विलास नवले Profile picture
जन्म पुन्हा पुन्हा नाही.. बहुमोलाचे लाभले जीवन... माणसा तु माणुस बन...
Sep 29, 2021 19 tweets 4 min read
#कन्हैय्या_कुमार
2019 च्या लोकसभा निवडणुकी मधला माझा सर्वात आवडता उमेदवार. खर तर 2016-17 मधे मला विचारल असत तर माझ्या साठी कन्हैय्या कुमार देशद्रोही होता. कोर्टाने दिलेल्या बेल ऑर्डर मधे लिहल्या प्रामाणे कन्हैय्या माझ्या साठी एक संसर्ग जन्य आजार होता. 👇 संबित पात्रा आणि अर्णव गोस्वामी ने ओरडुन सांगितल्या प्रामाणे कन्हैय्या कुमार माझ्या साठी तुकडा तुकडा गैंग चा सदस्य होता

2016 पुर्वी कन्हैय्या कुमार या नावाला कोणीही ओळखत नव्हतं. जवाहरलाल नेहरू यूनिव्हर्सिटी ( जेएनयू ) मध्ये झालेल्या 👇
Apr 9, 2021 9 tweets 2 min read
आवडलेली पोस्ट 👇
फार वर्षापूर्वी एक जहाज बुडालं होतं ज्याचं नाव होतं “Titanic”..ते जहाज बुडण्याचं कारण देखील साधारणंच होतं “Casual Approch” म्हणजेच "कुठलीही गोष्ट सहज घेणं."

असं म्हणतात ते जहाज जेव्हा प्रवास करण्यासाठी सज्ज झालं तेव्हा 👇 हवामान खात्याने त्या जहाज कंपनीच्या Management ला Ice Burg (बर्फाच्या पर्वतरांगा) समुद्रात असण्याची शक्यता सांगितली होती. तरी देखील ते जहाज 2000 प्रवाशांना घेऊन समुद्रात निघालं होतं. त्या जहाजात आपातकालिन बोटी देखील खूप कमी ठेवल्या गेल्या होत्या. कारण काय तर त्याची गरजंच नाही. 👇
Apr 6, 2021 5 tweets 1 min read
तेलगी घोटाळा आरोप - भुजबळांचा राजीनामा
जावई जमीन प्रकरण - मनोहर जोशींचा राजीनामा
अण्णा हजारे यांचे आरोप - चार मंत्र्यांचे राजीनामे
मुंबई हल्ला प्रकरण - केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकुरकर, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, गृहमंत्री आर.आर. पाटील राजीनामा.
आता 👇 संजय राठोड व अनिल देशमुख यांचाही राजीनामा...!
एक लक्षात घ्या केवळ नैतिकता अन आरोप म्हणून हे सगळे राजीनामे झाले..

पण गम्मत बघा
बरखा पाटील प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही
कोरेगांव भिमा दंगल प्रकरण - तत्कालीन गृहमंत्र्याचा राजीनामा नाही 👇
Apr 3, 2021 4 tweets 1 min read
नमस्कार...
सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की , मी सोशलमीडिया वरुन जरासा मोठाच ब्रेक घेतला. आणि फक्त सोशलमिडिया पासुनच नव्हे तर बऱ्याच दिवसापासुन माझा मोबाइल नंबर सुद्धा बंद होता. whats app ही बंद होत. सगळंच बंद होत. त्यामुळे अनेकांना माझी काळजी लागली होती की, मी बरा आहे ? 👇 मला काही झाल तर नाही ना ?
तर,
हो , मी बरा आहे...
कंपनीची काम Work From Home सुरुच होती व सुरु आहे. मी कुठेही बाहेर फिरत नव्हतो. मला कोरोना झाला नव्हता. मी जरी कामानिम्मित फिरायला निघालो तरी योग्य ती काळजी घेत होतो व घेत असतो. 👇
Dec 9, 2020 6 tweets 2 min read
भारतीय जनता पार्टीचे आज व मागच्या सहा वर्षापासुनचे मुख्य टार्गेट १७ ते २४ ची तरुण मुले-मुली आहेत. या दरम्यान या तरुणापर्यंत मोठ्या प्रमाणावर whats appच्या माध्यमातुन मुस्लीम द्वेष , काँग्रेसने काहीच केलं नाही, देश लुटला , इ. मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात येत व ते यात यशस्वी होतात.👇 या तरुणांचा मेंदू भयकंर हँन्ग करुन ठेवतात त्यामुळे त्यांना विचारही करावासा वाटतं नाही की , ज्या देशात रस्ते नव्हते , मुबलक धान्य नव्हते ,शाळा, काँलेज , कंपन्या , दुरदर्शन, दळणवळण साधणे, कँम्पुटर ,वीज, दवाखाने कित्येक वाड्या वस्तीवर काहीच नव्हते ते निर्माण कसे झाले व कोणी केलं? 👇
Sep 3, 2020 13 tweets 4 min read
#आवडलेलं #वाचनीय
वाटा तुझ्या माझ्या : नरहर कुरुंदकर

