भारताचा जबाबदार नागरिक, महाराष्ट्राचा रहिवासी म्हणून मी माझं मत मांडतोय. +
महाराष्ट्राती सर्वात मोठा पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपचं पहिलं कर्तव्य आहे सरकारवर वचक ठेवणे, सरकारसमोर जनतेचे प्रश्न घेऊन जाणे. +
सरकारच्या चुका दाखवून परिस्थिति सुधारायची नाही का? सरकार कर्तव्यशून्य असेल तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला नकोय का? +
#Maharashtra_Bachao
#MaharashtraBachao
लक्षात घ्या, हे काही एक घडलेलं भ्रष्टाचाराचं प्रकरण नव्हे एकदोनदा टीका करून गप बसायला. रोज मरण मरतोय आपण. मार्च पासून मे उजाडला अजून लोकांना घरात बसवता येईना सरकारला. +
मुळात ही टीका करण्यातच उशीर केला आहे भाजपने. पहिले २ महीने वाया घालवले आहेत. आधीच फोकस्ड टीका केली असती, सरकारला २०% जरी ताळ्यावर ठेवलं असतं तर आज आपले धंदे आहेत तेवढ्या खड्ड्यात गेले नसते. +
#महाराष्ट्रबचाव
हे सगळं होत असताना विरोधी पक्षाने दणदणीत आवाज करून सरकारला ताळ्यावर आणावं ही अपेक्षा करू नये का? कुणाकडून करू अपेक्षा?
जर हे काम विरोधी पक्षाने करायचं नाही, तर कुणी करायचं? +
सध्या महाराष्ट्रात जे घडतंय् ते अक्षम्य आहे आणि हे असं घडत असताना भाजप गप बसून राहिला तर त्यांचे निवडून आलेले आमदार आणि त्यांना दिलेलं मत वाया गेलं असं समजेन मी. +
सत्ताधारी बेसिक कामं नीट करू शकत नसतील तर त्यांच्यावर दबाव आणून कामं करून घ्यायला हवीत. भाजप तेच करत आहे. तेच करायला हवं. +
सत्ताधारी हे कधीच मान्य करणार नाहीयेत. भाजप समर्थकांनी हे सगळं नीट समजून घेणं आवश्यक आहे.
: ओंकार दाभाडकर
d.omkar1@gmail.com