My Authors
Read all threads
#मिशन_बिगीन_अगेन" बाबत अधिसूचना जाहीर - जिल्हाधिकारी नवल किशोर राम #पुणे,दि. 1: @RajSarag
कोविड - 19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालिन उपाय योजनेचा भाग म्हणून राज्यशासनाने संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्याक्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून
त्यास 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ आणि टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी  "मिशन बिगीन अगेन" बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे, असे  जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे अध्‍यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.
आपत्ती  व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी हे या प्राधिकरणाचे पदसिध्दअध्यक्ष आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी  पुणे जिल्हयात आपत्ती
व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 अन्वये पुणे महानगरपालिका क्षेत्र:- पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे आदेशातील अटी व शर्तीच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. पिंपरी - चिंचवड महानगरपालिका :-
पिंपरी -चिंचवड महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व व्यक्तींना परवानगी राहील. पुणे व खडकी छावणी परिषद :-पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने
आयुक्त महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.देहूरोड छावणी परिषद :-देहूरोड छावणी परिषद  क्षेत्र पिंपरी -चिंचवड महानगरपालिका
हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका पिंपरी-चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड छावणी परिषद यांचे आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. वरीलप्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र
ग्रामपंचायत, नगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत राज्यशासनाकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी राहील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष, तथा जिल्हादंडाधिकारी नवल किशोर राम, यांनी अधिसूचना
सुधारणा पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू केली आहे. हे आदेश दिनांक 30जून 2020 पर्यंत लागू राहतील आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटनाविरुध्द भारतीय साथ अधिनियम 1897 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम
2005 व भारतीय दंडसंहिता (45 ऑफ 1860) कलम 188 आणि या संदर्भातील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष श्री. राम यांनी कळविले आहे.
Missing some Tweet in this thread? You can try to force a refresh.

Enjoying this thread?

Keep Current with DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE

Profile picture

Stay in touch and get notified when new unrolls are available from this author!

Read all threads

This Thread may be Removed Anytime!

Twitter may remove this content at anytime, convert it as a PDF, save and print for later use!

Try unrolling a thread yourself!

how to unroll video

1) Follow Thread Reader App on Twitter so you can easily mention us!

2) Go to a Twitter thread (series of Tweets by the same owner) and mention us with a keyword "unroll" @threadreaderapp unroll

You can practice here first or read more on our help page!

Follow Us on Twitter!

Did Thread Reader help you today?

Support us! We are indie developers!


This site is made by just two indie developers on a laptop doing marketing, support and development! Read more about the story.

Become a Premium Member ($3.00/month or $30.00/year) and get exclusive features!

Become Premium

Too expensive? Make a small donation by buying us coffee ($5) or help with server cost ($10)

Donate via Paypal Become our Patreon

Thank you for your support!