एका उद्धवस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून नेहरुंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. लोक नेहरुंना मारखाऊ म्हणतात, पडखाऊ म्हणतात. त्यांचं राजकारण आत्मघातकी आणि शेळपट म्हणतात, पण लोक विसरतात ते हे की स्वातंत्र्य मिळालं तेव्हा +👇 या देशात रेशनिंग होती आणि माणशी ३०० ग्रॅम प्रतिदिवस अन्नच दिले जाई. ४९ साली अमेरिकेने थोडा ताण दिल्याबरोबर रेशन माणशी २२५ ग्रॅम पर्यंत खाली आलं. देशातले धान्य उत्पादन ३८ दशलक्ष टन एवढंच होतं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर +👇
Jul 25, 2020 9 tweets 3 min read
#कानबाई #खान्देश
श्रावणातल्या नागपंचमीनंतरच्या पहिल्या रविवारी कानबाई किंवा कानुबाई हा उत्सव खान्देशात उत्साहाने साजरा होतो. त्यासाठी तिथी वगैरे बघत नाही. कानबाई उत्सवाला फार जुनी परंपरा लाभली आहे. कुणी म्हणतं पुर्वी खानाचं राज्य होतं. 👇 त्याला तु'झ्या नावाची म्हणजे "खानबाई' साजरी करतो असं सांगुन हा हिंदुंचा सण साजरा करत होते. कुणी म्हणतं , हा खान्देश = कान्हादेश! खान्देशी लोक कान्हा म्हणजे श्रीकृष्णाला मानतात म्हणुन त्यांनी देवीचा उत्सव सुरु करण्यासाठी 'कानबाई' हे नाव घेतलं असावं. असो. हा उत्सव प्रामुख्याने 👇
Jun 16, 2020 5 tweets 1 min read
सगळे मीडियावाले एका सुरात सांगत आहेत की "चीनने हे विसरू नये की हा 1962 चा भारत नाही, मोदींच्या नेतृत्वाखालील 2020 चा भारत आहे."

जणू काही चीन अजूनही 1962 मध्येच आहे. चीनपण 2020 मध्ये आहे बाबांनो आणि त्यांच्या लष्करी आणि आर्थिक सामर्थ्यापुढे आपण आजतरी टिकाव धरू शकत नाही. 👇 मोदीजीही त्यांना खूप चांगले माहीत आहेत. ते झोपाळ्यात झुलवतात त्यांना भारतात आले की, आणि ट्रम्पने एक धमकी दिली की लगेच तासाभरात औषधे पाठवायला परवानगी देतात.

सध्या GDP ची वाढ शून्याकडून खाली जाईल असे दिवस आहेत, बेरोजगारी उच्चांकावर आहे, करसंकलन होत नाहीये, 👇
Jun 13, 2020 12 tweets 4 min read
मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आपण ज्यांना सर्वज्ञ, अभ्यासू आणि खंबीर व्यक्ती मानतो आणि म्हणून आपण त्यांना गुरूही मानतो अशी माणसंही एवढी अविचारी का होत असतील? जगात दुःखं आहेत, समस्या आहेत पण एखाद्याच्या आयुष्यापेक्षा त्या नक्कीच मोठ्या नाहीत. 👇

