एकाच झोपडीत २०/२० जणं तुम्ही राहता
तुमच्या शहरात नसलेला आसरा इथे शोधता
गावच्या कुटुंबाचं पालनपोषण करता
माणूस म्हणून जगणं इथे उपभोगता
आणि हे सगळं अवैध मार्गाने करता
२/८
खूनी गून्हेगारांचा अड्डा म्हणजे मुंबई
अवैध कामांचं ठिकाण म्हणजे मुंबई
स्वप्नांची चंदेरी दुनिया म्हणजे मुंबई
यशाची सहज सोपी शिडी म्हणजे मुंबई
आणि हे सगळं करताना बदनाम होते मुंबई
३/८
चहावाल्या भैय्याचं रोजचं इन्कम विचारा
पाणीपुरीचा व्यवसाय करणारालाही तेच विचारा
पानांच्या टपरीवाला महिना भाडं किती भरतो विचारा
कळेल तुम्हाला मुंबईने काय दिलंय या सगळ्यांना
४/८
पण संयम सुटतो
आणि आज मुंबई संकटात असताना
हेच पळताहेत
कोणाच्याही भुलथापांना बळी पडून, गर्दी करतायत
त्रास तर होणार ना साहेब, त्रास तर होणार..
५/८
पुण्यातला मुंबईत अडकलाय,
मुंबईतला नाशिकमध्ये
त्याला नाही भिती वाटत ?
त्याला नाही आठवण येत ?
राज्यातला माझा माणूस काय
श्रीमंतीत लोळतोय ?
केवळ त्याचं घर, त्याची माणसं,
त्याचा परिवार त्याच्या सोबत आहेत म्हणून त्याला दु:ख नाही ?
६/८
पण तो गप्प आहे
त्याला माहिती आहे हे पण दिवस संपतील,
त्याला माहिती आहे हे दु:ख फक्त माझं नाही जगाचं आहे
हे संकट जात, धर्म, पंथ
बघून आलेलं नाही
गरिब, श्रीमंत बघून आलेलं नाही,
तर हे माणसाच्या अस्तित्वावर आलेलं संकट आहे..
७/८
त्रास तर होणार ना साहेब, त्रास तर होणार..
८/८