थ्रेड👇
१.पहिला कोरोना रुग्ण सापडला ३० जानेवारीला
राहुल गांधींनी वॉर्निंग दिली १२ फेब्रुवारीला
सक्तीचे विलगीकरण सुरु झाले १० मार्चला
आणि केंद्र सरकारला संकटाची चाहूल लागली २४ मार्चला
म्हणजे ५४ दिवस केंद्राने उशीर केला(1/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP #म
२.या ५४ दिवसांमध्ये केंद्राने टेस्ट आणि पीपीई किट चा साठा केला नाही.
परिणामी अपेक्षित वेगाने टेस्ट होऊ शकल्या नाहीत.म्हणून रुग्ण हि वाढत गेले.
हे किट देण्याची जबाबदारी केंद्राची आहे.(2/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
३.२५ मार्च पासून मजूर पायी चालत निघाले होते.
उद्धव ठाकरे यांनी मोदीजींना विनंती हि केली होती रेल्वे ची सोय करण्याची
पण सरकारला जाग आली ५० दिवसांनी.तोपर्यंत मजुरांचे हाल झाले,१५० पेक्षा अधिक मजुरांचा जीव गेला आहे. (3/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
४.मुंबईमध्ये रुग्ण अधिक आहेत कारण मुंबईची लोकसंख्या जवळपास २ कोटी आहे
तर घनता ३२ हजार प्रति चौ किमी आहे
आशियातीलसर्वात सर्वात मोठी झोपडपट्टी मुंबईत आहे
सर्वाधिक परदेशी प्रवासीहि मुंबईमध्ये आले(4/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
अशा स्थितीत केंद्राने मुंबईला अधिक टेस्ट किट तसेच विशेष पॅकेज द्यायला हवे.कारण मुंबई आर्थिक राजधानी देखील आहे. असे असूनही केंद्राने अजूनही मदत केलेली नाही.
राज्याचे उत्त्पन्न ढासळलेले आहे.(5/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
५. सीएम रिलीफ फंड ला सीएसआर मधून निधी मिळू नये म्हणून केंद्राने अटी टाकल्या.
महाराष्ट्र भाजप सीएम फंड अक्षरशः एक रुपयाचीही मदत केलेली नाही.(6/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
उलट उठसुठ राज्यपालांना भेटून अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
कोरोनाच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांची पाठराखण केली.(7/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP
हे वास्तवात केंद्र सरकार बचाव आंदोलन आहे.
संकट काळात महाराष्ट्राला अधिक संकटात टाकणारी भाजप त्यामुळे महाराष्ट्रद्रोही आहे यात शंका नाही.
जय महाराष्ट्र (8/8)
#महाराष्ट्रद्रोहीBJP