------------------------------------
दिल्लीतील 'मरकज'ची बातमी अशा प्रकारे दिली जात आहे की, जणू काही तमाम मुस्लिमांनी 'हिंदू भारता'वर 'कोरोना'चे संकट लादले आहे. टीव्ही वाहिन्या, त्यातही हिंदी वाहिन्या 👇
मुळात, ज्या कालावधीत निजामुद्दीनमध्ये 'मरकज' सुरू होते, त्याच सुमारास मी स्वतः मुंबईतील एका इंटरनॅशनल कॉन्फरन्सला हजर होतो. 👇
मात्र, व्हिडिओ आणि माहिती हे सारे अशा प्रकारे प्रसारित केले जातेय की, यात अवघ्या मुस्लिमांचा डाव आहे, असे वाटावे, मुस्लिम कसे रानटी आणि क्रूर आहेत, असे भासावे आणि सर्वदूर संतापाचा संसर्ग व्हावा. 👇
'कोरोना'मुळे संपूर्ण देश अस्वस्थ असताना त्याला असा रंग देण्याचा प्रयत्न खूप दिवसांपासून सुरू होता. हमीद दाभोलकर कुठे आहेत, वगैरे प्रश्न विचारले जात होते. 👇
मुद्दे अनेक आहेत. कनिका कपूर जमातमध्ये गेली होती की जमातवाले तिच्या घरी गेले होते? लॉकडाउननंतर योगी अयोध्येला गेले. येडीयुरप्पा लग्नाला गेले. 👇
दिल्लीतील 'मरकज'च्या अनुषंगाने नेमके काय घडले ते पाहायला हवे. त्यावर पुढील पावलेही उचलायला हवीत. 👇
***