#म कोणतंही दुःख किंवा समस्या ही आपल्या आयुष्याचा भाग असते, ते दुःख किंवा ती समस्या म्हणजे आपलं आयुष्य नसतं हे आता आपल्याला कळलं पाहिजे!
काही काही लोक नवराबायकोमध्ये पटत नाही म्हणून आत्महत्या करायला उठतात. मी म्हणतो 👇

#म
Jun 12, 2020 5 tweets 2 min read
हे परमेश्वरा.
मला माझ्या वाढत्या वयाची
जाणीव दे. बडबडण्याची माझी
सवय कमी कर
आणि प्रत्येक प्रसंगी मी
बोललंच पाहिजे ही माझ्यातली
अनिवार्य इच्छा कमी कर.
दुसर्‍यांना सरळ करण्याची
जबाबदारी फक्त माझीच व
त्यांच्या खाजगी प्रश्नांची
दखल घेऊन ते मीच
सोडवले पाहिजेत 👇#म #पुलंस्मृती अशी
प्रामाणिक समजूत माझी
होऊ देऊ नकोस.
टाळता येणारा फाफटपसारा
व जरुर नसलेल्या तपशिलाचा
पाल्हाळ न लावता
शक्य तितक्या लवकर मूळ
मुद्यावर येण्याची माझ्यात
सवय निर्माण कर.
इतरांची दुःख व वेदना
शांतपणे ऐकण्यास मला
मदत करच पण त्यावेळी
माझ तोंड शिवल्यासारखे
बंद राहु दे. 👇
May 27, 2020 16 tweets 4 min read
सकाळची वेळ होती. आज सकाळ पासुनच सखाचा चेहरा जरा कोमेजलेला होता. गावातील माणस आपापली शेतीच्या कामाला लागली होती.कोणी दुध डेअरीवर घेऊन जात होते.बायका विहिरीवरुन पाणी आणत होत्या.सर्वांच्या घरातील चुल पेटली पण सखाच्या घरची चुल थंड होती. घरात काहीच नव्हत तर चुल पेटवणार तरी कशी.👇#म चिंताग्रस्त होऊन पायात तुटलेली चप्पल टाकून सखाराम काहीतरी काम मिळतय का यासाठी घराबाहेर पडला. सखारामची आर्थीक परिस्थिती तशीही सततच्या दूष्काळामुळे खुपच खालावली होती. घरात पैशाची आवक पुर्णपणे बंद झाली होती.आता काय करायला हव. सखारामच्या डोक्यातील विचारचक्रे जोरात चालु झाली. 👇
May 20, 2020 15 tweets 3 min read
#थ्रेड
आजी आणि बापाची हत्या झाली. दोन्ही हत्येची कारणं वैयक्तिक नव्हती,तर या देशाशी संबंधित होती.आजी आणि बापाची हत्या झाल्यानंतर अर्थात सुरक्षेचं कवच अधिक कडक केलं जाणार होतं. तसं झालंही.कधी नाव बदलून शिक्षण,तर कधी नाव बदलून नोकरी.स्वत:ची खरी ओळख सांगणं सुद्धा जीवाला धोका होता.👇 स्वत:ची ओळख न सांगता जगणं, हे किती भयानक आहे! इमॅजिन करवत नाही.

राहुल गांधी असेच जगले. लोकांमध्ये बिनदिक्कीतपणे मिसळता येत नव्हतं किंवा कुठेही खऱ्या ओळखीने जाता येत नव्हतं. बरं या सर्व गोष्टी तुमच्या-आमच्यामुळेच. कारण त्यांच्या जीवाला भीती असण्याची कारणं वैयक्तिक नव्हती, 👇
May 7, 2020 27 tweets 5 min read
"तथागत गौतम बुद्धांएवढा बुद्धिमान,प्रगल्भ,परिपूर्ण माणूस जगाने आजवर पाहिलेला नाही.बुद्धांच्या सामर्थ्याचा एक थेंब माझ्याकडे असता,तरी खूप झाले असते! एवढा थोर तत्त्वचिंतक कोणीच आजवर बघितला नाही. असा शिक्षक यापूर्वी कधी होऊन गेला नाही. काय सामर्थ्य होते पाहा. +👇 #म #थ्रेड #संजयआवटे जुलमी ब्राह्मणांच्या सत्तेसमोरही हा माणूस वाकला नाही. उभा राहिला. तेवत राहिला…"

