🔥वसुसेन🔥 Profile picture
विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं. #वसुसेन #threadकर #study_iq fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉 https://t.co/0PWzn4WAaU

Mar 16, 2023, 16 tweets

'ठिणगीच रूपांतर वणव्यात व्हायला वेळ लागत नाही' 🔥😄
अमेरिकेत बॅंकिंग सेक्टर बर्याच तणावात आल असताना आता युरोपची 'Credit suisse' बॅंक संकटात सापडली आहे!
थ्रेडमध्ये आपण Credit suisse
१)स्थापना
२)कोसळण्याची कारणे
३)Bank run ची भिती
४)रघुराम राजन यांचे मत पाहु
#वसुसेन #CreditSuisse

युरोपमधील 'Credit suisse' बॅंक ही Switzerland मध्ये स्थित असुन तेथील दुसर्या क्रमांकाची मोठी बॅंक आहे.बॅंकेची स्थापना १८५६ साली(१६७ वर्ष) झालीय.Credit Suisse चे मुख्यालय झ्युरीच, स्वित्झर्लंड मध्ये आहे. युरोपसहित अमेरिका, आशिया खंड इ. सगळीकडे बॅंकचे कार्यक्षेत्र आहे. लहानपणापासुन

आपण सगळे ऐकत आलोय की मोठ्या धनवान लोकांचा ब्लॅक मनी 'स्विस बॅंकेत' असतो तर याचा अर्थ असा आहे की स्विस बँकेत खातेदाराची गोपनीयता मजबुतरित्या पाळली जाते. तिथे खातं असणार्याची माहिती सहजासहजी बाहेर काढु शकत नाहीत. credit Suisse पण विविध फायनान्शियल सर्विसेस देण्यासाठी ओळखली जाते.

आता आपण Credit suisse कोसळण्याचा आढावा घेऊया.
1)गेली वर्षभर ही बॅंक कोसळतच चाललीय. पण जगाच्या पटलावर अचानक चर्चेला का आली तर काल(बुधवारी) जस आपलं बॅंक निफ्टी इंडेक्स आहे ज्यात महत्त्वाच्या बॅंक असतात तसचं युरोपियन बॅंक इंडेक्स आहे ते जवळपास ७% नी कोसळलय 😱
८ मार्चपासून पाहिल तर

युरोपियन बॅंक इंडेक्समधल्या १२८ बिलियन डॉलर्स (१२० बिलियन युरो) रूपयांचा चुराडा झालाय 🤕
या नुकसानीमागे Credit Suisse कोसळणे हे मुख्य कारण असुन कालचा बुधवार 'Black Wednesday' म्हणुन घोषित करण्यात आला आहे. काल या बॅंकच्या शेअर विक्रीत भयानकरित्या वाढ झाली.

आजच्या दिवशी Credit Suisse च्या एका शेअरची किंमत २ युरो पण राहिली नाहीय😅Credit suisse च्या एका शेअरची किंमत मागच्या वर्षी साधारण ७ ते ८ स्विस फ्रँक होती.(१ स्विस फ्रँक म्हणजे साधारण ८८ रू.)
2)आणखी एक कारण असे की Credit Suisse चा CDS (Credit Default Swap) मागील ५ वर्षातील सगळ्यात

जास्त झालाय. जेव्हढा जास्त CDS तेव्हढच बॅंकसाठी ते घातक असत.
इथे CDS बद्दल थोडं जाणुन घेऊया.
मार्केटमध्ये कोणतीही बॅंक बाॅंडच्या स्वरूपात ज्यादा पैसा कमवत असते. बाॅंड विकत घेऊन व्याजाच्या रूपात कमाई करणे हा त्यामागील प्रमुख उद्देश असतो. समजा तुम्ही

१००० रू. बॅंकेत टाकुन त्याचा बाॅंड विकत घेतला आणि उद्या तुम्हाला वाटतय की बॅंक बुडेल तर तुम्ही त्या बाॅंडवर एखाद्या कंपनीचा इंश्युरन्स काढु शकता. जर समजा उद्या ती बॅंक बुडालीच तर तुम्हाला इन्शुरन्स कंपनी तुमचे १००० रू. माघारी देईल. तो जो इंश्युरन्स काढलाय त्याचा प्रिमियम जेव्हढा

