My Authors
Read all threads
शेअर बाजारातील मूलभूत माहितीची उजळणी (Revision)

आपण उद्या पासून शेअर बाजार अभ्यास/विश्लेषण करण्याचे मार्ग फंडामेंतल विश्लेषण (Fundamental Analysis आणि टेक्निकल विश्लेषण (Technical Analysis) या विषयी माहिती घेणार आहोत. 👇
या आधी आपण आजपर्यंत समजून घेतलेल्या सर्व माहितीची उजळणी आजच्या एकाच धाग्यात करू म्हणजे पुढील धागे आणखी सोपे जातील.

आपण पाहिले की, शेअर बाजार म्हणजे कंपनीच्या शेअर्सचे सोद्दे करण्याचे ठिकाण. ही एक सार्वजनिक यंत्रणा आहे जिथे शेअर्स खरेदी विक्री केले जातात. 👇
तसेच शेअर्स म्हणजे त्या कंपनी मध्ये आपला असणारा हिस्सा.

जेव्हा कंपनी शेअर बाजारात येते तेव्हा तिला शेअर बाजारात नोंदणीकृत होण्यासाठी एक माध्यम लागते ते म्हणजे स्टॉक एक्सचेंज.

नोंदणकृत होण्यासाठी कंपनी बाजारात आपला IPO उतरवते. म्हणजेच कंपनी आपले शेअर्स बाजारात IPO द्वारे 👇
विकते जे आपण खरेदी करतो तेव्हा एका खासगी निधी वर चालणाऱ्या कंपनीला तिचे शेअर्स खरेदी करून सार्वजनिक निधीवर चालणारी कंपनी बनवतो.

कोणत्याही देशाचा बाजार हा आज कसा चालू आहे हे ओळखण्यासाठी आपण प्रत्येक कंपनी कशी वाटचाल करते आहे हे सांगू शकत नाही. कारण ५००० पेक्षा ही जास्त 👇
कंपनी भारतात आहेत तशाच इतर देशात ही. त्याच साठी निर्देशांक वापरला जातो. जसा निफ्टी ५० हा निर्देशांक आपल्याला सांगतो की भारतातील सर्वोत्तम ५० कंपन्या आज बाजारात कसा कारभार करत आहेत. म्हणजेच जर हा निर्देशांक जर शुन्या पेक्षा वर असेल तर भारतीय बाजार वर आहे व जर हाच निर्देशांक 👇
शून्या पेक्षा खाली असेल तर बाजार पडत आहे असे समजतो.
निफ्टी ५० हा निर्देशांक NSE मध्ये येतो तर सेन्सेक्स हा निर्देशांक BSE एक्सचेंज मध्ये.

शेअर बाजारातील शेअर्स किंमत ही खरेदी विक्री केल्याने वाढते किंवा कमी होते. म्हणजेच जर खरेदी करणारे जास्त असतील तर मागणी जास्त आहे 👇
या मुळे किंमत वाढेल. याचप्रमाणे जर विक्री करणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर बाजारातील पुरवठा वाढलेला असतो त्यामुळे किंमत खाली येईल. याच सूत्रावर बाजारातील शेअर्सची किंमत कमी जास्त होत असते.

आपण पाहिले की शेअर बाजारात लोक गुंतवणुकीसाठी येतात परंतु ट्रेडिंग करून 👇
आपले बरेच पैसे गमावतात.(ट्रेडिंग म्हणजे शेअर्स ची खरेदी विक्री)
ट्रेडिंग लाच गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्या शेअर्सचा भविष्यातील योग्य तो भाव ओळखून खरेदी करावी लागेल. जर योग्य मूल्य ओळखू शकलो तर ती एक उत्तम गुंतवणूक होऊ शकते.👇
परंतु योग्य भाव समजून देखील जर भीती आणि लालच गुंतवणूकदाराच्या मनात असेल तर नफा मिळवणे खूप अवघड जाते. त्यासाठी गुंतवणूकदाराला भावना बाजूला ठेवून गुंतवणूक करावी लागतो. व त्यासाठी आपण खरेदीचा भाव, कालावधी, स्टॉक, आणि विक्रीचा भाव हे सर्व पूर्व नियोजित करतो. 👇
ज्याला आपण ट्रेडिंग योजना(Trading Plan) म्हणतो.

आता आपल्याकडे मूलभूत माहिती आहे. आणि ती सर्वांना पुन्हा एकदा समजावी या साठी आपण आज उजळणी केली. परंतु ही ट्रेडिंग योजना कशी बनवायची? त्यासाठी कोणता अभ्यास करावा लागेल? हे आपण उद्यापासून पाहणार आहोत.🙏🙏👇
या आधीचे धागे वाचण्यासाठी ब्लॉगला भेट देऊ शकता. anrpstock.wordpress.com
@ShamalShingte @Annu_kadle @nastik_Shubham @MarathiPrachi @manju77077 @dipaligaikwad07 @Madhuri47_47_47 @Aparichit_Mi @MiBhandarkar @sidtalk27 @d_d_dhuri @Pnayan3 @Amol_A_S @Manoj2211Khare @anu_bundhe
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with Amolz(@🏠)

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!