडा #thread मोठा होईल पण खूपच interesting आहे. नक्कीच वाचा आणि enjoy करा.

@ACREX2021

१/n

आज सकाळी मी ५ वाजता उठून मस्त फ्रेश झालो आणि ६:१९ am ला #नाशिकरोड रेल्वे स्टेशनला निघालो. स्टेशनला #motorcycle park करून platform वर गेलो. सगळे मित्र मंडळी एकत्र झालो (अथर्व, मानस, गार्गी आणि आमचा पायलट). सर पण आले. मग ७:०५ am ला #पंचवटी एक्स्प्रेस मध्ये D4 डब्यात बसलो.

२/१९

Reservation केल्यामुळे सगळे स्वत:च्या हक्काच्या seat वरती बसलो. मग #इगतपुरी येथे वडापाव, मेंदुवडा खाल्ले आणि नंतर मस्त मौज मस्ती करत करत #दादर स्टेशनला १०:३३am ला पोहचलो. त्यानंतर #Western_Lines च्या #local मध्ये बसून #राम_मंदिर स्टेशनला उतरलो.

३/१९ twitter.com/i/web/status/1…

मग तिथून सगळेच group (११ जण) पायीवाट करत Bombay Exhibition Centre (#BEC) ला #ACRES 2023 बगण्यासाठी त्याठिकाणी बरोबर ११:४६ am पोहचलो. मग काय मस्त सगळे मित्र मंडळी #exhibition बघायला सुरुवात केली. #ISHRAE Nashik Chapter चे Chairperson ची भेट झाली.

४/१९

मग आम्ही मित्र Acrex च enjoy घेतलं. या exhibition मध्ये HVAC realated सगळे world wide मध्ये famous असलेले top companies स्वतच्या HVAC related components दाखविण्यासाठी आले होते.

सगळेच manufacturing/supplier companies खूपच छान प्रकारे मार्गदर्शन करत होते. मला खूप छान वाटल.

५/१९ twitter.com/i/web/status/1…

त्यात आम्ही #stunts पण खूप दिल्या. त्यात वेड्यासारखे सगळ्याच companies चे #brochures जमा करायचं, #chocolates खायचं, #softdrink पिहायचं, #dairies आणि #pen गोळा करायचं... खुपचं मज्जा आली. हे सगळे वेडेचाळे झाल्यावर ४pm ला #exhibition च्या बाहेर पडलो.

६/१९ twitter.com/i/web/status/1…

आणि परत २ km पायीवाट केलं. त्यामध्येच एका #टपरी जवळ थांबून #वडापाव #चहा घेतलं.
आता आम्ही #राम मंदिर स्टेशनला आलो व लगेचच दादर जायला local पळत पळत confuse होऊन धरलो... त्यात local ने speed धरलं आणि अथर्व अजून बाहेरच होता. त्यात local ने speed धरलं आणि अथर्व अजून बाहेरच होता.

७/१९

त्याच्या पाठीमागे गोळ्या केलेल्या unwanted brochures च खूपच वजन असल्यामुळे त्याला नीट पळता येत नव्हतं. त्यात त्याच हात गार्गिने धरलेलं होत. Train speed घेत होती. मला situation कळताच, अथर्वला #local सोडायला ओरडलो. सगळेच मग "हात सोड; दुसऱ्या local ने ये!!" म्हणून ओरडू लागलो.

८/१९

त्याने हात सोडलं. आम्ही मग पुढच्या स्टेशनला उतरलो. अथर्व next #local ने आला. त्यात पण एक अजून stunt झालं. आम्ही सगळे दुसऱ्या local मध्ये बसून झाल्यावर अथर्व पुन्हा next डब्यातून आमच्या डब्ब्यात येताना अजून #local ने speed घेतल. बर झाल यावेळी त्याने पटकन डब्ब्यात बसून घेतलं.
९/१९

"बाल-बाल बच गया!!!" चलो ! ये भी ठीक है!