जास्त तेव्हढी ती चिंतेची बाब ठरते याचाच अर्थ CDS जेव्हढ वाढत जाईल तेव्हढं ते घातक ठरत जात, आणि इथे आपण एक गोष्ट‌ लक्षात घेतली पाहिजे की Credit Suisse बॅंक काही रात्रीत ढासळली नाहीय तर गेल्या वर्षभरात या बॅंकच्या शेअरमध्ये ७७% नी घट झालीय जी खुप प्रचंड आहे! 🙌
3) नुकतच बॅंकने

२०२२ सालचा वार्षिक अहवाल मांडला त्यात अस निदर्शनास आलं की बॅंकमध्ये बरेच scandals घडलेत, managing body मध्ये कमकुवतपणा एकुणच सिस्टीममध्येच कमजोरी आलीय, बॅंकचा वार्षिक नफा ३४% नी कोसळलाय व ठेवी ठेवण्यापेक्षा ठेवलेल्या ठेवी काढण्याचा वेग गेल्या वर्षभरात प्रचंड वाढत चाललाय!

हे सगळे मुद्दे समोर आल्यावर Credit Suisse मध्ये ठेवी ठेवलेल्या लोकांमध्ये भिती निर्माण झाली त्यात आत्ताच अमेरिकेच्या SVB bank,Signature bank व silvergate bank चे प्रकरण ताजे आहेच!
त्यामुळे 'Credit Suisse'बॅंकच्या शेअर होल्डर्सनी विक्री करण्यास सुरुवात केलीय म्हणुन शेअर आणखी घसरत

चाललाय 😅
4)मागच्या वर्षी Credit Suisse संकटात असताना Saudi National Bank ने Credit Suisse बॅंकचे ९.९% समभाग विकत घेतले होते. ही डिल जवळपास १.४ बिलियन स्विस फ्रँक ला झाली होती. आज एका महिन्यात त्या १.४ बिलियन स्विस फ्रँकमधले ५०० मिलियन स्विस फ्रँकच शिल्लक राहिले आहेत 😅 जेव्हा

Saudi National Bank ला विचारण्यात आलं की तुम्ही आता Credit Suisse बॅंकचे शेअर कोसळले असताना आणखी विकत घ्याल का तर सौदी बॅंकने दोन्ही हात वर केलेत 🙌
आणि ही बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा ठेवीदारांमध्ये आणखी भिती वाढलीय..
5)जेव्हा लोकांमध्ये भिती निर्माण होते तेव्हा लोक आपापले पैसे

काढुन घेण्यासाठी बॅंकच्या दरवाजात जाऊन बसतात. अश्यावेळी बॅंककडे एकगठ्ठा एव्हढे पैसे नसल्याने बॅंका पैसे माघारी देण्यास अपयशी ठरतात आणि याच प्रकाराला 'Bank Run' म्हणतात. ही Bank Run Credit Suisse सोबत घडत आहे.
आता आपण भारतीय अर्थतज्ञ रघुराम राजन यांचे Credit Suisse बद्दलचे मत पाहु

राजन यांच्या म्हणण्यानुसार 'सद्यस्थितीला Credit Suisse कडे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय शिल्लक नाहीय आणि मागील २-४ वर्षात जेव्हढे Scandals उघडकीस आले त्या सगळ्यांमध्ये Credit Suisse च नावं समोर आलय. यामुळे लोकांची बॅंकवरील विश्वासाहर्ता खुप ढासळलीय. जर Credit Suisse ला वाचायचे असेल

तर यांच्यामध्ये गुंतवणूक होणे गरजेच आहे.'
पण आपण थ्रेड नीट वाचला तर Credit Suisse ची अक्षरशः लंका लागलीय त्यामुळे भविष्यात बॅंकची वाटचाल पाहणं खुप रोमांचक ठरेल एव्हढं मात्र नक्की!
#Credit_Suisse #europe
#SVBCollapse #SignatureBank #Switzerland #index #StockMarket

Share this Scrolly Tale with your friends.

A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.

Keep scrolling