तुमचा सोनार तुमच्याकडून सोन्याचे योग्य पैसे घेतोय का?
काल अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनेकांनी सोने खरेदी केली असेलच. जरी केली नसेल तरी भारतीयांचे सोन्याबाबतचे प्रेम पाहता सोने खरेदीला खरे तर मुहूर्ताची गरज नसते. #म #मराठी #gold
मात्र हीच सोने खरेदी करताना किती भारतीय सोन्याच्या किमतीकडे लक्ष देतात? आपण एखाद्या सोनाराकडे वर्षानुवर्षे सोने घेतोय म्हणजे तो आपल्याला फसवणार नाही अशी सगळ्यांचीच धारणा असते. त्याच नादात बरेचदा सोनार सोन्याची किंमत कशी मोजतोय? यावर कोणी फारसे लक्ष देत नाही.#म #मराठी #gold
आज घडीला भारतामध्ये सोन्याच्या बिलींगसाठी कुठलाही स्टॅंडर्ड पॅटर्न नाही. म्हणूनच एका सोनाराकडून दुसऱ्या सोनाराकडे गेल्यास सोन्याची किंमत बदलताना दिसते. प्रत्येक शहराची तालुक्याची एक ज्वेलरी असोसिएशन असते आणि प्रत्येक दिवशी त्यांच्याकडून सोन्याचा दर जाहीर केला जातो. #म #मराठी
त्यामुळे सोन्याचे दर प्रत्येक शहरांमध्ये वेगवेगळे असू शकतात.
आपण घेतलेल्या सोन्याच्या दागिन्याची किंमत साधारणपणे कशी मोजतात? हे आता पाहूया.
#म #मराठी #gold
सोन्याच्या दागिन्यांची किंमत = सोन्याची किंमत (१४ कॅरेट, १८ कॅरेट, २२ कॅरेट) x दागिन्याचे ग्रॅममधील वजन + मेकिंग चार्जेस + ३% जीएसटी. हा जीएसटी दागिन्याची किंमत आणि मेकिंग चार्जेस या दोन्हींवर लागतो.
एक उदाहरण बघुयात.#म #मराठी #gold
समजा २२ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅम साठी ६०,००० रुपये एवढी आहे. तुम्हाला ९ ग्रॅमचा दागिना विकत घ्यायचा आहे.
मग १ ग्रॅम सोन्याची किंमत = ६०,०००/१० = ६००० रुपये
९ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची किंमत = ६००० x ९ = ५४,००० रुपये
#म #मराठी #gold
मेकिंग चार्जेस समजा १०% धरले तर ते होतील ५४,००० x १०% = ५४०० रुपये
दागिन्यांची एकूण किंमत =५४,००० + ५४०० = ५९,४०० रुपये
यावर ३% जीएसटी होईल १७८२ रुपये
हॉलमार्किंग चार्जेस होतील ४५ रुपये (हदागिन्यांचे वजन कितीही असले तरी ही किंमत सरकारी नियमानुसार ४५ रुपयेच असेल.)
#म #मराठी #gold
दागिन्यांची फायनल किंमत = ५४,००० + ५४०० + १७८२ + ४५ = ६१,२२७ रुपये
समजा तुमच्या दागिन्यांमध्ये स्टोन्स किंवा हिरे असतील काह सोनार त्याचेही वजन दागिन्याच्या वजनामध्ये धरतात. खरेतर अशा स्टोनचे किंवा हिऱ्याचे वजन वजा करून मगच दागिन्याचे वजन मोजले पाहिजे.#म #मराठी #gold
पुढच्यावेळी सोनेखरेदीला जाल तेव्हा तुमचा सोनार बिलाची रक्कम कशी मोजतोय याकडे नक्की लक्ष द्या.
पैसापाणीचा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेल आताच जॉईन करा.
🎙व्हॉट्सॲप- chat.whatsapp.com/EwDlMveyJkLITh…
🎙टेलीग्राम- t.me/paisapani
#म #मराठी #gold
Share this Scrolly Tale with your friends.
A Scrolly Tale is a new way to read Twitter threads with a more visually immersive experience.
Discover more beautiful Scrolly Tales like this.