हे कोण म्हणतंय?
साक्षात स्वामी विवेकानंद.
हिंदुत्वाचा ध्वज जगभर घेऊन जाणारे विवेकानंद १९०० मध्ये तथागत गौतम बुद्धांविषयी कॅलिफोर्नियात बोलत होते. +👇
Apr 27, 2020 18 tweets 4 min read
#सोनिया_गांधींचे_पत्र #थ्रेड
मला माझा राजीव परत द्या, मी निघून जाईन आणि जर तुम्ही माझा राजीव परत देऊ शकत नसाल तर मला शांतपणे त्यांच्या आजुबाजुला ह्याच मातीत मिसळून जाऊ द्या.

तुम्ही पाहिलं होतं ना त्यांना! उंच कपाळ,बोलके डोळे,उंच शरीर आणि त्यांचं हास्य. +👇 जेंव्हा मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हा पाहतच राहिले होते. मैत्रिणीला विचारलं कोण आहे हा हँडसम तरुण? मैत्रीण बोलली होती तो भारतीय आहे, पंडित नेहरूंच्या कुटुंबातला! मी पाहतच राहिले ह्या पंडित नेहरूंच्या कुटुंबातील तरुणाला. + 👇
Apr 1, 2020 11 tweets 2 min read
अर्णब आणि त्याची जमात! लेखक- संजय आवटे #थ्रेड_वाचा #म
------------------------------------
दिल्लीतील 'मरकज'ची बातमी अशा प्रकारे दिली जात आहे की, जणू काही तमाम मुस्लिमांनी 'हिंदू भारता'वर 'कोरोना'चे संकट लादले आहे. टीव्ही वाहिन्या, त्यातही हिंदी वाहिन्या 👇 'कोरोना की इंटरनॅशनल जमात' अशा प्रकारचे टॅगिंग करून भयंकर पद्धतीने बातम्या देत आहेत. त्यात अर्थातच 'आज तक', 'झी', 'रिपब्लिक' वगैरे आघाडीवर आहेत. यावर टीव्हीवर डिबेट्स झडत असून, त्यात मुस्लिम मौलवी विरुद्ध हिंदुत्ववादी पांडे वगैरे असा संघर्ष रंगवला जात आहे. 👇
Mar 13, 2020 17 tweets 3 min read
मी, सोशलमिडीया आणि राजकारण (थोडक्यात) #थ्रेड वाचा.
२०१२ मध्ये फेसबुक वापरायला सुरवात केली. सुरवातीला वेळही कमी मिळायचा. नेट बँलेन्सही महाग असायचा. आणि तेंव्हा रोज फेसबुक वापरायलाच हव अस काही वाटत नव्हत. अधुनमधुन फेरफटका मारायचो. बर फेसबुकवर करायच काय तर 👇#म भारी भारी प्रेमाच्या काँपी पेस्ट शेरो शायरी शेअर करायच्या. जमलच तर एखादा फोटो. 😊 फेसबुकवर शोधाशोध करायची. ओळखीच्या इनबाँक्सला जाऊन जेवण झाल का विचारायच जमलच तर जरा गप्पा मारायच्या. तेंव्हा आण्णा आंदोलन गाजल. भर्ष्टाचारामुळे देशभर काँग्रेस विरोधी वातावरण तयार झाले. 👇
Feb 12, 2020 12 tweets 2 min read
थ्रेड पुर्ण वाचा.
आपल्या सभोवताली जस वातावरण असत तशीच माणस बऱ्यापैकी घडतात, बोलतात, वागतात , विचार करतात. लहान मुल जेंव्हा पहिल्यांदाच बोलायला शिकतो ना तेंव्हा तो घरातली लोक कसे बोलतात. कोणकोणते शब्द उच्चारतात याच ग्रहण करतो व तसच बोलायला लागतो. 👇 👇 #म नंतर गल्लीत खेळतांना , शाळेत मुलांमध्ये वावरतांना तो सुद्धा इतरांसारखे वागायला लागतो. थोडक्यात सांगायच की , सगंत गुणांमुळे माणुस एकतर सुधरतो तरी किंवा बिघडतो तरी… 👇👇