आता #दादर स्टेशनला ५:०५pm ला पोहचलो. आम्ही निवांत online #पंचवटी एक्स्प्रेस ची वेळ बघून platform ५ वर गेलो. तिथे जाऊन आम्ही थोडीफार मस्ती केली. नंतर अथर्व, मानस व मी थोड soft drink घ्यायला गेलो. आम्ही सगळे ६:१२pm पर्यंत pf५ वर

१०/१९

train ची वाट बघत होतो. Online बघितलं तर #दादर स्टेशनला train आलेली होती. पण आमच्या समोर काही आली नव्हती.. मग इकडे तिकडे विचारून बघितलं तर.... कळाल की train already platform 5 वरती आलेली आहे. पण... ते platform centre line च आहे नाही की Western Lines च्या platform ५ वरती...

११/१९

मग काय ??? सगळेच पळालो... खुपचं आरडाओड करत पळालो.. सर आणि सगळी gang!!! #Lift ने वरती पोहचल्या पोहचल्या गार्गी आश्चर्य व घाबरून सांगतेय की " माझा मोबाईल.. माझा मोबाईल.... माझा मोबाईल नाहीये. गायब झाला! बसलो होतो तिथेच राहिलाय असं वाटतय." मग त्यात ती आणि मानस त्याच #lift ने

१२/१९

return गेले. मी तिच्या मोबाईल वरती call लावत होतो. 1st time लागलं व नंतर तर लागेनाच !!! त्यात आमची #पंचवटी एक्स्प्रेस missed झाली. आता काय? Reservation तर केलेलं होत. पण त्याचा काय उपयोग.. मग सगळे नीट शांत झालो आणि शिवाजी काळे सर, अथर्व व मानस परत #तिकीट काढायला

१३/१९

ticket_house ला गेले. त्यांनी आता #general च तिकीट काढून आणलं. मग आम्ही सगळे central line च्या platform 5 वरती गेलो.

आता अजून एक stunt बघा ना! गार्गीच काही मोबाईल हरवलेला नव्हता. तिचा मोबाईल तिच्याच bag मध्ये होत.🤫🫣😂 अवघड आहे भो!!!

१४/१९

आता #विदर्भ एक्स्प्रेस ७:२०pm होती. त्याची वाट झालेल्या गोष्टीवर गप्पा मारत पाहत होतो. ती आता ७:३३pm ला #दादर स्टेशनला आली. General डब्ब्यात एवढी गर्दी होती की सांगायचं कामच नाही. काळे सर 'नका बसू.. नका बसू... म्हणून order करत होते. पण आम्ही काय त्यांचे ऐकणार आहोत का...

१५/१९

त्यात #मानस तर अवघडच ! तो तर direct train मध्ये चढायला करायचा. शेवटी आम्ही दोघी direct general डब्ब्यात घुसूनच गेलो.. जोर-जोरात धक्का देत मागील १० लोकांसाठी जागा करत होतो. मी toilet च्या कोपऱ्यातच गेलो. तिथेच #स्लीपरचा डब्बा जोडलेलं होत. मी तो दरवाजा उघडल व सगळ्यांना

१६/१९

#Sleeper डब्ब्यात बळजबरीने आणलं. मग काय! पटापट जागा केली. सगळ्या bags एका ठिकाणी ठेवून मी top ला जाऊन बसलो. मग दीड घंट्या नंतर #कल्याण जंक्शन आलं. थोडी ट्रेन रिकामी झाली. मग आम्हा सगळ्यांना बसायला जागा मिळाली. बसायलाच नव्हे तर झोपायला जागा मिळाली.😅

१७/१९

त्यात मी एक stunt केलेलं squad ला सांगितलं. सगळेच शॉक 😲 झाले. काळे सर सुद्धा.... तो stunt असा की, मी ISHRAE ची thermos bottle त्यांच्या exhibition च्या shop मधून आणल होत.🙈😅
#tweet लिहितोय आणि तुम्ही हे ट्विट ईथ पर्यंत वाचलात म्हणजे तुम्ही पण खूपच दिग्गज लोक आहात.

१८/१९

Ok all well! पण खरं सांगू का! आम्हाला आता पण TC ची भीती वाटेय.... ही आमची एकदिवसीय मुबईची ट्रीप खूपच मजेदार, आठवणीमय, विनोदी आणि माहितीमय होती.

तुम्हाला कशी वाटली नक्कीच reply देऊन सांगा.

१९/n

#Mumbai #Local #BombayExhibitionCentre
#dadar #train
@ishraehq @ACREX2021 @Mumbai

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling